एक्स्प्लोर

Eknath Shinde On Harshwardhan Sapkal: हर्षवर्धन सपकाळांचे डोळे काढले की जीभ छाटली; औरंगजेब कुठे, देवेंद्र फडणवीस कुठे?, एकनाथ शिंदे संतापले!

Eknath Shinde On Harshwardhan Sapkal: हर्षवर्धन सपकाळ यांच्या या विधानाचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज खरपूस समाचार घेतला आहे.

Eknath Shinde On Harshwardhan Sapkal: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका केली होती. औरंगजेब हा क्रूर शासक होता, देवेंद्र फडणवीस देखील तेवढेच क्रूर आहेत. ते धर्माचा आधार घेत आहेत. औरंगजेबाची कबर उचलून टाका, असं सांगत आहेत. याचा अर्थ त्यांना मराठी माणसांचा, मावळ्यांचा आणि शिवाजी महाराजांचा इतिहास पुसून टाकायचा आहे, असं विधान हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं होतं. हर्षवर्धन सपकाळ यांच्या या विधानाचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज खरपूस समाचार घेतला आहे.

हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्र्यांची औरंगजेबाशी तुलना केली. हर्षवर्धन सपकाळांचे डोळे काढले की जीभ छाटली, काय केलं म्हणून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची तुलना औरंगजेबाशी केली?, औरंगजेब कुठे, देवेंद्र फडणवीस कुठे, जनाची नाही तर मनाच तरी ठेवा, असा घणाघात एकनाथ शिंदेंनी केला. तसेच औरंगजेबची कबर ही महाराष्ट्राला लागलेलं कलंक आहे. हा कलंक पुसला पाहिजे ही लोकांची भावना आहे, असंही एकनाथ शिंदे म्हणाले. एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभा परिसरात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.

नागपूरमधील घटना पूर्वनियोजित कट- एकनाथ शिंदे

नागपूरमध्ये जमावाने काही घरांना लक्ष केले जाळपोळ केली. मोठ्या प्रमाणात मालमत्तेचं नुकसान केलं. काही लोकं जिवानीशी वाचली. पोलिसांवर दगडफेक झाली. काही लोक जखमी झाले. ही घटना पूर्वनियोजित होती असे दिसतंय, असं एकनाथ शिंदे म्हणाले.  ज्या मोमीनपुरामध्ये घटना घडली तिथे एरवी अनेक गाड्या पार्क असायच्या, मात्र काल त्या नव्हत्या. काही मंदीरातील फोटो जाळले. अग्निशमन दलाच्या जवानांवर हल्ले केले. पोलिसांवर दगडफेक करणं हे दुदैवी आहे. समाजकंटकांना शोधून कडक कारवाई होईल. नागपूर हे शांतता प्रिय शहर आहे. दोन समाजात तेढ निर्माण केली जात आहे. पोलीस मूळाशी जाऊन तपास करतील. आपण सर्वांनी सहकार्य  करावं शांतता राखावी, असं आवाहन एकनाथ शिंदेंनी केलं. हा औरंगजेब या आंदोलनकर्त्याचा कोण लागतो. या आंदोलनकर्त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास वाचला पाहिजे, छावा पाहिला पाहिजे. त्याचं समर्थन करणं म्हणजे देशद्रोह्याचं समर्थन करणं आहे. देशाचा द्रोही त्याचं समर्थन म्हणजे देशद्रोहचं समर्थन, असं एकनाथ शिंदे म्हणाले. 

हर्षवर्धन सपकाळ नेमकं काय म्हणाले होते?

औरंगजेब हा क्रूर शासक होता, देवेंद्र फडणवीस देखील तेवढेच क्रूर आहेत. ते धर्माचा आधार घेत आहेत. औरंगजेबाची कबर उचलून टाका, असं सांगत आहेत. याचा अर्थ त्यांना मराठी माणसांचा, मावळ्यांचा आणि शिवाजी महाराजांचा इतिहास पुसून टाकायचा आहे. औरंगजेबाची कबर ही शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साक्ष आहे. क्रूर प्रवृत्तीच्या माणसाला आम्ही गाडतो, हे त्या ठिकाणी दिसून येते, असं हर्षवर्धन सपकाळ म्हणाले होते. 

संबंधित बातमी:

Crime News: गावात मित्रासोबत समलैंगिक संबंध, माऊलीला समजलं; टॉर्चचा उजेड पाहून समलैंगिक जोडप्याकडे गेला अन्...

