एक्स्प्लोर
IPO : पैसे तयार ठेवा, 2025 मध्ये शेअर बाजारात आयपीओची रांग लागणार,90 कंपन्यांकडून ड्राफ्ट दाखल
IPO Update : भारताच्या शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात आयपीओ येण्याची शक्यता आहे. त्यामुळं गुंतवणूकदारांना कमाईची मोठी संधी आहे.

आयपीओ अपडेट
1/5

2024 प्रमाणं 2025 मध्ये देखील भारतीय शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात आयपीओ लिस्ट होण्याची शक्यता आहे. कोटक इन्वेस्टमेंट बँकिंगच्या रिपोर्टनुसार शेअर बाजारात आयपीओ आणण्यासाठी 90 हून अधिक कंपन्यांनी सेबीकडे ड्राफ्ट सादर केले आहेत.
2/5

भारतीय शेअर बाजारात गेल्या वर्षी म्हणजेच 2024 मध्ये 91 कंपन्यांनी जवळपास 1.60 लाख कोटी रुपयांची उभारणी केली. बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या सहायक कंपन्यांचे आयपीओ देखील शेअर बाजारात आले.
3/5

गेल्या वर्षी आयपीओ, फॉलोऑन ऑफर, क्वालिफाइड इन्स्टिट्यूशनल प्लेसमेंट सह फर्म्सनी इक्विटी बाजारातून 3.73 लाख कोटी रुपये उभारणी केली होती.
4/5

एलजी इलेक्ट्रॉनिक्स देखील भारतीय शेअर बाजारावर लक्ष ठेवून असून त्यांच्याकडून आयपीओ आणला जाऊ शकतो. एलजीचे सीईओ जू-वान यांनी भारतीय बाजारात कंपनीचा आयपीओ आणण्याचा निर्णय घेतला आहे.
5/5

रिपोर्टनुसार 90 हून अधिक कंपन्यांनी बाजार नियामक संस्था सेबीकडे ड्राफ्ट हेरिंग रेड प्रॉस्पेक्टस दाखल केले आहेत. कोटक सिक्युरिटीजनुसार भारताची आर्थिक स्थिती चांगली आहे. त्यामुळं आयपीओच्या माध्यमातून गुंतवणूक करण्यासाठी ही चांगली संधी ठरु शकते. (टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
Published at : 11 Jan 2025 03:15 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
शिक्षण
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
