एक्स्प्लोर
Madha Lok Sabha Seat : माढ्यातील मतदारांनी दरवेळी नवा खासदार दिल्लीला पाठवला, शरद पवार ते धैर्यशील मोहिते पाटील,यंदाही तो ट्रेंड कायम
Madha Lok Sabha Seat : माढा लोकसभा मतदारसंघात भाजपच्या रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना पराभव स्वीकारावा लागला. माढ्यातून भाजपकडून ते दुसऱ्यांदा लोकसभेच्या रिंगणात होते.

शरद पवार धैर्यशील मोहिते पाटील
1/5

2009 ची लोकसभा निवडणूक ही मतदारसंघ फेररचनेनंतरची पहिली निवडणूक होती. बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे निवडणूक लढवत असल्यानं शरद पवारांनी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यावेळी शरद पवारांनी महादेव जानकर आणि सुभाष देशमुख यांना पराभूत केलं.
2/5

राज्यासह देशभरात मोदी लाट असताना देखील माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे विजयसिंह मोहिते पाटील विजयी झाले.विजयसिंह मोहिते पाटील यांनी त्यावेळी सदाभाऊ खोत यांचा पराभव केला होता.
3/5

माढ्यातून 2019 च्या लोकसभा निवडणुकीत रणजितसिंह नाईक निंबाळकर विजयी झाले. त्यावेळी पहिल्यांदा माढ्यावर भाजपचा झेंडा फडकला. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी राष्ट्रवादीच्या संजयमामा शिंदे यांचा पराभव केला होता.
4/5

2024 च्या लोकसभा निवडणुकीत धैर्यशील मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातून निवडणूक लढवली. त्यांनी भाजपच्या रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचा पराभव केला.
5/5

माढा लोकसभा मतदारसंघाला प्रत्येक निवडणुकीत नवा खासदार मिळाला आहे. माढा लोकसभा मतदारसंघ राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा असून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांच्यासाठी प्रतिष्ठेचा बनला होता.
Published at : 07 Jun 2024 06:06 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
मुंबई
महाराष्ट्र
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
