Abhishek Bachchan Viral Photo: ऐश्वर्याशी लग्नापूर्वी 4 वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीला डेट करत होता अभिषेक बच्चन? 'या' फोटोमुळं पितळ उघडं
Abhishek Bachchan Viral Photo: अभिषेक बच्चनचा एका अभिनेत्रीसोबतचा जुना फोटो व्हायरल होत आहे. हे पाहून सोशल मीडिया युजर्स पुरते हैराण झाले आहेत. हा अभिनेता एकेकाळी या सौंदर्यवतीला डेट करत असल्याचं बोललं जात आहे.

Abhishek Bachchan Viral Photo: बॉलिवूड सेलिब्रिटी (Bollywood Celebrity) आणि त्यांची पर्सनल लाईफ (Personal Life) नेहमीच चर्चेचा विषय असते. त्यांच्या प्रोफेशनल लाईफसोबतच (Professional Life) सेलिब्रिटी त्यांच्या पर्सनल लाईफमध्ये काय करतात? हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता असते. त्यातल्या त्यात सेलिब्रिटींचे अफेअर्स म्हणजे, सर्वांच्या आवडीचा विषय, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. बॉलिवूडमध्ये प्रत्येक सेलिब्रिटीचं नाव कधी ना कधी कुणा ना कुणासोबत जोडलं गेलेलं असतंच. मग त्या केवळ चर्चा असू देत किंवा गपचूप फुलत असलेलं प्रेम. अफेअर्सच्या चर्चा नेहमीच होत असतात. अशी एक चर्चा रंगलेली असते बॉलिवूड स्टार अभिषेक बच्चनबाबत (Abhishek Bachcha).
काही दिवसांपूर्वी अभिषेक बच्चनचं नाव निमरत कौरसोबत (Nimrat Kaur) जोडलं जात होतं. तसेच, यामुळेत अभिषेक आणि ऐश्वर्याच्या नात्यात दुरावा आला असून आता दोघे घटस्फोट घेणार असल्याचंही बोललं जात होतं. पण, काही दिवसांनी ऐश्वर्या आणि अभिषेक एकत्र स्पॉट होऊ लागले आणि चर्चांना पूर्णविराम मिळाला. पण, तुम्हाला माहितीये का? बॉलिवूडचे शहनशाह बिग बी यांचा मुलगा आणि विश्वसुंदरी ऐश्वर्या रायचा नवरा असलेल्या अभिषेक बच्चनचं नाव कधीकाळी एका अभिनेत्रीसोबत जोडलं गेलं होतं, असा दावा एका सोशल मीडिया पोस्टमधून करण्यात आला आहे.
ऐश्वर्या रायशी लग्न करण्यापूर्वी, अभिषेक बच्चनसोबत करिश्मा कपूरचं लग्न ठरलं होतं. दोघांचा साखरपुडाही झाला होता, पण नंतर लग्न मोडलं. लग्न मोडण्याची अनेक कारणं समोर आली आहेत. आजही याबाबत चर्चा होतात. पण, सध्या सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. जो पाहून सोशल मीडियावर अभिषेक आणि एका दुसऱ्याच बॉलिवूड अभिनेत्रीचं नाव जोडलं जात आहे.
खरंतर, होळीनंतर, अभिषेक बच्चनचा त्याच्यापेक्षा 4 वर्षांनी मोठ्या असलेल्या अभिनेत्री तब्बूसोबतचा एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये तब्बू व्हाईट कलरच्या ट्रेडिशनल आऊटफिटमध्ये दिसत आहे. तर अभिषक होळीच्या रंगात रंगलेला पाहायला मिळत आहे. फोटोमध्ये अभिषेकनं तब्बूला आपल्या दोन्ही हातांनी पकडल्याचं पाहायला मिळत आहे. तर, तब्बू खळखळून हसत असल्याचं दिसत आहे.
रेडिटवर फोटो व्हायरल
तब्बू आणि अभिषेक बच्चन यांचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फोटोवर सोशल मीडिया युजर्स कमेंटचा पाऊस पाडत आहेत. रेडिटवर एका युजरनं फोटो शेअर करत लिहिलं आहे की, अभिषेक आणि तब्बू 2005 च्या होळी पार्टीमध्ये आपल्या लव्ह अफेअर दरम्यान... असंही बोललं जातंय की, कोणतीही पार्टी असो ते दोघेही एकत्र दिसायचे. तसेच, कित्येकदा महागड्या हॉटेल्समध्ये एकत्र एन्जॉय करताना दिसायचे. सध्या ही पोस्ट सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. तसेच, या पोस्टवर रेडिट युजर्स रिअॅक्ट करत आहेत.
फोटो पाहून चाहत्यांकडून कमेंट्सचा पाऊस
अभिषेक आणि तब्बूच्या फोटोवर एका युजरनं कमेंट केली आहे की, "काय सांगताय, हे कधी झालं? मला असं वाटतंय की, प्रत्येकजण त्याच्या वडिलांच्या 40 वर्षांपूर्वीच्या प्रकरणात एवढं बिझी होतं की, त्याच्यावर कुणी लक्षंच दिलं नाही." आणखी एका युजरनं लिहिलं आहे की, "हिच्यावर एक बायोपिक आलाच पाहिजे, नागार्जुन, अजय आणि अभिषेक...", एका युजरनं लिहिलंय की, "तब्बू आणि अभिषेक, आता काय? माझ्या आजवरच्या आयुष्यात मी कधीच त्यांच्याबाबत ऐकलेलं नाही, हे कधी झालं...?" तर एका युजरनं लिहिलं आहे की, "हे वाचून सातत्यानं होणाऱ्या तुलनेसाठी आणि फेलियर टॅगबाबत अभिषेकसाठी जी सहानुभूती होती, ती सगळीच्या सगळी संपली..."
महत्त्वाच्या इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

