एक्स्प्लोर

Walmik Karad Mother : माझ्या लेकाला न्याय मिळाला पाहिजे, सगळे गुन्हे खोटे, वाल्मिकच्या आईची साद

Walmik Karad Mother : माझ्या लेकाला न्याय मिळाला पाहिजे, सगळे गुन्हे खोटे, वाल्मिकच्या आईची साद

 आईसोबत परळीकरांचाही ठिय्या, वाल्मिक कराड समर्थकांची घोषणाबाजी

बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या (Santosh Deshmukh Murder Case) प्रकरणाने राज्याचे वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणात केज पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल आहे. तर मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराडवर (Walmik Karad) खंडणीचा गुन्हा करण्यात आला आहे.  वाल्मिक कराड (Walmik Karad) याच्यावरही मोक्का कायद्यातंर्गत कारवाई करण्याची मागणी होत आहे. त्याच्यावर 302 चा गुन्हा दाखल करावा, यासाठी संतोष देशमुख यांचे कुटुंबीय आणि विरोधकांचा दबाव दिवसेंदिवस वाढत आहे. तर दुसरीकडे वाल्मिक कराडच्या मातोश्री आता मैदानात उतरल्या आहेत. लेकाच्या न्यायासाठी वाल्मिक कराडच्या मातोश्रींनी परळी पोलीस स्टेशनबाहेर (Parli Police Station) ठिय्या आंदोलनास सुरुवात केली आहे. 

वाल्मिक कराडला याआधी 14 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावण्यात आली होती. आज वाल्मिक कराडला केज जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले जाणार आहे. वाल्मिक कराडला सीआयडी कोठडी मिळणार की न्यायालयीन कोठडी? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असतानाच वाल्मिक कराडच्या मातोश्री आता मैदानात उतरल्या आहेत. लेकाच्या न्यायासाठी परळी पोलीस स्टेशनबाहेर त्यांनी ठिय्या आंदोलनास सुरुवात करण्यात आली आहे. राजकीय सूडबुद्धीने आणि जातीय द्वेषातून कारवाई होत असल्याचे मत वाल्मिक कराडच्या आईने व्यक्त केले आहे. 

परळीकरांचा सामूहिक आत्मदहनाचा इशारा 

दरम्यान, संतोष देशमुख प्रकरणात जातीय द्वेषातून राजकीय दबावापोटी कार्यवाही न करता निष्पक्षपणे चौकशी करावी अन्यथा आत्मदहन करू, असा इशारा देत परळीकरांनी पोलीस निरीक्षकांना निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, स्व. संतोष भैय्या देशमुख यांची हत्या झाली त्यामध्ये पोलिस प्रशासनाने आरोपी अटक केलेली आहेत. महाराष्ट्र सरकारने नियुक्त केलेल्या तपासयंत्रणा योग्य तो तपास करत आहेत. आवश्यक ते पुरावे असतील आवश्यक असलेले आरोपी असतील त्यांना अटकही केलेलं आहे. प्रत्येक गोष्टीची मिडीया ट्रायल, परळी व बीड जिल्ह्याची बदनामी करून जातीयद्वेष पसरवत आहेत त्यामुळे सामाजिक सलोखा बिघडत आहे. 

प्रत्येकजण जातीय चष्म्यातून ऐकमेकाला पहात आहेत. येणाऱ्या काळात खुप वाईट सामाजिक परिणाम भोगावे लागतील. त्यामुळे पोलीस प्रशासन व शासकीय यंत्रणेने यावर पाबंदी आणण्याची आवश्यकता आहे. तपासयंत्रणेला तपास योग्य पद्धतीने करू द्यावा, सदरील प्रकरणाची मिडीया ट्रायल थांबवावी, राजकीय सूडबुद्धीने अथवा जातीय द्वेषातून दबावाला पोलीस प्रशासनाने बळी पडु नये. एखाद्या प्रकरणात आंदोलन करणे हा प्रत्येक भारतीयांचे हक्का आहे. परंतु विनाकारण राजकीय दबाव वाढवणे, जातीय द्वेष पसरविणे थांबविले पाहिजेत. राजकीय व जातीय द्वेषातून दबावाला बळी पडून पोलीस प्रशासन कार्यवाही करत असतील तर आम्ही परळीकर रामुहिक आमदहन करण्याचा पोलीस प्रशासनाला या निवेदनाद्वारे इशारा देत आहोत. याची प्रशासनाने दखल घ्यावी, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. 

