एक्स्प्लोर
PHOTO : सोनिया गांधी आणि काँग्रेस आमदार यांच्या भेटीची वैशिष्ट्ये

Sonia Gandhi Congress MLA Meet
1/6

काँग्रेसच्या आमदारांना पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांची मंगळवारी (5 एप्रिल) दिल्लीत भेट घेतली. या बैठकीत काँग्रेसचे जवळपास 20 आमदार उपस्थित होते. संध्याकाळी सात ते साडेसात जवळपास अर्धा तास बैठक झाली.
2/6

या बैठकीत काँग्रेसच्या मंत्र्यांबद्दलची नाराजी, पालकमंत्री आपल्याच आमदारांचं काम करत नाहीत लक्ष देत नाहीत अशा तक्रारी केल्या. इतर पक्षाचे नेते त्यांच्या आमदारांचं नेतृत्व कणखरपणे करतात काँग्रेसमध्ये ही उणीव असल्याचं त्यांनी सांगितलं. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीचा मुद्दा आक्रमकपणे रेटला जात नाही, असं सांगितलं.
3/6

अडीच वर्षांपासून महामंडळाच्या नियुक्त्या रखडल्या आहेत. संघटन वाढीसाठी आमदारांना ताकद मिळणं गरजेचं असं आमदारांनी सोनिया गांधी यांना सांगितलं.
4/6

या बैठकीत सोनिया गांधी यांनी आमदारांचं म्हणणं पूर्णपणे ऐकून घेतलं. तुमचे मुद्दे काय आहेत, मनात काय आहे ते सांगा असं त्या जवळपास सहा ते सात वेळा बैठकीत म्हणाल्या. यानंतर संग्राम थोपटे, कुणाल पाटील, कैलास गोरंट्याल, अभिजित वंजारी, विकास ठाकरे, राजेश राठोड हे आमदार बोलले.
5/6

काँग्रेस संस्कृतीमध्ये प्रभारी किंवा प्रदेशाध्यक्षांच्या शिवाय आमदारांची हायकमांड सोबत थेट भेट ही दुर्मिळ गोष्ट आहे. राहुल गांधी सुद्धा या आमदारांना भेटणार आहेत.
6/6

त्यामुळे महाराष्ट्रात आमदारांच्या नाराजीची दखल घेतली जाणार का, मंत्रिमंडळात खांदेपालट होणार का आणि ज्येष्ठ मंत्र्यांबद्दल तक्रारी आहेत त्यांचे कान उघडले जाणार का हे पाहावं लागेल.
Published at : 06 Apr 2022 10:17 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
मुंबई
मुंबई
नाशिक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
