एक्स्प्लोर
International Day of Happiness : आज जागतिक आनंदी दिन... का साजरा केला जातो हा दिवस?

International Day of Happiness
1/7

प्रत्येक वर्षी 20 मार्च रोजी जागतिक आनंदी दिन साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्याचं कारण म्हणजे आनंदी जीवन आणि आरोग्यसंपन्न राहण्याची प्रेरणा मिळावी.
2/7

आनंदी राहायला कुणाला आवडत नाही. पण प्रत्येक माणूस आनंदी राहतोच असं नाही. कुणाला आर्थिक त्रास असतो, टेन्शन असतं तर कुणाला कौटुंबिक तणाव असतो तर कुणी आजारांनी त्रस्त असतो.
3/7

आनंदी राहता यावं यासाठी अनेकदा लोकं वेगवेगळे उपाय करतात. मात्र त्यानं ते आनंदी होतीलच असं नाही. मानसिक दृष्टीनं आनंदी राहणं ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे.
4/7

संयुक्त राष्ट्रानं इंटरनेशनल डे ऑफ हॅप्पीनेस साजरा करण्याची घोषणा केली आहे. 2013 सालापासून हा दिवस प्रत्येक वर्षी साजरा केला जातो. 2013 मध्ये पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय आनंदी दिन भूटानची राजधानी थिम्पूमध्ये साजरा केला गेला.
5/7

कोरोना महामारी असो किंवा व्यक्तिगत आयुष्यातील ताणतणाव असो, कित्येक नागरिक यामुळं त्रासलेले आहेत. अनेकांच्या चेहऱ्यावरील आनंद हरवला आहे.
6/7

सोबतच इंटरनेटचा प्रभाव असल्या कारणानं लोकं आभासी दुनियेत अधिक व्यस्त आहेत. यामुळं प्रत्यक्ष नाती जपण्यामध्ये बऱ्याचदा माणूस कमी पडताना दिसत आहे. यामुळं वाद-विवाद, कौटुंबिक कलहाचे प्रमाण वाढीस लागलं आहे.
7/7

नोकरीच्या ठिकाणी असलेला ताण अशा गोष्टी देखील मानसिक आरोग्यावर परिणाम करतात. त्यामुळं आनंददायी जीवन जगणं अत्यंत गरजेचं आहे. हाच दृष्टिकोन समोर ठेवत जागतिक आनंददायी दिवस साजरा केला जातो.
Published at : 20 Mar 2022 04:04 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
हिंगोली
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion