एक्स्प्लोर
Mutual Fund SIP : 25000 हजारांची एसआयपी दरवर्षी 10 टक्क्यांनी स्टेप अप केल्यास 10 वर्षात किती परतावा मिळणार? जाणून घ्या
Mutual Fund SIP : म्युच्यूअल फंडमध्ये एसआयपीच्या माध्यमातून ठराविक रक्कम दरमहा गुंतवणूक केली जाते. दरवर्षी 10 टक्के स्टेपअप केल्यास 10 वर्षात किती रक्कम जमा होऊ शकते.

एसआयपी कॅल्क्यूलेटर
1/5

मुच्यूअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यासाठी दोन पर्याय उपलब्ध असतात. म्युच्यूअल फंडमध्ये एसआयपी आणि लम्पसम अशा प्रकारे गुंतवणूक करता येते. म्युच्यूअल फंडमध्ये चांगला परतावा मिळवायचा असल्यास किमान 5 वर्ष गुंतवणूक केली पाहिजे, असं तज्ज्ञांकडून सांगितलं जातं.
2/5

एसआयपीद्वारे दरमहा ठराविक रक्कम म्युच्यूअल फंडमध्ये गुंतवल्यांनतर संबंधित फंडकडून यूनिट अलॉट केले जातात. लम्पसममध्ये तुम्ही एकाच वेळी ठराविक रक्कम म्युच्यूअल फंडमध्ये गुंतवू शकता. म्युच्यूअल फंडमध्ये जी रक्कम गुंतवली जाते त्यावर कम्पाऊंडिंग नुसार परतावा मिळत असतो.
3/5

भारतीय शेअर बाजारात डिसेंबर महिन्यात एसआयपीद्वारे 26 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. म्युच्यूअल फंडमधील गुंतवणुकीत एसआयपीचा वाटा महत्त्वाचा आहे. एकीकडे विदेशातील गुंतवणूकदार भारतीय बाजारातून पैसे काढून घेत असताना भारतीय गुंतवणूकदार मात्र प्रगल्भपणे गुंतवणूक करत आहेत, असं दिसून येतं.
4/5

जर तुम्ही 25000 रुपयांची एसआयपी सुरु केली आणि दरवर्षी 10 टक्क्यांनी त्यामध्ये वाढ करत गेल्यास आणि 12 टक्के सीएजीआर पकडल्यास 10 वर्षात 47 लाख 81 हजार 227 रुपयांची गुंतवणूक जमा होईल. तर, त्यावर परतावा 36 लाख 54 हजार 588 रुपये परतावा मिळू शकतो. 10 वर्षानंतर एकूण 84 लाख 35 हजार 816 रुपये जमा होतील.
5/5

जर 25 हजार रुपयांची एसआयपी सुरु ठेवल्यास 10 वर्षात 30 लाख रुपयांची गुंतवणूक होईल. 12 टक्के सीएजीआरपासून तर, परतावा 28 लाख 8 हजार 477 रुपयांचा परतावा मिळेल. एकूण 58 लाख 8 हजार 477 रुपयांचा निधी 10 वर्षानंतर जमा होईल. (टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
Published at : 14 Jan 2025 01:07 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
