एक्स्प्लोर

Akola News: मंगळसूत्र चोरानं तिचं 'कुंकू'ही हिरावलं; अकोल्यात चोरट्याचा पाठलाग करणं नवऱ्यासाठी जीवघेणं ठरलं

Akola News: अकोल्याच्या रेल्वे स्थानकावरील प्लेटफार्म चारवर रेल्वेतून एक दांपत्य खाली उतरत असताना एका चोरट्याने पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पळ काढला.

Akola News अकोला: अकोल्याची कायदा आणि सुव्यवस्था अक्षरश: वेशीवर टांगली की काय?, असा प्रश्न निर्माण झाला आहे. बायकोच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या चोरट्याचा पाठलाग करणं नवऱ्याला जीवघेणा ठरलाय. पाठलाग करणाऱ्या नवऱ्याला मंगळसूत्र चोरट्यानं बेदम मारहाण केली. आधी डोक्यात दुखपात केली, नंतर चेहऱ्यावर वार करून गंभीर जखमा केल्या. चक्क जीव जाईपर्यंत चोरट्यानं महिलेच्या नवऱ्याला मारलंय. हा संपूर्ण प्रकार अकोल्याच्या रेल्वे स्थानक परिसरात घडला आहे.

नेमके कशी घडली घटना? 

रविवारी रात्री अकोल्याच्या रेल्वे स्थानकावरील प्लेटफार्म चारवर रेल्वेतून एक दांपत्य खाली उतरत असताना एका चोरट्याने पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पळ काढला. मंगळसूत्र चोरट्याचा तिच्या नवऱ्यानं पाठलाग केलाय.. जवळपास आठशे ते नऊशे मीटर पर्यंत पाठलाग सुरुचं होता.. अखेर त्याच्या तावडीत मंगळसूत्र चोरटा आला खरा.. मात्र, या चोरट्याने हातात येईल त्या वस्तूने त्याच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर वार करत गंभीर दुखापत केलीय.. हेमंत गावंडे असे या पाठलाग करणाऱ्या नवऱ्याचं नाव.. अखेर उपचारादरम्यान आज हेमंत गावंडे यांचा मृत्यू झाला.. पोलिसांनी या प्रकरणात गुन्ह्याची वाढ केली असून तपास सुरू केलाय.. या संपूर्ण घटनेचा थरार हेमंतच्या बायकोने सांगितलाय.. मंगळसूत्र न्यायचं असतं, पण नवऱ्याला कशाला मारलं? असा सवाल तिने केला आहे. 

आरोपीला केली पोलिसांनी अटक-

या घटनेनंतर अकोला जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली. पोलीस प्रशासनाने गांभीर्याने तपास सुरू केलाय. आरोपीची सीसीटीव्ही फुटेज देखील पोलिसांनी मिळवले. अवघ्या 24 तासात आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. परमार असं आरोपीचं नाव असून तो मूळचा मध्यप्रदेशातील रहिवासी आहे. 

अकोला पोलीस या प्रश्नांचे उत्तरं देणार का?-

1) अकोल्याच्या रेल्वे स्थानकावर सुरक्षा यंत्रणा काय करत होती?
2) घटनेवेळी प्लेटफार्मवर पोलीस हजर होते? तरं कुठं होते?
3) स्थानकावर खुलेआम फिरणाऱ्या टवाळखोरांवर पोलिसांचं लक्ष नाही का?.
4) अनेकदा प्रवाशांचे सामान चोरी होते? मात्र, तरीही सुरक्षा यंत्रणेत वाढ का नाही?... खरंच चोरट्यांना पोलिसांचा धाक राहला नाही? 
5) महत्वाचं!, सहापैकी ऐकून 3 प्लेटफार्म CCTV.. तर 4, 5 आणि 6 प्लेटफार्मवर CCTV नाही.
6) स्थानिक प्रशासनाच्या भोंगळ कारभारामूळ हेमंत'चा गेला जीव?

