एक्स्प्लोर

Nagpur violence Devendra Fadnavis: ... त्यांना कदापि माफी नाही, नागपूर दंगलीबाबत मुख्यमंत्र्यांनी हादरवून टाकणारा घटनाक्रम सभागृहात सांगितला!

Nagpur violence: दंगल करणाऱ्यांवर जात-धर्म न पाहता कारवाई करु, पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना माफी नाही; देवेंद्र फडणवीस सभागृहात कडाडले. राज्यातील नागरिकांना शांततेचे आवाहन

मुंबई: राज्यात कोणीही दंगा करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर जात-धर्म न पाहता कारवाई करण्यात येईल. तसेच जो कोणी पोलिसांवर हल्ला करेल त्याला सोडले जाणार नाही, असा स्पष्ट आणि कठोर इशारा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिला. नागपूरच्या महल आणि हंसापुरी परिसरात सोमवारी झालेल्या हिंसाचाराच्या (Nagpur riots) पार्श्वभूमीवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात निवेदन दिले. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्वधर्मीय नागरिकांना शांतता आणि कायदा-सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केले.  महाराष्ट्र हे प्रगतीशील राज्य आहे. याठिकाणी गुंतवणूक येत आहे. आपल्याला इच्छित उद्दिष्ट गाठायचे असेल तर नागरिकांना कायदा-सुव्यवस्था राखणे गरजेचे आहे. सध्या अनेक धर्मांचे सण सुरु आहे. त्यामुळे सर्व लोकांना संयम बाळगावा आणि एकमेकांविषयी आदरभाव बाळगावा, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये घडलेल्या हिंसाचाराचा सविस्तर तपशील सभागृहासमोर मांडला. नागपूरातील महाल परिसरात सोमवारी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने 'औरंगजेबाची कबर हटा'व असे नारे देत आंदोलन केले होते. यावेळी त्यांनी गवताच्या पेंड्या असलेली प्रतिकात्मक कबर जाळली होती. याप्रकरणी गणेश पेठ पोलिसांनी आंदोलकांवर दुपारी 3 वाजून 9 मिनिटांनी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर वातावरण शांत होते. मात्र, सायंकाळी अफवा पसरवण्यात आली की, सकाळी आंदोलकांकडून जी प्रतिकात्मक कबर जाळण्यात आली त्याच्या कापडावर धार्मिक मजकूर होता. हे वृत्त पसरल्यानंतर नमाज आटोपून येत असलेल्या 200 ते 250 लोकांच्या जमावाने नारेबाजी सुरु केली. आम्ही आग लावून टाकू, अशी हिंसक भाषा त्यांनी सुरु केली. तेव्हा पोलिसांनी बळाचा वापर केला, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

तत्पूर्वी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांविरुद्ध तक्रार द्यायची आहे अशी मागणी केल्यानंतर मुस्लीम समुदायाच्या लोकांना पोलिसांनी गणेशपेठ पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले होते. त्यांची तक्रार पोलीस ऐकून घेत होते. तेव्हा हंसापुरी भागात 200 ते 300 लोकांच्या जमावाने हातात काठ्या घेऊन दगडफेक सुरु केली. त्यांच्या तोंडावर फडकी गुंडाळली होती. या जमावाने हंसापुरीत 12 दुचाकींचे नुकसान केले. काही लोकांवर घातक शस्त्रांनी हल्ला केला, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

त्यानंतर भालदारपुरा भागात सायंकाळी साडेसात वाजता 80 ते 100 लोकांच्या जमावाने पोलिसांवर हल्ला केला. तेव्हा पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अश्रुधुर आणि सौम्य बळाचा वापर केला. यावेळी जमावाने एक क्रेन आणि काही चारचाकी वाहने जाळली. या सगळ्यात एकूण 33 पोलीस जखमी झाले. यामध्ये 3 उपायुक्त दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. एका पोलीस अधिकाऱ्यावर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला. तर एकूण पाच नागरिक जखमी झाले. यापैकी तिघांना घरी सोडण्यात आले आहे. दोन जण रुग्णालयात आहेत, त्यापैकी एकजण अतिदक्षता विभागात आहे. एकूण 11 पोलीस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. नागपूर शहरात एसआरपीएफच्या 5 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत, असे देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.

पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही: देवेंद्र फडणवीस

सकाळच्या घटनेनंतर त्यानंतर मध्यंतरी शांतता होती. त्यानंतर संध्याकाळी काही लोकांनी जाणीवपूर्वक हल्ला केला. कारण पोलिसांना एक ट्रॉली भरुन दगड मिळाले. वरती दगड जमा करुन ठेवण्यात आले होते. शस्त्रास्त्र मोठ्याप्रमाणावर होती. एका डीसीपी दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यावर कुऱ्हाडीने वार करण्यात आले. यामध्ये काही लोकांचा सुनियोजित पॅटर्न होता. या लोकांवर कारवाई केली जाईल. कोणालाही कायदा-सुव्यवस्था हातात घेण्याचा अधिकार नाही. पोलिसांवर ज्यांनी हल्ला केला आहे अशा लोकांना काही झाले तरी सोडले जाणार नाही.  पोलिसांवरचा हल्ला सहन केला जाणार नाही. पोलीस शांतता प्रस्थापित करत होते. अशावेळी त्यांच्यावर केलेला हल्ला चुकीचा होता, असे देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावून सांगितले.

