Rohit Sharma: रोहित शर्मा वैतागला, थेट मुंबई विमानतळावरच केली फिल्डिंग सेट, नेमकं काय घडलं?, VIDEO
Rohit Sharma: रोहित शर्मा काल मुंबईत पुन्हा परतला असून विमानतळावर तो पापाराझी आणि चाहत्यांवर संतापल्याचे दिसून आले.

Rohit Sharma: चॅम्पियन्स ट्रॉफीची (Champions Trophy 2025) स्पर्धा संपल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) त्याची पत्नी रितिका सजदेह आणि मुलीसह मालदीवमध्ये गेला होता. रोहितने मालदीमधील त्याच्या कुटुंबासोबतचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. रोहित शर्मा काल मुंबईत पुन्हा परतला असून मुंबई विमानतळावर तो पापाराझी आणि चाहत्यांवर संतापल्याचे दिसून आले.
रोहित शर्मा कुटुंबियांबरोबर वेळ व्यतित करण्यासाठी मालदिवला गेला होता. मालदीवमधील काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले होते. मालदीवमधून मुंबईत पुन्हा परतल्यानंतर मुंबई विमानतळावर पापाराझी आणि चाहत्यांनी गर्दी केली होती. जेव्हा रोहित आणि त्याची मुलगी समायरा विमानतळाच्या बाहेर आले तेव्हा फोटोग्राफर्सनी फ्लॅशचा पाऊस पाडला. यानंतर रोहित शर्मा चांगलाच वैतगला. रोहित शर्माने यावेळी मुलीला आपल्या पाठीमागे लपवले आणि गाडी जवळ आल्यावर त्याने मुलीला आतमध्ये बसवले.
View this post on Instagram
रोहित शर्माने मुंबई विमानतळावरच केली फिल्डिंग सेट, VIDEO:
मुलीला गाडीत बसवल्यानंतर रोहित शर्माने पापाराझींची शाळा घेतली. मैदानात ज्या पद्धतीने रोहित शर्मा फिल्डिंग सेट करतो, त्याचपद्धतीने रोहित शर्मा पापाराझींना कुठून फोटो काढायचे हे सांगितले. त्यामुळे रोहित शर्माने मुंबई विमानतळावर देखील फिल्डिंग सेट केली, अशी सोशल मीडियावर चर्चा आहे. सध्या या दरम्यानचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
रोहित शर्मा मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात होणार समील-
रोहित शर्मा येत्या काही दिवसांत मुंबई इंडियन्स संघात सामील होऊ शकतो. आयपीएल 2025 मध्ये मुंबईचा पहिला सामना 23 मार्च रोजी कट्टर प्रतिस्पर्धी चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध होणार आहे. हा सामना चेन्नईमध्ये खेळला जाईल. मुंबई आणि चेन्नई दोघेही पाचवेळा आयपीएल चॅम्पियन राहिले आहेत. गेल्या हंगामात, मुंबई इंडियन्सच्या फ्रँचायझीने रोहित शर्माला कर्णधारपदावरून काढून टाकले आणि हार्दिक पांड्याकडे संघाची कमान सोपवली. हार्दिक आगामी हंगामातही मुंबई संघाचे नेतृत्व करताना दिसेल. 'हिटमॅन' रोहित शर्माने आतापर्यंत 257 सामन्यांच्या त्याच्या शानदार आयपीएल कारकिर्दीत 6628 धावा केल्या आहेत. आयपीएल 2024 च्या हंगामात रोहित शर्माने 14 सामन्यांमध्ये 417 धावा केल्या होत्या.
संबंधित बातमी:
सकाळी ८ च्या हेडलाईन्स, VIDEO:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

