सौदी अरेबियात 25 भारतीयांसह 35 जण ओलीस, राजस्थानच्या सोहनलालची प्रकृती चिंताजनक
Hostage in Saudi Arabia : सौदी अरेबियामध्ये ओलीस ठेवण्यात आलेल्या भारतीय नागरिकांमध्ये राजस्थान, बिहार, दिल्ली, उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांचा समावेश आहे. ओलीस ठेवलेल्यांना कंपनीने बाहेर काहीही सांगण्याची धमकी दिली आहे.
![सौदी अरेबियात 25 भारतीयांसह 35 जण ओलीस, राजस्थानच्या सोहनलालची प्रकृती चिंताजनक rajasthan 25 indian among 35 people made hostage in saudi arabia one of them from rajasthan in critical condition सौदी अरेबियात 25 भारतीयांसह 35 जण ओलीस, राजस्थानच्या सोहनलालची प्रकृती चिंताजनक](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/22/8ceed657a19909cbb3992db012283162_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Hostage in Saudi Arabia : सौदी अरेबियातील यंबू शहरात 25 भारतीय नागरिकांसह 35 जणांना ओलीस ठेवण्यात आले आहे. ओलीस ठेवलेल्यांमध्ये राजस्थानचा रहिवासी असलेल्या सोहनलालची प्रकृती चिंताजनक आहे. राजस्थानमधील टोंक जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या सोहनलाल बैरवा यांचा पासपोर्ट क्रमांक K5850453 आहे. ओलीस ठेवल्यानंतर सोहनलालची तब्येत बिघडली आहे. परंतु, अनेक दिवसांपासून त्याला उपचार मिळाले नाहीत. परिस्थिती बरीच बिघडल्यानंतर आता सोहनलाल यांना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. परंतु, रुग्णालयात योग्य उपचार आणि औषधेही उपलब्ध नाहीत, अशी माहिती मिळाली आहे.
बुंदीचे रहिवासी चर्मेश शर्मा यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्याकडे परराष्ट्र मंत्रालयात तक्रार केली आहे. तक्रारीत त्यांनी भारत सरकारकडे सर्व भारतीय नागरिकांची सुटका करावी आणि राजस्थानमधील सोहनलाल या आजारी असलेल्या भारतीय नागरिकाचा जीव वाचवावा अशी मागणी केली आहे. शर्मा यांनी 25 भारतीय नागरिकांसह नेपाळ, बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंकेतील बंधक असलेल्या इतर दहा नागरिकांना मानवतावादी आधारावर मदत देण्याची मागणी केली आहे.
सौदी अरेबियाच्या अलजहरानी कंपनीने सर्व लोकांचे व्हिसाचे नूतनीकरण केले नसल्याचा आरोप आहे. व्हिसाचे नूतनीकरण न केल्यामुळे, सौदी अरेबियामध्ये राहण्याचा वैध दस्तऐवज इकामा कालबाह्य झाला आहे. कंपनीने कट रचून 25 भारतीयांसह 35 जणांना सौदी अरेबियाचे अवैध नागरिक बनवले. बेकायदेशीर नागरिक झाल्यानंतर गेल्या दोन वर्षांपासून सर्वांना बंधनकारक केले जात होते. काही दिवसांपूर्वी त्यांनी व्हिसा नूतनीकरण करून इकामा बनवून कुटुंबाला घरी पाठवण्याची मागणी केली असता, कंपनीने बळजबरीने सर्व 35 जणांना ओलीस ठेवले.
सौदी अरेबियामध्ये ओलीस ठेवण्यात आलेल्या भारतीय नागरिकांमध्ये राजस्थान, बिहार, दिल्ली, उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांचा समावेश आहे. ओलीस ठेवलेल्यांना कंपनीने बाहेर काहीही सांगण्याची धमकी दिली आहे.
ओलीस ठेवलेल्यांमध्ये, जयपूर येथील मजूर सरफुद्दीन, भरतपूर येथील मजूर विश्राम जाटव आणि बुंदी जिल्ह्यातील नैनवा येथील रहिवासी अब्दुल गफ्फार यांनी याबाबत माहिती दिली आहे. माहिती मिळाल्यानंतर विश्राम जाटव आणि गफ्फार यांनी परदेशात अडचणीत सापडलेल्या भारतीयांच्या मदतीसाठी काम करणाऱ्या बुंदी येथील चर्मेश शर्मा यांची भेट घेतली. शर्मा यांनी रूग्णालयात दाखल असलेल्या सोहनलाल यांच्याशीही बोलण्याचा प्रयत्न केला, परंतु श्वासोच्छवासाच्या त्रासामुळे ते बोलण्याच्या स्थितीत नाहीत.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)