एक्स्प्लोर
Photo: टीचभर पोटाची खळगी भरण्यासाठी जीवघेणा बिब्बा फोडण्याचा उद्योग
Nanded News: नांदेड जिल्ह्यातील लोहा शहरातील भोईगल्लीत वर्षभर बिब्बे फोडण्याच काम सुरु असते.

Nanded News
1/11

नांदेड जिल्ह्यातील (Nanded District) किनवट, माहूर, उमरी, लोहा, कंधार, मुखेड, भोकर, हिमायतनगर, हदगाव या आदिवासी बहुल भागातील वाडी तांड्यावर, पाड्यावर वास्तव्य करणारा आदिवासी समाज अद्यापही जंगलातील नैसर्गिक साधन सामुग्रीवर आजतागायत आपला उदरनिर्वाह करत आहे.
2/11

ज्यात मोहफुलें, मध, धावंडा डिंक, टेंभी पत्ता, लाकूड, विविध वनौषधी आणि बिब्बा, टेंभरे, सीताफळ, घोटफळ या जंगली फळाची विक्री करून आपला संसाराचा गाडा हाकतात.
3/11

पण काही फळे तितकीच विषारी आणि औषधी गुणधर्म असणारी व काळजी घेऊन तोडणी आणि फोडणी करावी लागतात.
4/11

ज्यात जंगलाचा रानमेवा बिब्बा येतो. त्यामुळे टीचभर पोटाची खळगी भरण्यासाठी अजूनही आदिवासी महिलांना जिवघेणा बिब्बा फोडण्याचा उद्योग करावा लागतोय.
5/11

नांदेड जिल्ह्यातील लोहा शहरातील भोईगल्लीत वर्षभर बिब्बे फोडण्याच काम सुरु असते.
6/11

या बिब्बा फोडणी व्यवसायातूनच अनेक महिलांना रोजगार मिळतोय.
7/11

काजू वर्गीय फळ असणारा बिब्बा जितका आरोग्यदायी तितकाच विषारी पण आहे.
8/11

कारण बिब्बा झाडाचे फळा व्यतिरिक्त या झाडाचे लाकूड, पाने आणि अगदी सावलीही बसण्या योग्य नसते.
9/11

कारण हे लाकूड ठिसूळ असते, तर त्यातूनही तेल निघत असल्याने ते उतून जखम होण्याची भीती असते.
10/11

तसेच त्याच्या सवलीनेही त्वचेवर पुरळ उठून हानी होऊ शकते. पण त्याला लागणारे फळ आणि त्याची बी म्हणजे बिब्बा हा तितकाच आरोग्यदायी आहे.
11/11

पण टीचभर पोटाची खळगी भरण्यासाठी जीवघेणा बिब्बा फोडण्याचा उद्योग महिला करतात.
Published at : 19 Jan 2023 06:03 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
राजकारण
सोलापूर
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
