एक्स्प्लोर

रुग्णांच्या बेडवरचं उंदरांच्या उड्या; भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील धक्कादायक प्रकार, ससून रुग्णालयाची पुनरावृत्ती झाली तर?

Bhandara News : भंडाऱ्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालयातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यात चक्क रुग्णांच्या बेडवरचं उंदीर उड्या मारत असल्याचा संतापजनक आणि धक्कादायक प्रकार समोर आलाय.

Bhandara News : भंडाऱ्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालयातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यात चक्क रुग्णांच्या बेडवरचं उंदीर उड्या मारत असल्याचा संतापजनक आणि धक्कादायक प्रकार समोर आलाय. जिल्हा रूग्णालयातील रूग्ण कक्षात उपचारासाठी भरती असलेल्या रूग्णांच्या अंगावरून अक्षरशः आठ ते दहाच्या संख्येत असलेल्या उंदराची टोळी धुमाकूळ घालत आहे.

दरम्यान, त्यांच्या डब्यातील व पिशव्यातील खाद्यपदार्थांचा फडशा पाडतानांचा एक व्हिडीओ सध्या समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. पुण्यातील ससून रुग्णालयात एप्रिल 2024 मध्ये आयसीयूत उपचार घेत असलेल्या रुग्णाला उंदीर चावल्यानं त्याचा मृत्यू झाला होता. त्यामुळं अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, याकरिता आरोग्य यंत्रणेनं हस्तक्षेप करून रुग्णालयामधील परिस्थिती हाताळून यंत्रणेला आवश्यक निर्देश देण्याची गरज आहे. यावर पेस्ट कंट्रोल आणि उंदीर मारण्याबाबत तातडीनं उपयोजना करण्याचे निर्देश देण्यात येईल, अशी माहिती आरोग्य उपसंचालक डॉ.  शशिकांत शंभरकर यांनी दिली.

ससूनमध्ये उपचारासाठी आला आणि उंदराची शिकार झाला

यापूर्वी पुण्याच्या ससून रुग्णालयामध्येच आयसीयूमध्ये उपचार घेत असलेल्या तरुणाचा उंदीर चावल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली होती. सागर रेणूसे असं मृत्यू झालेल्या 30 वर्षीय तरुणाचं नाव आहे. सागर रेणूसेचा भोर तालुक्यात अपघात झाला होता. 16 मार्चला त्याला ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. आयसीयूमध्ये उपचार सुरु असताना 26 मार्चला त्याची प्रकृती खालावत होती. त्यानंतर नेमकं काय झालं याचा शोध घेतला असता उंदीर चावल्याचे समोर आले होते. आयसीयूमध्ये त्याच्या डोक्याला, कानाला आणि इतर अवयवांना उंदराने चावा घेतला होता. त्यात त्याचं निधन झाल्यावर नातेवाईकांनी उंदीर चावल्याचा आरोप केला होता. त्यानंतर काही वेळ डॉक्टरांनी नकार दिला. 

मात्र त्यानंतर डॉक्टरांनी सागर रेणुसेच्या शरीरवर उंदीर चावल्याच मान्य केलं. ऐरवी टून टून उड्या मारून घरात उच्छाद मांडणाऱ्या उंदरांना आपण बघितलंय. मात्र, जिल्हा सामान्य रुग्णालयाततील रुग्णांच्या बेडवरचं जर उंदरांचा कळप धुमाकूळ घालत असेल तर काय म्हणावं? भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील हा संतापजनक आणि धक्कादायक प्रकार बघून सर्व स्थरातून आता संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान आता प्रशासन नेमकी काय खबरदारी घेत हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.  

हे ही वाचा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jaykumar Gore: कोण तिजोरी, तर कोणी तिजोरीच्या चाव्या आमच्याकडे आहे म्हणतंय, पण बँकच आमच्याकडे आहे; मंत्री जयकुमार गोरेंनी मित्र पक्षालाच डिवचलं
कोण तिजोरी, तर कोणी तिजोरीच्या चाव्या आमच्याकडे आहे म्हणतंय, पण बँकच आमच्याकडे आहे; जयकुमार गोरेंची करमाळ्यात तुफान फटकेबाजी
Nitin Gadkari: 'मी आयुष्यात कधीच कॅलक्युलेशन केलं नाही, आनंदी राहायचं असेल, तर...' नितीन गडकरींनी सपत्नीक दिला सुखी आयुष्याचा कानमंत्र
'मी आयुष्यात कधीच कॅलक्युलेशन केलं नाही, आनंदी राहायचं असेल, तर...' नितीन गडकरींनी सपत्नीक दिला सुखी आयुष्याचा कानमंत्र
Maharashtra Live blog: तुमच्याकडे तिजोरीची चावी असेल पण अख्खी बँक आमची आहे; जयकुमार गोरेंचा अजितदादांच्या राष्ट्रवादीला टोला
Maharashtra LIVE: तुमच्याकडे तिजोरीची चावी असेल पण अख्खी बँक आमची आहे; जयकुमार गोरेंचा अजितदादांच्या राष्ट्रवादीला टोला
Donald Trump : पुढच्या वर्षी G-20 परिषदेत दक्षिण आफ्रिकेला नो एंट्री, त्यांना मिळणार सर्व अनुदान थांबवणार, डोनाल्ड ट्रम्प संतापले
डोनाल्ड ट्रम्प यांचा दक्षिण आफ्रिकेला धक्का, पुढील वर्षी G-20 चं निमंत्रण नसणार, अनुदान थांबवणार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

chunkey Pandey Majha Katta : तिच्या वडिलांचा विरोध होता, चंकी पांडेंची लव्ह स्टोरी ऐका
Nitin-Kanchan Gadkari Majha Maha Katta : राजकारण कशाशी खातात मला माहित नव्हतं, कांचन गडकरी म्हणाले
Nitin Gadkari Majha Maha Katta : राजकारण वाईटाकडे का जातंय? नितिन गडकरींनी माध्यमांचं काम सांगितलं
Nitin-kanchan Gadkari Majha Maha Katta:मुलाने नितीन गडकरींचे पाय बांधले,कांचनाताईंनी सांगितला किस्सा
Mahayuti Politics : महायुतीचा सस्पेन्स, शिंदेंचा डिफेन्स! रविंद्र चव्हाणांच्या विधानाचं गूढ वाढलं! Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jaykumar Gore: कोण तिजोरी, तर कोणी तिजोरीच्या चाव्या आमच्याकडे आहे म्हणतंय, पण बँकच आमच्याकडे आहे; मंत्री जयकुमार गोरेंनी मित्र पक्षालाच डिवचलं
कोण तिजोरी, तर कोणी तिजोरीच्या चाव्या आमच्याकडे आहे म्हणतंय, पण बँकच आमच्याकडे आहे; जयकुमार गोरेंची करमाळ्यात तुफान फटकेबाजी
Nitin Gadkari: 'मी आयुष्यात कधीच कॅलक्युलेशन केलं नाही, आनंदी राहायचं असेल, तर...' नितीन गडकरींनी सपत्नीक दिला सुखी आयुष्याचा कानमंत्र
'मी आयुष्यात कधीच कॅलक्युलेशन केलं नाही, आनंदी राहायचं असेल, तर...' नितीन गडकरींनी सपत्नीक दिला सुखी आयुष्याचा कानमंत्र
Maharashtra Live blog: तुमच्याकडे तिजोरीची चावी असेल पण अख्खी बँक आमची आहे; जयकुमार गोरेंचा अजितदादांच्या राष्ट्रवादीला टोला
Maharashtra LIVE: तुमच्याकडे तिजोरीची चावी असेल पण अख्खी बँक आमची आहे; जयकुमार गोरेंचा अजितदादांच्या राष्ट्रवादीला टोला
Donald Trump : पुढच्या वर्षी G-20 परिषदेत दक्षिण आफ्रिकेला नो एंट्री, त्यांना मिळणार सर्व अनुदान थांबवणार, डोनाल्ड ट्रम्प संतापले
डोनाल्ड ट्रम्प यांचा दक्षिण आफ्रिकेला धक्का, पुढील वर्षी G-20 चं निमंत्रण नसणार, अनुदान थांबवणार
Girish Mahajan on Tapovan Trees: आम्ही प्रत्येक पावसाळ्यात अनेक झाडं लावतो, तपोवनची जागा शेकडो वर्षांपासून साधुग्रामसाठी आरक्षित: गिरीश महाजन
साधुग्रामसाठी तपोवनातील फक्त रोपटी तोडणार, दुसरीकडे नवी झाडं लावायला 15 हजार खड्डे खणतोय: गिरीश महाजन
Gaja Marne: कुख्यात गुंड गजा मारणेला विशेष मोक्का न्यायालयाकडून जामीन मंजूर; जेलमधून सुटताच थेट पुणे पोलिस आयुक्तालयात
कुख्यात गुंड गजा मारणेला विशेष मोक्का न्यायालयाकडून जामीन मंजूर; जेलमधून सुटताच थेट पुणे पोलिस आयुक्तालयात
आता घरबसल्या क्षणात आधार मोबाईल नंबर बदला! कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नाही; अशी आहेस स्टेप बाय स्टेप प्रोसेस
आता घरबसल्या क्षणात आधार मोबाईल नंबर बदला! कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नाही; अशी आहेस स्टेप बाय स्टेप प्रोसेस
Jain Muni Nilesh Chandra Maha Katta: 'पण तुम्ही चापट मारणार असाल, तर आम्ही मारवाडी...' जैन मुनी निलेश चंद्र राज ठाकरेंना मराठीच्या वादावर काय काय म्हणाले?
Video: 'पण तुम्ही चापट मारणार असाल, तर आम्ही मारवाडी...' जैन मुनी निलेश चंद्र राज ठाकरेंना मराठीच्या वादावर काय काय म्हणाले?
Embed widget