(Source: ECI/ABP News/ABP Majha)
VIDEO : चिमुकल्याच्या छातीवर बसली, गळा दाबला, डोकं जमिनीवर आपटलं; हैवान आईकडून मुलाला बेदम मारहाण, अंगाचा थरकाप व्हिडीओ व्हायरल
Mother Beaten Son Viral Video : हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगाचा थरकाप उडाल्याशिवाय राहणार नाही. व्हायरल व्हिडीओमध्ये एक महिला तिच्याच पोटच्या गोळ्याला बेदम मारहाण करताना आणि त्याचा गळा दाबताना दिसत आहे.
मुंबई : आई आपल्या लेकरासाठी खूप काबाडकष्ट करत असते, पण तिच आई मुलाच्या जीवावर उठली तर काय? अशाच एका क्रूर आईचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका आईने आपल्याच मुलाला बेदम मारल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगाचा थरकाप उडाल्याशिवाय राहणार नाही. व्हायरल व्हिडीओमध्ये एक महिला तिच्याच पोटच्या गोळ्याला बेदम मारहाण करताना आणि त्याचा गळा दाबताना दिसत आहे.
माता न तू वैरिणी!
सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओमध्ये महिला तिच्या मुलाच्या अंगावर बसल्याचं दिसत आहे. यानंतर ती चिमुकल्यावर एकामागोमाग एक मुक्क्यांचा वर्षाव करते, त्याचे केस पकडून जोरजोरात डोकं जमिनीवर आदळते, त्याला चावते, यानंतरही तिचं मन भरत नाही तर ती त्याचा गळा दाबते. इतकंच काय तर या महिलेने दुसऱ्या मुलाकडून हा सर्व प्रकार मोबाईल फोनमध्ये चित्रित करुन घेतला. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगाचा थरकाप उडेल.
चिमुकल्याला आईची बेदम मारहाण
एका क्रूर आईचा मुलाला बेदम मारहाण करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये महिला मुलाच्या छातीवर बसलेली दिसत आहे आणि त्याला सतत बेदम मारहाण करत आहे, त्याचं डोकं जमिनीवर आपटते आणि त्याचा गळा दाबते. मुलं स्वतःला वाचवण्यासाठी रडत आईकडे विनवणी करत आहे. आईकडे जीवाची भीक मागत आहे, पण हैवान बनलेल्या आईला मुलाची जराही कीव येत नाही. मुलगा आईकडे पाणी मागत आहे, पण आई त्याला जबर मारहाण करत आहे. व्हायरल झालेल्या हा व्हिडीओ हरिद्वार परिसरातील झाब्रेडा येथील असून दोन महिन्यांपूर्वीचा असल्याचं समोर आलं आहे.
पति से विवाद, घर न आने, खर्च न देने के चलते "अपने पति को डराने के लिए" अपने ही बच्चे को पीटने का वीडियो पति को सेंड करने का थाना झबरेड़ा का दो माह पुराना वीडियो आज सोशल मीडिया में वायरल हो रहा है।
— Haridwar Police Uttarakhand (@haridwarpolice) July 17, 2024
महिला व बच्चे की आज 'पहले चरण की काउंसलिंग' CWC के समक्ष हुई है। pic.twitter.com/inZqWx190M
महिलेनं मुलाला मारहाण करण्याचं कारण सांगितलं
व्हायरल व्हिडीओची सत्यता जाणून घेण्यासाठी उत्तराखंड पोलीस जेव्हा महिलेकडे पोहोचले तेव्हा सत्य समजल्यानंतर अधिकारीही चक्रावून गेले. व्हायरल व्हिडीओबद्दल महिलेने पोलिसांना सांगितलं की, गेल्या 10 वर्षांपासून तिचा पतीसोबत वाद सुरू असून पती घरी राहत नाही आणि पैसेही पाठवत नाही. बरेच दिवस तो घरी आला नाही. एका दुकानात काम करून महिला घरखर्च भागवते. पतीला घाबरवण्यासाठी आणि घरातील जबाबदाऱ्यांकडे त्याचं लक्ष वेधण्यासाठी तिने आपल्या मोठ्या मुलाला मारतानाचा हा व्हिडीओ बनवला होता आणि 2 महिन्यांपूर्वी पतीला पाठवला होता, त्यानंतर तिच्या पतीने तो सोशल मीडियावर व्हायरल केला होता. महिलेनं सांगितलं की, मारहाणीदरम्यान तिने मुलाच्या छातीवर डोके ठेवण्याचे नाटक केले होतं, पण मुलाला चावा किंवा दुखापत केली नाही, असं महिलेचं म्हणणं आहे. दरम्यान, पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरु आहे.
अंगाचा थरकाप उडवणारा VIDEO समोर
क्या दुनिया में माँ ऐसी भी होती हैं?
— MANOJ SHARMA LUCKNOW UP🇮🇳🇮🇳🇮🇳 (@ManojSh28986262) July 17, 2024
रूह कंपा देने वाली वीडियो 😡😡
90 KG की महिला अपने छोटे 25 KG बेटे के ऊपर बैठकर उसे मुक्कों, दांतों सर पटकना गाला दबाना !!
एक मासूम छोटा बच्चा वहीं पर खड़ा देख रहा!
अगर ये सच है तो इसको जल्द गिरफ्तार करे !! #viralvideo #up #uttrakhand pic.twitter.com/NCZzsihfCw
महत्त्वाच्या इतर बातम्या :