सकाळी 10 च्या हेडलाईन्स, VIDEO:

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut: नरेंद्र मोदींचा पंतप्रधान म्हणून शेवटचा वाढदिवस, 17 सप्टेंबरनंतर कोणत्या प्रसंगांना तोंड द्यावं लागतंय बघा: संजय राऊत
नरेंद्र मोदींचा पंतप्रधान म्हणून शेवटचा वाढदिवस, 17 सप्टेंबरनंतर कोणत्या प्रसंगांना तोंड द्यावं लागतंय बघा: संजय राऊत
ST Students School Admission: राज्यातील 25 हजार आदिवासी विद्यार्थ्यांना सरकारच्या दिरंगाईचा फटका, शाळा सुरु होऊन दोन महिने उलटले तरीही प्रवेशच नाही
राज्यातील 25 हजार आदिवासी विद्यार्थ्यांना सरकारच्या दिरंगाईचा फटका, शाळा सुरु होऊन दोन महिने उलटले तरीही प्रवेशच नाही
Devendra Fadnavis in Nagpur: देवेंद्र फडणवीसांनी दत्तक घेतलेल्या तरुणीचा पुनर्विवाह, कोरोनामुळे जोडीदार गमावलेल्या तरुणीच्या आयुष्यात नवी पहाट
देवेंद्र फडणवीसांनी दत्तक घेतलेल्या तरुणीचा पुनर्विवाह, कोरोनामुळे जोडीदार गमावलेल्या तरुणीच्या आयुष्यात नवी पहाट
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंना थेट पाकिस्तानातून हृदयस्पर्शी पत्र;
अभिजित दिपकेंना थेट पाकिस्तानातून हृदयस्पर्शी पत्र; "प्रिय अभिजीत, मी तुम्हाला लाहोरमधून पत्र लिहितोय, एक शहर जिथं दिल्लीसारखंच, आपण तेव्हा फाळणीत लाखो लोक गमावले, पण आजही.."

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अवघ्या चार महिन्यांत 10 प्रकरणांमध्ये 22 आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा, वकील आणि पक्षकार सुद्धा हबकले; न्यायाधीशांकडून 100 प्रलंबित खटले तातडीने काढून घेतले
अवघ्या चार महिन्यांत 10 प्रकरणांमध्ये 22 आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा, वकील आणि पक्षकार सुद्धा हबकले; न्यायाधीशांकडून 100 प्रलंबित खटले तातडीने काढून घेतले
Devendra Fadnavis in Nagpur: कोरोनामुळे आयुष्याचा साथीदार गमावलेल्या तरुणीला आधार दिला; आता देवाभाऊंनी लग्नाला येऊन डोक्यावर अक्षताही टाकल्या
कोरोनामुळे आयुष्याचा साथीदार गमावलेल्या तरुणीला आधार दिला; आता देवाभाऊंनी लग्नाला येऊन डोक्यावर अक्षताही टाकल्या
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंना थेट पाकिस्तानातून हृदयस्पर्शी पत्र;
अभिजित दिपकेंना थेट पाकिस्तानातून हृदयस्पर्शी पत्र; "प्रिय अभिजीत, मी तुम्हाला लाहोरमधून पत्र लिहितोय, एक शहर जिथं दिल्लीसारखंच, आपण तेव्हा फाळणीत लाखो लोक गमावले, पण आजही.."
Chhatrapati Sambhajinagar : सॉरी आई आणि आप्पा, पुढच्या जन्मी तुमच्यासाठी नक्की डॉक्टर बनेन, शेवटची चिठ्ठी लिहली अन्..., 19 वर्षीय विद्यार्थ्याने गळ्याला लावला दोर
सॉरी आई आणि आप्पा, पुढच्या जन्मी तुमच्यासाठी नक्की डॉक्टर बनेन, शेवटची चिठ्ठी लिहली अन्..., 19 वर्षीय विद्यार्थ्याने गळ्याला लावला दोर
Iran War Update: इराणवर ट्रम्पकडून सर्वात मोठ्या निर्बंधांची घोषणा; इराणला पाठिंबा देणाऱ्या देशांवर आणि संस्थांवरही कारवाई
इराणवर ट्रम्पकडून सर्वात मोठ्या निर्बंधांची घोषणा; इराणला पाठिंबा देणाऱ्या देशांवर आणि संस्थांवरही कारवाई
Mumbai Crime News : मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
Amit Thackeray on ABVP: मुलींचा हात धरल्यावर आम्ही तुम्हाला मारणारच! अमित ठाकरेंचा 'अभाविप'ला इशारा, साठ्ये महाविद्यालयातील राड्याबाबत काय म्हणाले?
मुलींचा हात धरल्यावर आम्ही तुम्हाला मारणारच! अमित ठाकरेंचा 'अभाविप'ला इशारा, साठ्ये महाविद्यालयातील राड्याबाबत काय म्हणाले?
Cab Driver Viral Video: मुंबईतील मराठी तरुणाचा अमराठी कॅब चालकासोबत वाद, ओटीपी मराठीत सांगताच ड्रायव्हर भडकला, म्हणाला, 'अ‍ॅप इंग्रजी, मग....'
मुंबईतील मराठी तरुणाचा अमराठी कॅब चालकासोबत वाद, ओटीपी मराठीत सांगताच ड्रायव्हर भडकला, म्हणाला, 'अ‍ॅप इंग्रजी, मग....'
Embed widget