आणखी वाचा

जमावाने गाड्या जाळल्या, पोलिसांना मारायला गट्टू उचलला अन्.... नागपूरच्या चिटणीस पार्कमधील नागरिकांनी सांगितला भयावह अनुभव

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

AI In Power Sector : वीजपुवठा सुरळीत ठेवण्यासाठी AI चा वापर करा; मुख्यमंत्र्यांचे ऊर्जा विभागाला निर्देश
वीजपुवठा सुरळीत ठेवण्यासाठी AI चा वापर करा; मुख्यमंत्र्यांचे ऊर्जा विभागाला निर्देश
मी सक्षम उमेदवार, विधानपरिषदेवर मला संधी मिळावी, रुपाली ठोंबरेंचं सुनेत्रा पवारांना पत्र
मी सक्षम उमेदवार, विधानपरिषदेवर मला संधी मिळावी, रुपाली ठोंबरेंचं सुनेत्रा पवारांना पत्र
सावधान! हवामानत मोठा बदल, 20 ते 22 एप्रिल दरम्यान राज्यात वादळी पावसाची शक्यता, शेतकऱ्यांनी उपाययोजना कराव्यात, कृषी विभागाचं आवाहन
सावधान! हवामानत मोठा बदल, 20 ते 22 एप्रिल दरम्यान राज्यात वादळी पावसाची शक्यता, शेतकऱ्यांनी उपाययोजना कराव्यात, कृषी विभागाचं आवाहन
Devendra Fadnavis : डेटा सेंटर गुंतवणुकीला वेग; कंपन्यांना त्वरित जागा देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
डेटा सेंटर गुंतवणुकीला वेग; कंपन्यांना त्वरित जागा देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

व्हिडीओ

PM Modi UNCUT : काँग्रेसने महिलांच्या अधिकारांची भ्रूणहत्या केली, स्वप्नांचा चक्काचूर केला- मोदी
PM Modi on Women Reservation Bill : काँग्रेसने त्यांचं अस्तित्व गमावलं तुफान हल्लाबोल
PM Modi on Women Reservation Bill : नारीशक्ती विधेयक नामंजूर, पंतप्रधान मोदींनी मागितली माफी
Sanjay Raut PC : 'मोदी हैं तो नामुमकिन हैं' अशी परिस्थिती, राऊतांचा हल्लाबोल
Sharad Ponkshe Nanded Speech : 1 लाख खरात एकत्र केले तर 1 अकबर तयार होईल, शरद पोंक्षे यांचं विधान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: समृद्धी महामार्गालगत नवनगरे विकसित करण्याचा प्रकल्प बारगळला
Maharashtra Live blog updates: समृद्धी महामार्गालगत नवनगरे विकसित करण्याचा प्रकल्प बारगळला
Crude Oil in India : जगाला चकवा देत जया, डोरना आणि फेलिसिटी भारतात दाखल, हॉर्मुझमधून 60 लाख बॅरेल इराणी तेल देशात
जगाला चकवा देत जया, डोरना आणि फेलिसिटी भारतात दाखल, हॉर्मुझमधून 60 लाख बॅरेल इराणी तेल देशात
AI In Power Sector : वीजपुवठा सुरळीत ठेवण्यासाठी AI चा वापर करा; मुख्यमंत्र्यांचे ऊर्जा विभागाला निर्देश
वीजपुवठा सुरळीत ठेवण्यासाठी AI चा वापर करा; मुख्यमंत्र्यांचे ऊर्जा विभागाला निर्देश
PM Modi and Nana Patole: मी मोदींचं भाषण मोबाईलवर ऐकत होतो, अनेकजण त्यांना 'फेकू' बोलत होते; नाना पटोलेंची बोचरी टीका
मी मोदींचं भाषण मोबाईलवर ऐकत होतो, अनेकजण त्यांना 'फेकू' बोलत होते; नाना पटोलेंची बोचरी टीका
महागाई भत्त्यात केंद्र सरकारकडून मोठी वाढ; 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 69 लाख निवृत्तीवेतनधारकांना फायदा होणार
महागाई भत्त्यात केंद्र सरकारकडून मोठी वाढ; 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 69 लाख निवृत्तीवेतनधारकांना फायदा होणार
Iran War Live Update: अमेरिकेला लाल समुद्रातील हुथी बंडखोरांची धडकी भरली; जगातील सर्वाधिक शक्तिशाली नौदलाच्या युद्धनौकेला अख्ख्या आफ्रिका खंडाला वळसा घालून इराणकडे येण्याची वेळ!
अमेरिकेला लाल समुद्रातील हुथी बंडखोरांची धडकी भरली; जगातील सर्वाधिक शक्तिशाली नौदलाच्या युद्धनौकेला अख्ख्या आफ्रिका खंडाला वळसा घालून इराणकडे येण्याची वेळ!
Iran War Live Update: 'तोपर्यंत जहाजांना होर्मुझमधून जहाजांना अजिबात जाऊ देणार नाही' इराणनं अवघ्या 24 तासांमध्येच मार्ग करत जगाची नाडी पुन्हा आवळली, अमेरिकेला गर्भित इशारा
'तोपर्यंत जहाजांना होर्मुझमधून जहाजांना अजिबात जाऊ देणार नाही' इराणनं अवघ्या 24 तासांमध्येच मार्ग करत जगाची नाडी पुन्हा आवळली, अमेरिकेला गर्भित इशारा
Pat Cummins: वनडे वर्ल्डकपमध्ये 140 कोटी जनतेला एका झटक्यात शांत करणारं 'ब्रह्मास्त्र' हैदराबाद संघात दाखल, तरीही संघाचं टेन्शन कायम!
वनडे वर्ल्डकपमध्ये 140 कोटी जनतेला एका झटक्यात शांत करणारं 'ब्रह्मास्त्र' हैदराबाद संघात दाखल, तरीही संघाचं टेन्शन कायम!
Embed widget