एक्स्प्लोर

China Taiwan : तैवानची 6 बाजूंनी नाकेबंदी, चीन लष्कराकडून जल आणि हवाई क्षेत्रात गोळीबार सुरू

China Taiwan : चीनच्या सरकारी टेलिव्हिजनने वृत्त दिले की, चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने तैवानच्या परिसरातील जल आणि हवाई क्षेत्रात थेट गोळीबार सुरू केला आहे.

China Taiwan : अमेरिकन सिनेटच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी  (Nancy Pelosi Taiwan Visit) यांच्या भेटीनंतर चीन आणि तैवानमध्ये तणावाचे वातावरण आहे. आता प्रश्न पडतोय की चीन काय करणार आहे? याकडे अवघ्या जगाचं लक्ष लागलं आहे. गार्डियन वृत्तानुसार, फ्लाइट ट्रॅकर्सवर दोन अज्ञात विमाने दिसू लागली आहेत आणि ते तैवानच्या दक्षिणेकडील किनारपट्टीवर फिरत असल्याचं समोर आलं आहे. 

चीनी लष्कराकडून थेट गोळीबार सुरू
चीनच्या सरकारी टेलिव्हिजनने गुरुवारी वृत्त दिले की, चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने तैवानच्या आसपासच्या परिसरात जल आणि हवाई क्षेत्रात थेट गोळीबार सुरू केला आहे. तसेच रविवारी दुपारी 12.00 वाजता लष्कराचा सराव संपेल, असं सांगण्यात आले.

चीन प्रथमच 'या' क्षेपणास्त्राचा वापर करणार
तैवानच्या किनार्‍यावरील सरावांमध्ये, चीन प्रथमच DF-17 हायपरसॉनिक क्षेपणास्त्रांचा वापर करेल, असे ग्लोबल टाईम्सच्या अहवालात म्हटले आहे. ही क्षेपणास्त्रे प्रथमच तैवानवरून उड्डाण करतील आणि चिनी सैन्य 12 n च्या आतील भागात प्रवेश करेल.

तैवान-अमेरिकेच्या मैत्रीचा आम्हा सर्वांना अभिमान - नॅन्सी पेलोसी
अमेरिका सिनेटच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी 3 ऑगस्ट रोजी तैवानच्या दौऱ्यावर होत्या. यादरम्यान त्यांनी तेथील राष्ट्राध्यक्ष त्साई इंग-वेन आणि इतर खासदारांची भेट घेतली. राष्ट्रपतींना भेटण्यापूर्वी नॅन्सी यांनी तैवानच्या संसदेलाही संबोधित केले. पेलोसी यांनी तैवानच्या संसदेत सांगितले की, "जगातील सर्वात स्वतंत्र समाजांपैकी एक म्हणून आम्ही तैवानची प्रशंसा करतो." ते म्हणाले की आम्ही तुमचे म्हणणे ऐकण्यासाठी आलो आहोत. तैवानने कोरोनाविरुद्धच्या लढाईत एक आदर्श ठेवला आहे. तैवान-अमेरिकेच्या मैत्रीचा आम्हा सर्वांना अभिमान आहे. असंही त्या म्हणाल्या

चीनने तैवानवर अनेक आर्थिक निर्बंध लादले
दुसरीकडे, अमेरिकेच्या या कृतीमुळे नाराज झालेला चीन कृतीत उतरला आहे. शी जिनपिंग यांच्या वन चायना धोरणाचा पाया डळमळीत होण्याची ही पहिलीच वेळ आहे. तैवानबाबत दोन महासत्ता समोरासमोर येण्याची ही पहिलीच वेळ आहे. या बेथलहाटमध्ये चीनने तैवानवर अनेक आर्थिक निर्बंध लादले. लष्करी सरावही सुरू आहेत. दरम्यान, चीन आता काय करणार आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

