एक्स्प्लोर
Kurla Bus Accident: वाऱ्याच्या वेगाने आली, नागरिक सैरावैरा पळाले; अंगावर काटा आणणारा कुर्ला बेस्ट बस अपघाताचा थरार
Kurla Bus Accident: संजय मोरे या बस चालकाला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Kurla Bus Accident
1/9

मुंबईतल्या कुर्ला बेस्ट अपघातात (Kurla Best Bus Accident) 5 जणांचा मृत्यू झाला आहे. काल (9 डिसेंबर) रात्री भरधाव बेस्ट बसने अनेकांना धडक दिली.
2/9

कुर्ला एलबीएस मार्गावरच्या मार्केटमध्ये भरधाव वेगानं शिरलेल्या बेस्ट बसनं अनेकांना धडक दिली. ही धडक एवढी तीव्र होती की यात 5 जणांचा मृत्यू झालाय.
3/9

30 ते 35 जण गंभीर जखमी झालेत. जेव्हा हा अपघात घडला तेव्हा अपघातग्रस्त बस मध्ये तब्बल 60 प्रवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
4/9

या प्रकरणी बस चालक संजय मोरे(54) या बस चालकाला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
5/9

या अपघातात गस्तीवर असलेले चार पोलिस आणि एमएसएफ जवान ही जखमी झाले आहेत. यातील पीएसआय प्रशांत चव्हाण या जखमी अधिकाऱ्याच्या फिर्यादीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाई कुर्ला पोलीस करीत आहे.
6/9

सीसीटीव्हीमधील फुटेजमध्ये नागरिक सैरावैरा पळताना दिसत आहेत.
7/9

वाऱ्याच्या वेगाने आलेली बस माणसांसह वाहनांना चिरडत पुढे जाताना दिसते.
8/9

सदर बसने 7 ते 8 गाड्यांना उडवलं. यामध्ये दोन ते तीन रिक्षा होत्या. त्यानंतर दोन टेम्पो आणि गाड्यांना उडवत बस मार्केटमध्ये घुसली, असं प्रत्यक्षदर्शीने सांगितलं.
9/9

अपघात झाला तेव्हा एक महिलेचा जागेवरच मृत्यू झाला होता. ती महिला बस आणि एका गाडीच्यामध्ये अडकल्याने तिचा मृत्यू झाला. काही मुलांना लगेच बाहेर काढलं. त्यानंतर मार्केटजवळ दोन जणांचा जागीच मृत्यू झाला होता, असं प्रत्यक्षदर्शी अजीम अन्सारी यांनी दिली.
Published at : 10 Dec 2024 07:38 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
नाशिक
नाशिक
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion