Trending News : 'इथे' लग्न झाल्यानंतर महिलांना कापावे लागतात कान अन् ओठ, विचित्र परंपरा आजही कायम
Ethiopia Mursi Community : एका आदीवासी जमातीमध्ये महिलांना लग्न झाल्यावर कान आणि ओठ कापावे लागतात.
![Trending News : 'इथे' लग्न झाल्यानंतर महिलांना कापावे लागतात कान अन् ओठ, विचित्र परंपरा आजही कायम african country ethiopia mursi community woman cut lip ear after marriage know why bizzare traditions in world Trending News : 'इथे' लग्न झाल्यानंतर महिलांना कापावे लागतात कान अन् ओठ, विचित्र परंपरा आजही कायम](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/24/f17366bbb2a29627b26c64075ebcdb621677232536667496_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Ethiopia Mursi Tribe : जगात अनेक रहस्यमय आदिवासी जमाती (Tribal Community) आहेत. जगात राहणार्या आदिवासी जमाती आजही हजारो वर्ष जुन्या परंपरांचे पालन करतात. या जमाती संपूर्ण जगापासून वेगळ्या राहतात. या जमाती त्यांच्या परंपरा, जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींमुळे नेहमीच चर्चेत असतात. या जमाती जंगलात राहतात आणि पूर्णपणे निसर्गावर अवलंबून असतात. येथील सरकारंही या आदिवासी जमातींच्या राहनीमानात ढवळाढवळ करत नाहीत. इथिओपियातील एका आदिवासी जमातीमध्ये फार विचित्र परंपरा आहेत. ही जगातील हिंस्त्र जमातींपैकी एक मानली जाते.
'इथे' लग्न झाल्यानंतर महिलांना कापावे लागतात कान अन् ओठ
जगात अनेक प्रकारच्या आदिवासी जमाती राहतात. अशा जमातींचे नियम आणि कायदे फारच विचित्र असतात. असाच एक आफ्रिकन देश म्हणजे इथिओपिया. इथिओपियाच्या मुर्सी जमातीमध्ये एक अतिशय धोकादायक आणि प्रथा आहे. या प्रथा आजही पाळल्या जातात. मुर्सी आदिवासी जमातीमध्ये लग्नानंतर महिलांना त्यांचे कान आणि ओठ कापावे लागतात. लग्नानंतर मुर्सी महिलांचे ओठ कापले जातात आणि त्यामध्ये माती किंवा लाकडी गोल प्लेट घातली जाते. या प्लेटचा आकार काळानुसार, वाढवण्यात येतो, त्यामुळे त्यांच्या ओठांवरील छिद्र मोठं होतं जातं.
विचित्र परंपरा आजही कायम
रिपोर्टनुसार, इथिओपियातील मुर्सी जमातीचे पुरुष महिलांवर अत्याचार करणे योग्य असल्याचे मानतात. हे पुरुषत्वाचे लक्षण असल्याची त्यांची मान्यता आहे. मुर्सी जमातीच्या महिलांसाठी बनवलेल्या या नियमावर वेगवेगळ्या देशांमध्ये टीका केली जाते. सध्या इथिओपियामध्ये मुर्सी जमातीची संख्या केवळ 10 हजार आहे. या जमातीच्या हिंसक व्यवहारामुळे इथिओपिया सरकारने त्यांच्याशी संपर्क ठेवण्यास बंदी घातली आहे.
'हे' आहे यामागचं कारण
मुर्सी जमातीच्या स्त्रियांचे ओठ आणि कान कापण्याची परंपरा फार पूर्वीपासून चालत आलेली आहे. यामुळे महिलांची प्रजनन क्षमता वाढते असा समज आहे. मुर्सी जमातीतील महिलांचे वयाच्या 12 ते 16 व्या वर्षीच लग्न होते. मुर्सी जमातीतील पुरुषांचा असा समाज आहे की, लग्नानंतर ओठ आणि कान कापल्याने स्त्रिया कुरूप दिसतील. यामुळे, त्यांच्याकडे इतर कुणी पाहू शकणार नाही.
जगातील हिंस्त्र मानवी जमातींपैकी एक
एका अहवालानुसार, ही जमाती जगातील सर्वात धोकादायक जमातींपैकी एक आहे. हे लोक एखाद्याचा जीव घेण्यासाठी मागे-पुढे पाहत नाहीत. 'दुसर्याला मारल्याशिवाय जगण्यात अर्थ नाही आणि स्वतः मरण आलेलं चांगलं', अशी या जमातीतील लोकांची मान्यता आहे. मुर्सी जमातीने शेकडो लोक मारल्याचं सांगितलं जातं. त्यांच्या परवानगीशिवाय कोणी त्यांच्या क्षेत्रामध्ये प्रवेश केला तर हे लोक त्यांना ठार मारतात, असं सांगितलं जातं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Marriage : 'येथे' लग्नाआधीच द्यावा लागतो मुलांना जन्म; भारतातील काही विचित्र प्रथांबद्दल वाचा सविस्तर
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)