एक्स्प्लोर
मराठ्यांचं 'भगवं वादळ' सोलापुरात! आज मनोज जरांगे पाटलांची शांतता रॅली, 'एक मराठा लाख मराठा' च्या घोषणांनी परिसर दणाणला
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली आज सोलापुरात होणार आहे. यासाठी मोठ्या संख्येनं मराठा बांधव सोलापुरात गाखल होत आहेत.

Manoj Jarange Patil Shantata rally in Solapur Maratha Reservation
1/11

मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली आज सोलापुरात निघणार आहे. मोठ्या संख्येनं मराठा समाजाचे कार्यकर्ते सोलापुरात दाखल झाले आहेत.
2/11

पहाटेपासूनच सोलापुरात मराठा समाजाच्या युवकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
3/11

पांढरा शर्ट, डोक्यावर भगवी टोपी, हातात भगवे झेंडे अशा पेहरावात मराठा समाजाचे युवक सोलापुरात दाखल झाले आहेत. झेंडे
4/11

ठिकठिकाणी मराठा समाजाच्या युवकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. एक मराठा लाख मराठाचा जयघोष होत आहे.
5/11

मराठा समाजासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांची 11 वाजता जाहीर सभा देखील होणार आहे.
6/11

राज्यात मोठ्या प्रमाणात मनोज जरांगे पाटील यांना समर्थन मिळत आहे.
7/11

सोलापूर जिल्ह्यातील कानाकोपऱ्यात मराठा समाजाचे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी दाखल झाले आहेत.
8/11

मनोज जरांगेच्या नेतृत्वात मराठा आरक्षणसाठीची शांतता रॅलीचा आजपासून दुसरा टप्पा सोलापुरातून सुरु होणार आहे.
9/11

सोलापुरात शांतता रॅलीच्या पार्श्वभूमीवर जय्यत अशी तयारी करण्यात आली आहे.
10/11

सोलापुरातील छत्रपती संभाजी महाराज चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकपर्यंत ही रॅली जाईल. छत्रपती शिवाजी महाराज चौकात या रॅलीचे जाहीर सभेत रूपांतर होईल.
11/11

मनोज जरांगे पाटील यांचे पोस्टर घेऊन लाखो मराठा युवक सोलापुरात दाखल झाले आहेत. आम्ही कायम जरांगे पाटील यांच्यासोबत असल्याच्या भावना युवकांनी बोलून दाखवल्या आहेत.
Published at : 07 Aug 2024 09:51 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
मुंबई
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
