एक्स्प्लोर
Amit Thackeray: समुद्र किनारा स्वच्छता मोहिमेत अमित ठाकरे सहभागी; पाहा फोटो
Amit Thackeray : मनसे नेते अमित ठाकरे यांनी आज पक्षाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला.

Amit Thackeray: समुद्र किनारा स्वच्छता मोहिमेत अमित ठाकरे सहभागी; पाहा फोटो
1/9

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने आज 'आपला समुद्र किनारा, आपली जबाबदारी' या घोषवाक्यासह स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.
2/9

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी 'आपला समुद्र किनारा, आपली जबाबदारी' या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला.
3/9

यावेळी मनसेचे पदाधिकारी, शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी होते.
4/9

अनेक पर्यावरणप्रेमींसह अमित ठाकरे यांनी दादर समुद्र किनाऱ्यावर वाळूत रुतलेले गणेश मूर्तींचे अवशेष तसंच निर्माल्य उचलून हा किनारा स्वच्छ केला.
5/9

अमित ठाकरे यांनी याआधी देखील पर्यावरणीय मुद्यावर भूमिका घेतली आहे.
6/9

गणेश विसर्जनानंतर समुद्राच्या भरती ओहोटीमुळे किनाऱ्यावर आलेले गणेश मूर्तींचे अवशेष,निर्माल्य किनाऱ्यावर येते.
7/9

या स्वच्छता मोहिमेत मनसे नेते नितीन सरदेसाई सहभागी झाले होते. त्याशिवाय, संदीप देशपांडे, जय शृंगारपुरे, यशवंत किल्लेदार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला.
8/9

मुंबईत गिरगाव, दादर, माहिम, वांद्रे, जुहू, वर्सोवा, अक्सा येथे, रायगड जिल्ह्यात उरण, वर्सोली, नागाव, अलिबाग, मुरुड येथे; तर रत्नागिरीत मांडवी येथे सकाळी 8 ते 10 दरम्यान ही स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.
9/9

मुंबईतील वर्सोवा किनाऱ्यावरदेखील मनसेच्या कार्यकर्त्यांनी स्वच्छता मोहीम राबवली.
Published at : 10 Sep 2022 11:24 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
भारत
पुणे
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