घटनेची पालकमंत्री आकाश फुंडकरांकडून दखल-

16 मार्च रोजी रात्री 9 वाजता अकोट येथून हेमंत गावंडे आणि त्यांची पत्नी अकोलाकडे रेल्वेने निघाले.. पावणेदहा वाजता सुमारास अकोला रेल्वे स्थानकावरील प्लेटफार्म क्रमांक चारवर गाडी पोचली. गावंडे दांपत्य रेल्वेतून खाली उतरत असताना त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून चोरट्यानं पळ काढला. या चोरट्याचा पाठलाग हेमंत गावंडे यांनी केला.. काही अंतरावर पाठलाग करत असताना चोरट्यांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. यादरम्यान गावंडे यांना बेदम मारहाण झाली, तसेच त्यांच्या डोक्यावर आणि चेहरा देखील ठेचून काढला. घटनास्थळावर ते रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते.. स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांना तातडीने उपचारासाठी अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेचा अकोला पोलिस गांभीर्याने तपास करतायेत. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुळकर्णी, अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पथक, स्थानिक पोलिसांचे पथकही दाखल झाले होते. दरम्यान, पालकमंत्री आकाश फुंडकर यांनी या घटनेची माहिती घेत, तात्काळ आरोपीला अटक करण्याच्या सूचना दिल्या.. 24 तासात अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनात मारेकऱ्याला अकोल्याच्या एमआयडीसी भागातून अटक करण्यात आलीय. दुपारी आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. 

रेल्वे स्थानकाची सुरक्षा रामभरोसे?-

अकोल्याच्या रेल्वे स्थानकावर एकत्रित 6 प्लेटफार्म आहेत.. त्यापैकी 1, 2, आणि 3 या प्लेटफार्म क्रमांकवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेत. मात्र, 4, 5 आणि 6 प्लेटफार्मवर अजूनही सीसीटीव्ही कॅमेरे नाहीये. अशी माहिती समोर आली आहे. पहिले तीन प्लेटफार्म 'मध्य रेल्वे' अंतर्गत येतात. तर उर्वरित 4, 5 आणि 6 प्लेटफार्म हे 'दक्षिण मध्य रेल्वे' विभागाच्या अंतर्गत येतात. चोरीची घटना रेल्वे स्थानकाच्या चौथ्या प्लॅटफॉर्म घडली असून तिथं सीसीटीव्ही नाही.

अकोल्यात गावगुंडांचा हैदोस-

बीडनंतर आता अकोल्यातही गुंडाराज. अकोल्याची कायदा सुव्यवस्था धाब्यावर बसवल्या गेली आहे. ऐन रस्त्यात दोन गावगुंडांनी व्यवसायिकाला मारहाण केली आहे.‌ रविवारी रात्री 9 वाजताची ही घटना आहे. शहरातील प्रचंड वर्दळीच्या असलेल्या रतनलाल प्लॉट चौकातील ही घटना आहे. एका व्यावसायिकाला दोन गाव गुंडांनी क्रूरपणे मारहाण केली आहे. मारहाण होत असतांना रस्त्यावर बघ्यांची प्रचंड गर्दी झाली होती. मात्र, गर्दीतील कुणीही व्यावसायिकाला वाचवण्यासाठी समोर आलं नाही. विशेष म्हणजे यातील आरोपी अद्याप अटकेत नाही. यामूळे अकोल्यात पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

संबंधित बातमी:

Nagpur violence Devendra Fadnavis: ... त्यांना कदापि माफी नाही, नागपूर दंगलीबाबत मुख्यमंत्र्यांनी हादरवून टाकणारा घटनाक्रम सभागृहात सांगितला!

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Election Results 2026: कायद्याच्या बालेकिल्ल्यात मतदानादरम्यान जोरदार राडा, पण एकही गुन्हा दाखल नाही, चर्चांना उधाण
कायद्याच्या बालेकिल्ल्यात मतदानादरम्यान जोरदार राडा, पण एकही गुन्हा दाखल नाही, चर्चांना उधाण
Pune municipal corporation election results 2026 : याला म्हणतात पुणेकरांचा कार्यकर्त्यांचा कॉन्फिडन्स; निकाल लागण्याआधीच लावले विजयाचे बॅनर, पाहा फोटो
याला म्हणतात पुणेकरांचा कार्यकर्त्यांचा कॉन्फिडन्स; निकाल लागण्याआधीच लावले विजयाचे बॅनर, पाहा फोटो
BMC Bogus Voter : कॅमेऱ्यासमोरच दुबार मतदान? निवडणूक अधिकाऱ्यांची 'चुप्पी', धारावीतील प्रकार एबीपी माझाच्या कॅमेरात कैद
कॅमेऱ्यासमोरच दुबार मतदान? निवडणूक अधिकाऱ्यांची 'चुप्पी', धारावीतील प्रकार एबीपी माझाच्या कॅमेरात कैद
BMC Exit Poll : मनसेला 6 जागा, तर शिंदेंच्या शिवसेनेला 54; मुंबईकरांची झोप उडवणारा एक्झिट पोल समोर
मनसेला 6 जागा, तर शिंदेंच्या शिवसेनेला 54; मुंबईकरांची झोप उडवणारा एक्झिट पोल समोर

