एक्स्प्लोर
Shani Dev: शनीची साडेसाती कधीपर्यंत त्रास देणार? मेष ते मीन 12 राशीवर कधीपर्यंत अशुभ प्रभाव असणार? ज्योतिषशास्त्रात म्हटलंय..
Shani Dev: ज्योतिषशास्त्रात शनि ग्रहाचे विशेष महत्त्व आहे, ज्याचे शुभ आणि अशुभ प्रभाव वेळोवेळी 12 राशींवर पडतात. 12 राशीच्या लोकांवर शनीच्या साडेसातीचा किती काळ राहील? जाणून घ्या..

Shani Dev Astrology marathi news How long will Shani sade sati cause trouble effect on 12 zodiac signs from Aries to Pisces
1/12

मेष राशीच्या लोकांसाठी 29 मार्च 2025 ते 31 मे 2032 या कालावधीत साडेसाती राहील. या काळात त्यांना काही अडचणींचा सामना करावा लागेल. विशेषत: तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा आणि घाईघाईने कोणताही निर्णय घेणे टाळा.
2/12

वृषभ राशीवर शनीच्या साडेसातीचा प्रभाव 3 जून 2027 ते 13 जुलै 2034 पर्यंत राहील. या काळात जीवनात विविध चढ-उतार येतील. त्यामुळे मन शांत ठेवा आणि कोणताही निर्णय शहाणपणाने घ्या.
3/12

मिथुन राशीवर शनीची साडेसाती 8 ऑगस्ट 2029 ते 27 ऑगस्ट 2036 पर्यंत राहील. या काळात तुमची फसवणूक होऊ शकते, ज्यामुळे मानसिक तणाव वाढेल. याशिवाय आर्थिक नुकसान आणि कौटुंबिक त्रासही होईल.
4/12

कर्क - 31 मे 2032 ते 22 ऑक्टोबर 2038 पर्यंत या राशीवर शनि साडेसातीमध्ये असेल. या काळात तुम्हाला तणाव, चिडचिड आणि नातेसंबंधातील त्रास इत्यादी समस्यांना सामोरे जावे लागेल.
5/12

सिंह -13 जुलै 2034 ते 29 जानेवारी 2041 पर्यंत सिंह राशीच्या लोकांवर शनीची साडेसाती राहील. या काळात तुम्हाला पैशाच्या बाबतीत खूप काळजी घ्यावी लागेल. अन्यथा कोणीतरी तुमची फसवणूक करू शकते.
6/12

कन्या - 27 ऑगस्ट 2036 ते 12 डिसेंबर 2043 या कालावधीत या राशीवर साडेसाती होणार आहे. या काळात तुम्हाला व्यवसायात नुकसान आणि कर्ज फेडण्यात अडचणी येतील.
7/12

तूळ - 22 ऑक्टोबर 2038 ते 8 डिसेंबर 2046 या कालावधीत शनि तूळ राशीत साडेसाती असेल. या काळात तुम्ही प्रत्येक विषयावर भावूक व्हाल, त्यामुळे चिंता आणि तणावाची समस्या तुम्हाला त्रास देईल.
8/12

वृश्चिक - 28 जानेवारी 2041 ते 3 डिसेंबर 2049 या कालावधीत शनि साडेसाती असेल. या काळात संयमाच्या अभावामुळे तुमचे बोलणे कडू होईल. याशिवाय गंभीर दुखापत होण्याचीही शक्यता आहे.
9/12

धनु - 12 डिसेंबर 2043 ते 24 फेब्रुवारी 2052 या कालावधीत धनु राशीच्या लोकांवर साडेसातीचा अशुभ प्रभाव राहील. या काळात कामाच्या ठिकाणी भांडणे होतील. याशिवाय तुमचा स्वभाव पूर्वीपेक्षा जास्त क्रोधित होईल.
10/12

मकर - सध्या मकर राशीवर शनीची साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू आहे, जो 29 मार्च 2025 रोजी संपणार आहे. या काळात तुम्हाला तुमच्या कर्माचे चांगले आणि वाईट असे दोन्ही फळ मिळतील. यावेळी तुम्ही कोणतेही चुकीचे काम केल्यास तुम्हाला शनीच्या प्रकोपाचा सामना करावा लागेल.
11/12

कुंभ - 24 जानेवारी 2020 ते 3 जून 2027 या कालावधीत शनीची साडेसाती तुमच्यावर असेल. या काळात आरोग्याच्या समस्या तुम्हाला सतावतील.
12/12

कुंभ - 24 जानेवारी 2020 ते 3 जून 2027 या कालावधीत शनीची साडेसाती तुमच्यावर असेल. या काळात आरोग्याच्या समस्या तुम्हाला सतावतील.
Published at : 23 Feb 2025 09:13 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion