Pune Crime News: आपल्या आईशी प्रेमसंबध असल्याची कुणकूण अन् सुडाची भावना; रागाच्या भरात पालिकेच्या कंत्राटी कामगाराचा कोयत्याने सपासप वार करून खून
Pune Crime News: हत्या झालेला राहुल जाधव हा पुणे महापालिकेत कंत्राटी पद्धतीवर सफाई विभागात पर्यवेक्षक म्हणून काम करत होता. त्याचे एका आरोपीच्या आईशी ओळख झाली आणि नंतर दोघांचे प्रेमसंबंध जुळले होते.

पुणे: पुण्यात गेल्या काही दिवसांमध्ये हत्या, कोयत्याने दहशत पसरवणं, गाड्या फोडणं, खून करणं (Pune Crime News) अशा घटना मोठ्या प्रमाणावर घडताना दिसत आहेत. असं असताना अनैतिक संबंधातून पुणे महानगर पालिकेतील एका कंत्राटी कर्मचारी तरुणावर कोयत्याने हल्ला (Pune Crime News) केल्याची घटना कोथरूड मधील शास्त्रीनगर परिसरात घडली होती. त्या तरुणाचा रात्री उशिरा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी कोथरूड पोलिसांनी तीन ते चार जणांना ताब्यात (Pune Crime News) घेतलं आहे. राहुल दशरथ जाधव (वय 30, रा. उंबरे, ता. भोर, जि. पुणे) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी तीन ते चार जणांना ताब्यात (Pune Crime News) घेण्यात आलं असून, जाधव याचा भाऊ केतन (वय 27) याने या प्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
हत्या झालेला राहुल जाधव हा पुणे महापालिकेत कंत्राटी पद्धतीवर सफाई विभागात पर्यवेक्षक म्हणून काम करत होता. त्याचे एका आरोपीच्या आईशी ओळख झाली आणि नंतर दोघांचे प्रेमसंबंध जुळले होते. महिलेचे राहुल याच्याशी अनैतिक संबंध असल्याची कुणकुण महिलेच्या मुलाला लागली होती. यामुळे तो संतापला होता. आरोपी मुलगा आणि त्याच्या मित्रांनी नियोजन करून राहुलचा खून करण्याचा कट रचला.(Pune Crime News)
कोथरूडमधील शास्त्रीनगर येथील सागर कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्यावर दुचाकीवर जात असताना राहुल जाधवला गुरुवारी (30 जानेवारी) सायंकाळी थांबला होता. त्या वेळी आरोपी आणि त्याच्या साथीदारांनी त्याला गाठलं. त्याच्यावर कोयत्याने सपासप वार केले. या गंभीर जखमी झालेल्या राहुल जाधवचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त संभाजी कदम, सहायक आयुक्त भाऊसाहेब पटारे, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विक्रमसिंह कदम घटनास्थळी दाखल झाले. गंभीर जखमी झालेल्या राहुल याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारा दरम्यान रात्री उशिरा त्याचा खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. पोलिस उपनिरीक्षक चेतन धनवडे तपास करत आहेत.(Pune Crime News)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
