एक्स्प्लोर

वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले

कंपनीत लागलेल्या आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र, कंपनील काही द्रव्यांचा स्फोट झाल्याने आग मोठ्या प्रमाणात पसरल्याचं पाहायला मिळालं.

वर्धा : विदर्भाच्या वर्धा जिल्ह्यातील भूगाव येथील एवोनिथ स्टील कंपनीत भीषण स्फोट झाल्याची घटना घडली असून भूगाव इथल्या कंपनीत फर्निशच्या बाजूला हा स्फोट होऊन मोठी आग (Fire) लागली आहे. कंपनीत कुलिंग प्रोसेसचे काम सुरू असताना स्फोट झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या स्फोटात 17 कामगार जखमी असून यातील काही कामगार गंभीर असल्याची माहिती आहे. स्फोटाच्या (Blast) घटनेनंतर स्थानिकांच्या मदतीने जखमी व गंभीर जखमींना शहरातील सावंगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या दुर्घटनेतील गंभीर जखमींना नागपूरला हलविण्यात येत असल्याची माहिती आहे. दरम्यान, स्फोटाच्या घटनेनंतर अग्निशमन दलास पाचारण करण्यात आलं असून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू होते. 

कंपनीत लागलेल्या आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र, कंपनील काही द्रव्यांचा स्फोट झाल्याने आग मोठ्या प्रमाणात पसरल्याचं पाहायला मिळालं. स्थानिकांनी व अग्निशमन दलाच्या बंबाने आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले. मात्र, आगीने रौद्र रुप धारण केल्याचं दिसून आलं. या दुर्घटनेत कंपनीचे मोठे नुकसान झाल्याचं दिसून येत आहे. दरम्यान, आगीचे लोट दूरपर्यंत पसरल्याने कंपनीतील अनेक वस्तू जळून खाक झाल्या आहेत.

हेही वाचा

शरद पवारांवरील टीका अजित दादांच्या जिव्हारी; महायुतीला थेट इशारा, सदाभाऊंवर जोरदार पलटवार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi : राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवताच नरेंद्र मोदींचा डोनाल्ड ट्रम्प यांना फोन
राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवताच नरेंद्र मोदींचा डोनाल्ड ट्रम्प यांना फोन
Deepak Kesarkar : ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
भाजपाचे बंडखोर स्वत:चेच चिन्ह विसरले; कार्यकर्त्यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन, लक्षात येताच गोंधळले
भाजपाचे बंडखोर स्वत:चेच चिन्ह विसरले; कार्यकर्त्यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन, लक्षात येताच गोंधळले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sadabhau Khot Special Report : सदाभाऊ खोत यांची पवारांवर टीका,राष्ट्रवादीच्या नेत्यांचं प्रत्युत्तरZero Hour : महायुतीच्या आधीच अजित दादांच्या राष्ट्रवादीचा स्वतंत्र जाहीरनामाZero Hour:डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा अध्यक्ष ते महायुतीच्या आधी दादांचा जाहीरनामा;झीरो अवरमध्ये चर्चाABP Majha Headlines | 10 PM TOP Headlines | 10 PM 06 November 2024 | एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narendra Modi : राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवताच नरेंद्र मोदींचा डोनाल्ड ट्रम्प यांना फोन
राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवताच नरेंद्र मोदींचा डोनाल्ड ट्रम्प यांना फोन
Deepak Kesarkar : ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
भाजपाचे बंडखोर स्वत:चेच चिन्ह विसरले; कार्यकर्त्यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन, लक्षात येताच गोंधळले
भाजपाचे बंडखोर स्वत:चेच चिन्ह विसरले; कार्यकर्त्यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन, लक्षात येताच गोंधळले
Varsha Gaikwad : 'भारत जोडो' यात्रेत सहभागी झालेल्या लाखो बहुजनांना देवेंद्र फडणवीस नक्षलवादी समजतात का? वर्षा गायकवाडांचा सवाल
'भारत जोडो' यात्रेत सहभागी झालेल्या लाखो बहुजनांना देवेंद्र फडणवीस नक्षलवादी समजतात का? वर्षा गायकवाडांचा सवाल
मोठी बातमी! शेतकऱ्यांचं 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार, नियमीत कर्जफेड करणाऱ्यांना 50000 चं प्रोत्साहन मिळणार, शरद पवारांची घोषणा
मोठी बातमी! शेतकऱ्यांचं 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार, नियमीत कर्जफेड करणाऱ्यांना 50000 चं प्रोत्साहन मिळणार, शरद पवारांची घोषणा
Rahul Gandhi :  महालक्ष्मी योजना ते जातनिहाय जनगणना, राहुल गांधी यांच्या महाराष्ट्रातील पहिल्या प्रचार सभेत मोठ्या घोषणा
खटाखट, खटाखट, खटाखट, राहुल गांधींचा मुंबईत पुन्हा नारा, महालक्ष्मी योजनेतून महिलांना दरमहा 3 हजार रुपये देणार, कारण सांगितलं
Raju Shetti : लोकसभेला बिघडलं, पण विधानसभेला जमलं; शाहुवाडीत महाविकास आघाडीच्या सत्यजित आबांना राजू शेट्टींचा पाठिंबा!
लोकसभेला बिघडलं, पण विधानसभेला जमलं; शाहुवाडीत महाविकास आघाडीच्या सत्यजित आबांना राजू शेट्टींचा पाठिंबा!
Embed widget