UPI अन् ATM वरुन पीएफचे पैसे काढता येणार, केव्हापासून  नवे बदल लागू होणार? अपडेट समोर
UPI अन् ATM वरुन पीएफचे पैसे काढता येणार, केव्हापासून नवे बदल लागू होणार? अपडेट समोर
Ajit Pawar : दुधात भेसळ करणाऱ्यांना मकोका लावणार, कायद्यात दुरुस्ती करणार; अजित पवारांची मोठी घोषणा
दुधात भेसळ करणाऱ्यांना मकोका लावणार, कायद्यात दुरुस्ती करणार; अजित पवारांची मोठी घोषणा
Panhala Fort : पन्हाळा किल्ल्यावरील शिवस्मारकाला 10 कोटींचा निधी मंजूर, कोल्हापूरमधील आमदारांच्या पाठपुराव्याला यश 
पन्हाळा किल्ल्यावरील शिवस्मारकाला 10 कोटींचा निधी मंजूर, कोल्हापूरमधील आमदारांच्या पाठपुराव्याला यश 
कुणाल कामराने अजित पवारांना वादात ओढलं; जुन्या व्हिडिओवर उपमुख्यमंत्र्यांची नवी प्रतिक्रिया
कुणाल कामराने अजित पवारांना वादात ओढलं; जुन्या व्हिडिओवर उपमुख्यमंत्र्यांची नवी प्रतिक्रिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dmart Marathi Language Issue News | 'नाही येत मराठी..', परप्रांतीयांकडून माज, मनसैनिकांनी दाखवला 'मराठी' इंगाSpecial Report | Waghya Dog Statue Issue | 'वाघ्या'चं कारण, जातीवरुन राजकारणSpecial Report | Disha Salian | आरोपांना ड्रग्जची 'दिशा', आदित्य ठाकरेंविरोधात स्फोटक आरोपRajkya Shole | Prashant Koratkar | कोरटकरचा आका कोण?महिनाभर पोलिसांना गुंगारा,कोरटकरला आसरा  कुणाचा?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
UPI अन् ATM वरुन पीएफचे पैसे काढता येणार, केव्हापासून  नवे बदल लागू होणार? अपडेट समोर
UPI अन् ATM वरुन पीएफचे पैसे काढता येणार, केव्हापासून नवे बदल लागू होणार? अपडेट समोर
Ajit Pawar : दुधात भेसळ करणाऱ्यांना मकोका लावणार, कायद्यात दुरुस्ती करणार; अजित पवारांची मोठी घोषणा
दुधात भेसळ करणाऱ्यांना मकोका लावणार, कायद्यात दुरुस्ती करणार; अजित पवारांची मोठी घोषणा
Panhala Fort : पन्हाळा किल्ल्यावरील शिवस्मारकाला 10 कोटींचा निधी मंजूर, कोल्हापूरमधील आमदारांच्या पाठपुराव्याला यश 
पन्हाळा किल्ल्यावरील शिवस्मारकाला 10 कोटींचा निधी मंजूर, कोल्हापूरमधील आमदारांच्या पाठपुराव्याला यश 
कुणाल कामराने अजित पवारांना वादात ओढलं; जुन्या व्हिडिओवर उपमुख्यमंत्र्यांची नवी प्रतिक्रिया
कुणाल कामराने अजित पवारांना वादात ओढलं; जुन्या व्हिडिओवर उपमुख्यमंत्र्यांची नवी प्रतिक्रिया
Maharashtra Live: सोलापूरमध्ये शाळेत लहानग्या मुलीवर शिपायाकडून लैंगिक अत्याचार
Maharashtra Live: सोलापूरमध्ये शाळेत लहानग्या मुलीवर शिपायाकडून लैंगिक अत्याचार
विठ्ठल रुक्मिणीची ऑनलाईन पूजा काही तासांतच फुल्ल, पहिल्याच दिवशी पंढरपूर मंदिराला मिळाले 75 लाख रुपये
विठ्ठल रुक्मिणीची ऑनलाईन पूजा काही तासांतच फुल्ल, पहिल्याच दिवशी पंढरपूर मंदिराला मिळाले 75 लाख रुपये
Sanjay Raut Kunal Kamra :  कुणाल कामराकडून नवा व्हिडिओ शेअर, संजय राऊतांची तीन ओळींची नवी पोस्ट, म्हणाले...
कुणाल कामराकडून नवा व्हिडिओ शेअर, संजय राऊतांची तीन ओळींची नवी पोस्ट, म्हणाले...
'नाद' खुळा... दारुच्या एका बॉटलवर एक फ्री, दुकानांबाहेर ऑफर्सचे बोर्ड; ग्राहकांची गर्दी, बॉक्स भरुन नेले
'नाद' खुळा... दारुच्या एका बॉटलवर एक फ्री, दुकानांबाहेर ऑफर्सचे बोर्ड; ग्राहकांची गर्दी, बॉक्स भरुन नेले
Embed widget