Mumbai-Goa Highway: गॅस टँकरचा अपघात, तब्बल 36 तासानंतर मुंबई-गोवा महामार्गाची वाहतूक झाली सुरळीत
Mumbai-Goa Highway: तब्बल 36 तासानंतर मुंबई गोवा महामार्गाची (Mumbai-Goa Highway) वाहतूक सुरळीत झाली. या रस्त्यावरील रहदारी पाहता 36 तास मुंबई गोवा महामार्ग बंद राहणं, या मार्गावरची वाहतूक पर्यायी मार्गाने वळवणं या गोष्टी निश्चितच गंभीर अशाच आहेत.
Mumbai-Goa Highway: तब्बल 36 तासानंतर मुंबई गोवा महामार्गाची (Mumbai-Goa Highway) वाहतूक सुरळीत झाली. या रस्त्यावरील रहदारी पाहता 36 तास मुंबई गोवा महामार्ग बंद राहणं, या मार्गावरची वाहतूक पर्यायी मार्गाने वळवणं या गोष्टी निश्चितच गंभीर अशाच आहेत. क्रेन उपलब्ध न होणे, तज्ञांची टीम घटनास्थळी दाखल होण्यास विलंब होणे, ज्या गोष्टी निश्चितच गंभीर अशा स्वरूपाच्या आहेत. राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा असलेल्या या महामार्गावरील वाहतूक सुरू झाली असली तरी भविष्यात अशा प्रकारची घटना घडल्यास त्याबाबतची तयारी संबंध आहे का? असा सवाल देखील या निमित्ताने उपस्थित होतो.
मिळालेल्या माहितीनुसार, लांजा तालुक्यातील मुंबई गोवा महामार्गावरील अंजणारी पुलावर गॅस वाहक टँकर (Gas Carrier Tanker) नदीत कोसळला असल्याने शनिवारी दुपारी तीन वाजल्यापासून महामार्गावरील वाहतूक बंद होती. सकाळी सात वाजता भारत पेट्रोलियम कंपनीची टीम घटनास्थळी दाखल झाली होती. त्यांनी पलटी झालेला टँकर आणि एकंदरीत होत असलेली गॅस गळती याचा अंदाज घेतला. त्यानंतर क्रेन मागवून अपघातग्रस्त टँकरमधील गॅस दुसऱ्या टँकरमध्ये ट्रान्सफर करण्यात आली.
अपघातानंतरचा घटनाक्रम आहे कसा?
- 22 सप्टेंबरला दुपारी तीन वाजता एलपीजी गॅसन भरलेला टँकर लांजा तालुक्यातील अंजणारी पुलावरून काजळी नदीत कोसळला.
- अपघात झाल्यानंतर लगेचच या महामार्गावरची वाहतूक बंद करण्यात आली
- पर्यायी मार्ग म्हणून देवधे - पुनस - काजरघाटी - रत्नागिरी आणि शिपोशी - दाभोळे - पाली या मार्गाने वाहतूक वळवली गेली
- टँकरमधून होत असलेली गॅस गळती काही प्रमाणात रोखण्यास रात्री 7 ते 8 वाजेपर्यंत यश आलं आहे.
- रात्री 8 वाजण्याच्या आसपास तज्ञांची टीम उरणहुन रत्नागिरीकडे निघाल्याची माहिती मिळाली.
- रात्री निघालेली तज्ज्ञांची टीम दुसऱ्या दिवशी म्हणजेच 23 सप्टेंबरला सकाळी 7:30 वाजता घटनास्थळी दाखल झाली.
- 8 वाजता क्रेनची गरज असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाला दिली गेली. त्यानंतर क्रेन मागवण्यासाठी प्रयत्न सुरू केले गेले.
- जिल्ह्यात जवळपास 100 टनाची क्रेन उपलब्ध नसल्याने छोट्या छोट्या तीन क्रेन मागवल्या गेल्या.
- क्रेन मागवण्याची प्रक्रिया सकाळी 8 वाजता सुरू झाली असली तरी पाच ते सहा वाजेच्या दरम्यान तिन्ही क्रेन घटनास्थळी दाखल झाल्या. त्यानंतर नदीपात्रातील टँकर सरळ केला गेला.
- 23 सप्टेंबरच्या रात्री 8:30 ते 9 या दरम्यान अपघातग्रस्त टँकरमधील गॅस दुसरा टँकर मध्ये शिफ्ट करण्यास सुरुवात झाली.
- मध्यरात्री अर्थात 24 सप्टेंबरला जवळपास 2 वाजेपर्यंत गॅस काढण्याचं काम पूर्ण झालं आहे.
- त्यानंतर मध्यरात्री 2.30 ते 3 या दरम्यान मुंबई - गोवा महामार्ग वाहतुकीस खुला करण्यात आला आहे.
संबंधित बातमी:
मुंबई-गोवा महामार्ग 15 तासांपासून ठप्प; रत्नागिरीतील लांज्याजवळ एलपीजी टँकर उलटल्यानं वाहतूक बंद