एक्स्प्लोर
Pandharpur News: विठ्ठल रुक्मिणी मंदिरात प्रक्षाळ पूजेनिमित्त फुलांची सजावट
आषाढी यात्रेनंतर (ashadhi wari) विठुरायाचा थकवटा दूर करण्यासाठी आज देवाची प्रक्षाळ पूजा होणार आहे. 18 दिवसानंतर आजपासून देवाचे राजोपचार होणार सुरु आहे.

Pandharpur News
1/10

आषाढी यात्रेनंतर विठुरायाच्या प्रक्षाळपूजेला आज सकाळी सुरुवात झालीय.
2/10

परंपरेनुसार आषाढीला देशभरातून येणाऱ्या लाखो भाविकांना दर्शन देण्यासाठी देवाचा पलंग काढून मंदिर चोवीस तास दर्शनासाठी खुलं ठेवण्यात येतं.
3/10

आज तब्बल 18 दिवसानंतर पुन्हा देवाचा पलंग बसविण्यात आला आणि देवाच्या प्रक्षाळ पूजेला सुरुवात झाली.
4/10

देवाचा थकवा घालवण्यासाठी मूर्तीला लिंबू साखर चोळून गरम पाण्याने स्नान घालण्यात आलं.
5/10

यासोबत मूर्तीवर पांढरे वस्त्र टाकून त्यावरून गरम पाण्यानं मंत्रोपचारात स्नान घालण्यात आलं.
6/10

प्रक्षाळ पूजोनिमित्त आज श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विविध रंगीबेरंगी आकर्षक फुलांनी सजावट करण्यात आली आहे.
7/10

श्री विठ्ठल-रुक्मिणीला आकर्षक अलंकार घालण्यात आले आहे.
8/10

विठ्ठल रुक्मिणी गाभारा, सभामंडप, श्री संत नामदेव महाद्वार अशा सर्वच भागात विविध फुलांनी सजावट करण्यात आली.
9/10

यात्रा कालावधीत हजारो भाविक मंदिरात आल्याने मंदिर घाण होते आणि ते साफ करण्यासाठीची ही प्रक्षालन पूजा ज्याचे नाव पुढे प्रक्षाळ पूजा असे पडले.
10/10

बडवे उत्पातांच्या काळात या पूजेचे औचित्य मंदिरासोबत देवाचा गाभारा आणि विठ्ठल रुक्मिणी मूर्तीची सफाई अशीच होती.
Published at : 07 Jul 2023 10:04 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
महाराष्ट्र
भारत
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
