एक्स्प्लोर

Fat People: पोट वाढलं असेल तर इथे मिळतो सुपरस्टारचा दर्जा; चरबी वाढवण्यासाठी 'हे' लोक पितात रक्त

Ethiopias Bodi Tribe: येथे लोक वजन वाढवण्यासाठी गायीचं दूध पितातच पण त्यासोबतच रक्तही पितात. इथे वाढलेलं पोट असणाऱ्या पुरुषांना जास्त मान दिला जातो.

Ethiopia Bodi Tribe : सध्या अनेक लोक वाढलेल्या वजनामुळे त्रस्त आहेत. निरोगी राहण्यासाठी आपली जीवनशैली चांगली असली पाहिजे. चुकीच्या जीवनशैलीमुळे लठ्ठपणाची समस्या निर्माण होते. यामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळते. एकीकडे लोक वजन कमी करण्यासाठी डाएट आणि व्यायाम असे अनेक उपाय करताना दिसतात. तर, दुसरीकडे काही लोक असेही आहेत, जे पोटावरील चरबी वाढवण्यासाठी मेहनत घेत आहेत. याचं कारण म्हणजे, जगाच्या एका कोपऱ्यामध्ये अशीही एक जागा आहे, जिथे वाढलेलं पोट असणाऱ्या पुरुषांना जास्त मान दिला जातो. हे ऐकून तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण हे खरं आहे.

पोट वाढलं असेल तर इथं मिळतो सुपरस्टारचा दर्जा

येथे जास्त पोट सुटलेल्या पुरुषांना सुपरस्टारचा दर्जा दिला जातो. जगभरात अनेक विविध जमाती आहेत, ज्या आजही आपल्या परंपरांचे पालन करतात. अशाच एका जमातीची ही विचित्र परंपरा आहे. जाणून घ्या या जमातीबद्दल आणि ही विचित्र परंपरा नेमकी काय आहे, त्याबाबत सविस्तर... 

लठ्ठ होण्यासाठी करतात मेहनत

आफ्रिकेच्या जंगलामध्ये राहणाऱ्या एका जमातीमध्ये ही विचित्र परंपरा आहे. इथे लोक वजन कमी करण्यासाठी नाहीतर वजन वाढवण्यासाठी मेहनत घेतात. आफ्रीका खंडातील इथिओपियातील (Ethiopia) ओमो व्हॅलीच्या (Omo Valley) जंगलात राहणाऱ्या बोडी जमातीमध्ये (Bodi Tribe) ही एक विचित्र परंपरा आहे. या जमातीचे पुरुष चरबी आणि पोट वाढवण्यासाठी खूप मेहनत करतात. हे लोक प्राण्यांचे रक्तही पितात. या जमातीत लठ्ठ आणि गुबगुबीत पुरुषांना सुपरस्टारचा दर्जा दिला जातो.

वजन वाढवण्यासाठी पितात जनावरांचं रक्त

एका रिपोर्टनुसार, ओमो व्हॅलीच्या जंगलात राहणाऱ्या बोडी जमातीचे लोक गाईचे दूध आणि रक्त पितात. हे लोक गाईचे दूध आणि रक्त एकत्र मिसळून पितात. प्राण्यांचे रक्त पिण्यासाठी प्राण्याला मारत नाहीत, तर त्याच्या शरीरातील नस कापून तेथून त्याचे रक्त काढतात. दरवर्षी येथ नवीन वर्षाच्या निमित्ताने कोयल नावाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. या समारंभात पुरुषांमध्ये एक स्पर्धा आयोजित केली जाते, ज्यामध्ये अविवाहित पुरुषांना गाईचे दूध आणि रक्त मिसळून प्यावे लागते.

सहा महिन्यांपूर्वी सुरू होते तयारी

या स्पर्धेत भाग घेणारे पुरुष सहा महिने आधीपासूनच तयारी सुरू करतात. या काळात त्यांना कोणत्याही महिलेशी संबंध ठेवता येत नाही आणि घराबाहेर पडण्यासही बंदी असते. या दरम्यान त्यांना जनावराचे रक्त आणि दूध प्यावे लागते. या पुरुषांना दोन लिटर दूध आणि त्यात मिसळलेले रक्त सूर्योदयाच्या वेळी प्यावे लागते.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Cat Temple : भारतातील 'या' मंदिरात केली जाते मांजरीची पूजा, 1000 वर्ष जुनी परंपरा; कारण माहितीय?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dharavi Redevelopment Project : धारावी पुनर्विकास प्रकल्पाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, कंत्राट रद्द करण्याची केली होती मागणी
धारावी पुनर्विकास प्रकल्पाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, कंत्राट रद्द करण्याची केली होती मागणी
राज्यासमोर आर्थिक संकट वाढले, महसुली उत्पन्नापेक्षा खर्च जास्त, भांडवली खर्चासाठी दुसरे कर्ज काढण्याशिवाय पर्याय नाही!
राज्यासमोर आर्थिक संकट वाढले, महसुली उत्पन्नापेक्षा खर्च जास्त, भांडवली खर्चासाठी दुसरे कर्ज काढण्याशिवाय पर्याय नाही!
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेसाठी सरकारने एकूण किती कोटी वाटले? आर्थिक पाहणी अहवालात महत्त्वाची माहिती समोर
लाडकी बहीण योजनेसाठी सरकारने एकूण किती कोटी वाटले? आर्थिक पाहणी अहवालात महत्त्वाची माहिती समोर
दुधना नदीतील कारवाईदरम्यान महिला तहसीलदारांवर वाळूमाफियांचा हल्ला; 7 जणांवर गुन्हा दाखल
दुधना नदीतील कारवाईदरम्यान महिला तहसीलदारांवर वाळूमाफियांचा हल्ला; 7 जणांवर गुन्हा दाखल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rohit Sharma School Update | रोहित शर्माच्या शाळेतील तोडलेलं क्रिकेट टर्फ पुन्हा बांधून देणार, म्हाडाकडून हमी सुपूर्दNitesh Rane | हे कसली तक्रार करतात, यांनी लोकांचे छळ केले; अनिल परब VS नितेश राणे यांच्यात खडाजंगीAmbadas Danve | तर मी दिलगिरी व्यक्त करतो, परबांच्या व्यक्तव्याचा अनर्थ होतोय, दानवेंचं स्पष्टीकरणAnil Parab News | समज देण्याचा अधिकार सभापतीना, इतरांना नाही..अनिल परब- राणेंमध्ये खडाजंगी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dharavi Redevelopment Project : धारावी पुनर्विकास प्रकल्पाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, कंत्राट रद्द करण्याची केली होती मागणी
धारावी पुनर्विकास प्रकल्पाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, कंत्राट रद्द करण्याची केली होती मागणी
राज्यासमोर आर्थिक संकट वाढले, महसुली उत्पन्नापेक्षा खर्च जास्त, भांडवली खर्चासाठी दुसरे कर्ज काढण्याशिवाय पर्याय नाही!
राज्यासमोर आर्थिक संकट वाढले, महसुली उत्पन्नापेक्षा खर्च जास्त, भांडवली खर्चासाठी दुसरे कर्ज काढण्याशिवाय पर्याय नाही!
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेसाठी सरकारने एकूण किती कोटी वाटले? आर्थिक पाहणी अहवालात महत्त्वाची माहिती समोर
लाडकी बहीण योजनेसाठी सरकारने एकूण किती कोटी वाटले? आर्थिक पाहणी अहवालात महत्त्वाची माहिती समोर
दुधना नदीतील कारवाईदरम्यान महिला तहसीलदारांवर वाळूमाफियांचा हल्ला; 7 जणांवर गुन्हा दाखल
दुधना नदीतील कारवाईदरम्यान महिला तहसीलदारांवर वाळूमाफियांचा हल्ला; 7 जणांवर गुन्हा दाखल
Satish Bhosale : माणसं सोडा पण सतीश भोसलेने प्राण्यांनाही सोडलं नाही; हरीण, ससे, मोर अन् शेकडो काळवीटं शिजवून खाल्ली
माणसं सोडा पण सतीश भोसलेने प्राण्यांनाही सोडलं नाही; हरीण, ससे, मोर अन् शेकडो काळवीटं शिजवून खाल्ली
गाड्या सांभाळा... उन्हाच्या तीव्रतेनं लागली आग, रेल्वे स्टेशनजवळील दुचाकी जळून खाक
गाड्या सांभाळा... उन्हाच्या तीव्रतेनं लागली आग, रेल्वे स्टेशनजवळील दुचाकी जळून खाक
Devendra Fadnavis on Nana Patole : 'जयंतराव आमचा विदर्भातील आवाज दाबणार असाल, तर...' नाना पटोलेंवरून सीएम फडणवीस नेमकं काय म्हणाले?
'जयंतराव आमचा विदर्भातील बुलंद आवाज दाबणार असाल, तर...' नाना पटोलेंवरून सीएम फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Kirit Somaiya : पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेतील लाभार्थ्यांमध्ये 181 बांगलादेशी; किरीट सोमय्यांचा खळबळजनक दावा
पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेतील लाभार्थ्यांमध्ये 181 बांगलादेशी; किरीट सोमय्यांचा खळबळजनक दावा
Embed widget