व्हिडीओ

Special Report Voting And Fighting : व्होटिंग आणि राजकीय फायटींग, अनेक वॉर्डात बाचाबाची प्रसंग
Special Report Orange Guard :ठाकरे बंधू दक्ष,भगवा गार्डचं लक्ष,मतदान केंद्रावर पोलिसांबरोबर बाचाबाची
BMC Election Exit Poll : मुंबईत भाजप आणि शिवसेनेला 138 जागा मिळणार- एक्झिट पोलचा अंदाज
Uddhav Thackeray Full PC : बाईचं नाव रविंद्र असतं का? लोकशाही पुसली जातेय; मतदानानंतर ठाकरेंचा घणाघात
Akola Voting : अकोल्यात बुरखाधारी महिलांची तपासणी न करता सोडलं जातंय

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Election Results 2026: कायद्याच्या बालेकिल्ल्यात मतदानादरम्यान जोरदार राडा, पण एकही गुन्हा दाखल नाही, चर्चांना उधाण
कायद्याच्या बालेकिल्ल्यात मतदानादरम्यान जोरदार राडा, पण एकही गुन्हा दाखल नाही, चर्चांना उधाण
Pune municipal corporation election results 2026 : याला म्हणतात पुणेकरांचा कार्यकर्त्यांचा कॉन्फिडन्स; निकाल लागण्याआधीच लावले विजयाचे बॅनर, पाहा फोटो
याला म्हणतात पुणेकरांचा कार्यकर्त्यांचा कॉन्फिडन्स; निकाल लागण्याआधीच लावले विजयाचे बॅनर, पाहा फोटो
BMC Bogus Voter : कॅमेऱ्यासमोरच दुबार मतदान? निवडणूक अधिकाऱ्यांची 'चुप्पी', धारावीतील प्रकार एबीपी माझाच्या कॅमेरात कैद
कॅमेऱ्यासमोरच दुबार मतदान? निवडणूक अधिकाऱ्यांची 'चुप्पी', धारावीतील प्रकार एबीपी माझाच्या कॅमेरात कैद
BMC Exit Poll : मनसेला 6 जागा, तर शिंदेंच्या शिवसेनेला 54; मुंबईकरांची झोप उडवणारा एक्झिट पोल समोर
मनसेला 6 जागा, तर शिंदेंच्या शिवसेनेला 54; मुंबईकरांची झोप उडवणारा एक्झिट पोल समोर
Thane Mahangarpalika Election results 2026: ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, भिवंडी महानगरपालिकांच्या निकालाचे लाईव्ह अपडेटस्
Maharashtra Election Results 2026: ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, भिवंडी महानगरपालिकांच्या निकालाचे लाईव्ह अपडेटस्
Dhule DMC Election Result : उत्तर महाराष्ट्रात भाजपनं खातं उघडलं, धुळे महापालिकेत चार उमेदवार विजयी, मतमोजणीपूर्वीच विजयाचा चौकार
उत्तर महाराष्ट्रात भाजपनं खातं उघडलं, धुळे महापालिकेत चार उमेदवार विजयी, बिनविरोध विजयाचा चौकार
BMC Exit Poll : ठाकरेंच्या 25 वर्षांच्या सत्तेला भाजपचा सुरुंग? मुंबईचा सर्वात धक्कादायक एक्झिट पोल समोर
ठाकरेंच्या 25 वर्षांच्या सत्तेला भाजपचा सुरुंग? मुंबईचा सर्वात धक्कादायक एक्झिट पोल समोर
Team India : टीम इंडियाला आणखी एक धक्का,तिलक वर्मानंतर वॉशिंग्टन सुंदर न्यूझीलंड विरूद्धच्या टी 20 मालिकेतून बाहेर, T20 वर्ल्ड कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह
टीम इंडियाला धक्का,तिलक वर्मानंतर आणखी एक खेळाडू न्यूझीलंड विरूद्धच्या टी 20 मालिकेतून बाहेर
Embed widget