एक्स्प्लोर
In Pics : रायगडमध्ये कार अन् ट्रकची जोरदार धडक, कारचा चक्काचूर
Mumbai Goa Highway Accident: मुंबई-गोवा हायवेवर भीषण अपघात, अपघातात नऊ प्रवाशांचा मृत्यू. कार आणि ट्रकची समोरासमोर धडक, गोरेगाव हद्दीतील रेपोलीनजीक पहाटेच्या सुमारास अपघात
Mumbai Goa Highway Accident
1/8

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात झाला असून अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला आहे.
2/8

रायगडमध्ये माणगावजवळ रेपोली इथे कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. दरम्यान, अपघाताचं कारण मात्र अद्याप अस्पष्टच आहे.
3/8

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, इको कार आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली.
4/8

गोरेगाव हद्दीतील रेपोलीनजीक पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातात गाडीचा चक्काचूर झाला आहे. तर गाडीतून प्रवास करणाऱ्या नऊ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.
5/8

मिळालेल्या माहितीनुसार, ही संपूर्ण घटना आज (गुरुवारी) पहाटेच्या वेळी मुंबई-गोवा महामार्गावर घडली.
6/8

कार आणि ट्रकची समोरासमोर जोरदार धडक झाली आणि अपघात झाला. या अपघातात कारमधील सर्वच्या सर्व 9 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. तसेच, या अपघातात चार वर्षांचा चिमुकला बचावल्याची माहिती मिळत आहे.
7/8

अपघाताची माहिती मिळताच, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केलं.
8/8

अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती. पोलिसांनी मार्गावरील अपघातग्रस्त वाहनं बाजूला करुन वाहतूक पूर्ववत केली आहे.
Published at : 19 Jan 2023 08:35 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
नाशिक
नाशिक
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion