Mumbai : मासेमारी करणाऱ्या नौकेला खोल समुद्रात मोठा अपघात; मालवाहू जहाजाने टक्कर मारल्यानं नौका बुडाली
Mumbai Ship Accident : मुंबईच्या मढ कोळीवाडा परिसरातून एक अपघाताची बातमी समोर आली आहे. यात मासेमारी नौकेला खोल समुद्रात मोठा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.
Mumbai Ship Accident : मुंबईच्या मढ कोळीवाडा परिसरातून एक अपघाताची बातमी समोर आली आहे. यात मासेमारी नौकेला खोल समुद्रात मोठा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. मालवाहू जहाजांनी टक्कर मारल्यामुळे मासेमारी नौका बुडाल्याची धक्कादायक घटना काल (29 डिसेंबर) रात्री साडेबाराच्या सुमारास घडली आहे. मालाडच्या मढ कोळीवाडा मधली मासेमारी नौकेला खोल समुद्रात मालवाहू जहाजाचा धडक लागल्यामुळे ही नौका बुडाली असल्याची माहिती आहे.
मालवाहू जहाजाची टक्कर, सुदैवाने जीवितहानी टळली
मिळालेल्या माहितीनुसार, मासेमारी नौकामध्ये असलेल्या तांडेल या खलाशीला बाजूला असलेल्या सवटी ग्रुपच्या नौकांनी सुखरूप उचलले आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. तर सवटी ग्रुपच्या आठ बोटीने मासेमारी नौकेला बांधून खोल समुद्रातून मढ तळाशी बंदरात आणले आहेत. या बुडालेल्या बोटीला बाहेर काढण्यासाठी नौदल आणि कोस्ट गार्डच्या जहाजने सुद्धा मदत केली आहे. दरम्यान, नौदल आणि कोस्ट गार्डचे जहाज बरोबर आहे. तसेच दोन अधिकारी देखील रात्रीपासून या नौकांची मदती करीत आहेत.
मालवाहतूक करणाऱ्या जहाजांचे चालक नशेत असल्याचा आरोप
मुंबईच्या मढ समुद्रात मासेमारी करणाऱ्या जहाजाचा काल रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास खोल समुद्रात मोठा अपघात झाला. मालाडच्या मढ कोळीवाडा मधली मासेमारी नौकेला खोल समुद्रात मालवाहू जहाजाचा धडक लागल्यामुळे नौका बुडाली. ज्यावेळी मासेमारी नौकाचा अपघात झाला त्यावेळी नौकामध्ये सहा लोक होते. त्यांना बाजूला असलेल्या सवटी ग्रुपच्या नौकानी सुखरूप उचलले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र यामुळे मासेमारी करणाऱ्या जहाजांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. बोटीतील सहा खलाशांनी संपूर्ण रात्रभर जागून बोट समुद्रात बुडण्यापासून वाचवली. यानंतर कोस्ट गार्डने आणि नेव्ही यांच्या 8 बोटीच्या साह्याने तिसाई या मासेमारी करणाऱ्या बोटीला मढ बंदरावर आणण्यात आले. मालवाहतूक करणाऱ्या जहाजांचे चालक हे नशेत असल्यामुळे हा अपघात झाल्याचा आरोप मासेमारी करणाऱ्या बोटीच्या मालकाने केला आहे. या अपघातात मासेमारी करणारी तिसाई नौकेचे मोठे नुकसान झाले आहे.
भिवंडीत मध्यरात्रीच्या सुमारास तीन अपघात, दोन जण किरकोळ जखमी
भिवंडी शहरातील अरुंद उड्डाणपूल हे अपघाताला कारणीभूत ठरत असल्याचे चित्र आहे. या मागील कारण म्हणजे शहरातील स्वर्गीय राजीव गांधी उड्डाणपूल तसेच भारतरत्न एपीजे अब्दुल कलाम उड्डाणपूल या दोन्ही उड्डाणपूल वर मध्यरात्रीच्या सुमारास दोन अपघात झाले असून यामध्ये दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत. तर एका अपघातात दुचाकीचा अपघात झाला आहे.
स्वर्गीय राजीव गांधी उड्डाणपूलावर बाग ए फिर्दोसकडे उतरत असताना एका भरधाव कारने समोरून येणाऱ्या कारला समोरून जोरदार धडक दिली. यावेळेस अपघात करणारा कार चालक सुरुवातीपासूनच बेदरकारपणे कार चालवत असल्याने त्याच्या मागून येणाऱ्या एका कार चालकांने मोबाईल वर त्याचे चित्रीकरण सुरू केले होते. त्यामध्ये संपूर्ण अपघात कॅमेरा मध्ये कैद झाला आहे. तर दुसरा अपघात भारतरत्न एपीजे अब्दुल कलाम उड्डाणपूलच्या सुरुवातीलाच नदिनाका या ठिकाणी घडला आहे. एक भरधाव ट्रक उड्डाण पुलावरून वाड्याच्या दिशेने उतरत असताना समोरील रस्ते दुभाजकाचा त्याला अंदाज न आल्याने ट्रक थेट दुभाजकावर चढला.
या अपघातात ट्रक जर उलटला असता तर मोठी दुर्घटना घडू शकली असती. तर तिसरी अपघाताची घटना चाविंद्रा या परिसरात घडली असून दुचाकी चालक रस्ता ओलांडत असताना समोरून येणाऱ्या ट्रक चा अंदाज न आल्याने दुचाकी ट्रक खाली घुसली. या अपघातात दुचाकी चालक किरकोळ जखमी झाला आहे.
हे ही वाचा