एक्स्प्लोर
Upcoming Films May Beat Pushpa 2: 'पुष्पा'भाऊचा रेकॉर्ड चक्काचूर करू शकतात 'या' 5 फिल्म्स; बॉक्स ऑफिसवर करतील कब्जा
Upcoming Films May Beat Pushpa 2: 'पुष्पा 2' हा भारतातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे. पण पुष्पा 2 चा रेकॉर्ड मोडू शकणारे अनेक चित्रपट सध्या पाईपलाईनमध्ये आहेत.

Upcoming Films May Beat Pushpa 2
1/5

सिकंदर : यादीतील पहिलं नाव 'सिकंदर' आहे. बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानच्या चित्रपटाचा पहिला टीझर रिलीज झाला आहे, जो चाहत्यांना खूप आवडला. एआर मुरुगदास दिग्दर्शित हा चित्रपट यावर्षी ईदला प्रदर्शित होऊ शकतो.
2/5

बॉर्डर 2 : 1997 चा हिट चित्रपट 'बॉर्डर'च्या सिक्वेलची प्रेक्षक बऱ्याच काळापासून वाट पाहत होते. अलिकडेच, सनी देओल स्टारर 'बॉर्डर 2' या चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटात सनी देओल व्यतिरिक्त वरुण धवन आणि दिलजीत दोसांझ हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. सध्या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
3/5

अॅनिमल पार्क : रणबीर कपूरचा 'अॅनिमल' हा चित्रपट 2023 मध्ये प्रदर्शित झाला आणि तो ब्लॉकबस्टर ठरला. आता चाहते 'अॅनिमल पार्क' चित्रपटाच्या सिक्वेलची वाट पाहत आहेत. पहिला भाग ब्लॉकबस्टर झाल्यानंतर, 'अॅनिमल पार्क' कडूनही लोकांना खूप अपेक्षा आहेत.
4/5

किंग : शाहरुख खानच्या 'किंग' चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये मोठी चर्चा आहे. या चित्रपटात त्यांच्यासोबत त्यांची मुलगी सुहाना खानही दिसणार आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
5/5

रामायण : रणबीर कपूरचा पौराणिक चित्रपट 'रामायण' हा बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाचं चित्रीकरण सुरू आहे. या चित्रपटात साई पल्लवी, अरुण गोविल आणि सनी देओल यांसारखे कलाकारही दिसणार आहेत.
Published at : 14 Jan 2025 07:33 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