महाराष्ट्र व्हिडीओ

Ravindra Chavan on KDMC : KDMC मध्ये सत्तेसाठी मनसे शिंदेंसोबत; रविंद्र चव्हाण म्हणाले...
Ravindra Chavan on KDMC : KDMC मध्ये सत्तेसाठी मनसे शिंदेंसोबत; रविंद्र चव्हाण म्हणाले...
आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Santosh Nalawade On Raj Thackeray-Uddhav Thackeray: मनसेची फसवणुक झाली, केसाने गळा कापला...; लालबागच्या शिवडीमधील संतोष नलावडेंची पोस्ट, नेमकं काय काय म्हटलं?
मनसेची फसवणुक झाली, केसाने गळा कापला...; लालबागच्या शिवडीमधील संतोष नलावडेंची पोस्ट, नेमकं काय काय म्हटलं?
Pune : बारामती, दौंड तालुक्यात शरद पवारांच्या गटाला एकही जागा नाही, सगळ्या जागा अजितदादा लढवणार
बारामती, दौंड तालुक्यात शरद पवारांच्या गटाला एकही जागा नाही, सगळ्या जागा अजितदादा लढवणार
मुंबई जमगई... रात्रीच्या अंधारात लाल दिवे अन् वाहनांच्या रांगाच रांगा; अग्निशमन गाडीही अडकली
मुंबई जमगई... रात्रीच्या अंधारात लाल दिवे अन् वाहनांच्या रांगाच रांगा; अग्निशमन गाडीही अडकली
भाजपला सोडून ठाकरेंकडे आल्या, आता फुटल्या?; कोण आहेत मुंबईच्या नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के
भाजपला सोडून ठाकरेंकडे आल्या, आता फुटल्या?; कोण आहेत मुंबईच्या नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के
ABP Premium

व्हिडीओ

Sarita Mhaske Mumbai : काल शिंदे गटात, आज पुन्हा सरिता म्हस्के ठाकरे गटात, नेमकं काय घडलं?
Ravindra Chavan on KDMC : KDMC मध्ये सत्तेसाठी मनसे शिंदेंसोबत; रविंद्र चव्हाण म्हणाले...
Special Report Mumbra Sahar Shaikh : 'कैसा हराया..', विजयाचा गुलाल, मुंब्रा करणार हिरवा?
Tuljapur Temple Donation Issue : भक्ताची अंगठी, अडवणुकीची घंटी; मंदिर प्रशासनाचा अजब ठराव
Chandrapur Congress On Mahapalika Election : गटबाजीचा पूर 'हात'चं जाणार चंद्रपूर Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Santosh Nalawade On Raj Thackeray-Uddhav Thackeray: मनसेची फसवणुक झाली, केसाने गळा कापला...; लालबागच्या शिवडीमधील संतोष नलावडेंची पोस्ट, नेमकं काय काय म्हटलं?
मनसेची फसवणुक झाली, केसाने गळा कापला...; लालबागच्या शिवडीमधील संतोष नलावडेंची पोस्ट, नेमकं काय काय म्हटलं?
Pune : बारामती, दौंड तालुक्यात शरद पवारांच्या गटाला एकही जागा नाही, सगळ्या जागा अजितदादा लढवणार
बारामती, दौंड तालुक्यात शरद पवारांच्या गटाला एकही जागा नाही, सगळ्या जागा अजितदादा लढवणार
मुंबई जमगई... रात्रीच्या अंधारात लाल दिवे अन् वाहनांच्या रांगाच रांगा; अग्निशमन गाडीही अडकली
मुंबई जमगई... रात्रीच्या अंधारात लाल दिवे अन् वाहनांच्या रांगाच रांगा; अग्निशमन गाडीही अडकली
भाजपला सोडून ठाकरेंकडे आल्या, आता फुटल्या?; कोण आहेत मुंबईच्या नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के
भाजपला सोडून ठाकरेंकडे आल्या, आता फुटल्या?; कोण आहेत मुंबईच्या नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के
ठाकरेंचे नगरसेवक म्हणत उदय सामंतांचं सूचक वक्तव्य; दावोसहून महाराष्ट्रात आल्यानंतर राजकीय MOU
ठाकरेंचे नगरसेवक म्हणत उदय सामंतांचं सूचक वक्तव्य; दावोसहून महाराष्ट्रात आल्यानंतर राजकीय MOU
Sarita Mhaske : मुंबईतील ठाकरे गटाची पहिली नगरसेविका फुटली, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, कुणाच्या गळाला लागली?
मुंबईतील ठाकरे गटाची पहिली नगरसेविका फुटली, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, कुणाच्या गळाला लागली?
मुंबईतील कंपन्यांशी स्वित्झर्लंडमध्ये जाऊन करार का? दावोस दौऱ्यावरुन काँग्रेसचा सवाल, कंपन्यांचा मुंबईतला पत्ताच सांगितला
मुंबईतील कंपन्यांशी स्वित्झर्लंडमध्ये जाऊन करार का? दावोस दौऱ्यावरुन काँग्रेसचा सवाल, कंपन्यांचा मुंबईतला पत्ताच सांगितला
'एक तास वाट बघायला लावली', नाना पाटेकर तिरमिरीत निघून गेले; ओ रोमिओच्या ट्रेलर लॉन्चवेळी नेमकं काय घडलं? विशाल भारद्वाज यांनी सगळं सांगितलं!
'एक तास वाट बघायला लावली', नाना पाटेकर तिरमिरीत निघून गेले; ओ रोमिओच्या ट्रेलर लॉन्चवेळी नेमकं काय घडलं? विशाल भारद्वाज यांनी सगळं सांगितलं!
Embed widget