एक्स्प्लोर
Gold Rate Today : सोन्या-चांदीच्या दरात वाढ सुरुच; वाचा तुमच्या शहरातील दर
Gold Rate Today : आंतरराष्ट्रीय तसेच भारतीय बाजारात मौल्यवान धातूंच्या किंमती कमी जास्त पाहायला मिळतात.

Gold Rate Today
1/9

आंतरराष्ट्रीय बाजारात व्याजदराचा परिणाम सोन्या-चांदीच्या दरावर देखील पडला आहे. यामुळे सोन्याच्या दराने उच्चांक पातळी गाठली आहे.
2/9

भारतात लगन्सराईचे दिवस सुरु असताना सोन्याच्या दरात झालेली ही वाढ ग्राहकांसाठी फारच खर्चिक झाली आहे.
3/9

याचा परिणाम ऐन लग्नसराईत ग्राहकांनी मौल्यवान धातूंची खरेदी करण्याकडे पाठ फिरवली आहे. ज्या ग्राहकांना सोन्याची खरेदी करणं शक्य आहे तेच ग्राहक सोने खरेदी करतायत.
4/9

तर, सोन्याच्या वाढलेल्या दरामुळे काही ग्राहकांनी वेट अॅन्ड वॉचची भूमिकादेखील घेतली आहे.
5/9

आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स दर 0.55 टक्क्यांनी वाढ होऊन 24 कॅरेट सोन्याचा दर 53,820 रूपयांवर आला आहे.
6/9

तर, एक किलो चांदीचा दर 66,230 रुपयांनी व्यवहार करत आहे.
7/9

सोन्याचे हे वाढलेले दर मुंबई, पुण्यासह, नाशिक, नागपूर, आणि कोलकत्तामध्येही सारखेच आहेत. त्यामुळे ग्राहकांसाठी एक प्रकारे ही चिंतेची बाब आहे.
8/9

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरात वाढ दिसून येत आहे. स्पॉट गोल्ड $ 24.58 ने वाढून $ 1,798.05 प्रति औंस वर आहे.
9/9

इंडियन बुलियन अॅंड ज्वेलर्स असोसिए शनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन किंमत तपासू शकता. तुम्ही ज्या नंबरवरून मेसेज कराल त्याच नंबरवर तुम्हाला मेसेज येईल.
Published at : 03 Dec 2022 12:08 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
भारत
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
