एक्स्प्लोर
शेतकऱ्यांनो मुगाचे हे वाण शेतात लावा आणि व्हा श्रीमंत!
मूग शेती ही कमी खर्चात जास्त पैसे देतो. मुगाचे mh1142 हे नवे वाण लावल्यास शेतकऱ्यांना आणखी जास्त नफा होऊ शकतो. या वाणाची लागवण केल्यानंतर जास्त पैसे खर्च करण्याची गरज नाही.

moong farming (फोटो सौजन्य- एबीपी नेटवर्क, freepik)
1/5

आधुकनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर आज शेती सोपी आणि किफायतशीर झाली आहे. आता मूग या पिकाच्या MH1142 या वाणामुळे शेतकऱ्यांना मूग शेती करताना भरघोस फायदा होऊ शकतो.
2/5

या वाणाची रोगप्रतिकाशक्ती इतर वाणांच्या तुलनेच चांगली आहे. हे वाण स्वत:चे बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण करते. विशेष म्हणजे लागवण केल्यानंतर अवघ्या 63 ते 70 दिवसांत हे पिक काढणीला येते.
3/5

मुगाची शेती खरीप हंगामात केली जाते. या वाणाची एक विशेषता म्हणजे या वाणाचे प्रत्येक झाड सोबतच काढणीला येते. या वाणाची पाने कमी पसरतात तसेच त्यांच्या झाडांची मर्यादित वाढ होते.
4/5

63 ते 70 दिवसांत काढणीला येणारे हे वाण प्रदेश आणि मातीतील फरकानुसार 12 क्विंटल ते 20 क्विंटल प्रति हेक्टर उत्त्पन्न मिळवून देते.
5/5

या वाणाची जास्त वाढ होत नसल्यामुळे मुगाची काढणी झाल्यानंतर उर्वरित अवशेषांना जाळण्याचीही गरज भासत नाही. मुगाच्या झाडाचे अवशेष शेतातच कुजून जातात. त्याचा फायदा पुढील पिकास होतो. (वरील लेख हा प्राथमिक माहितीवर आधारित आहे. प्रत्यक्ष शेती करायची असल्यास या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा आणि मगच शेती करावी.)
Published at : 06 May 2024 04:54 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
आयपीएल
मुंबई
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
