एक्स्प्लोर

महाराष्ट्र बंदच्या निर्णयावरून संजय राऊतांचा न्यायालयावर निशाणा, आता उदय सामंतांची सुप्रीम कोर्टाकडे मोठी मागणी; म्हणाले...

Uday Samant On Sanjay Raut : कोर्टालासुद्धा लेकी-बाळी, सासू, सुना आहेत. कोर्टसुद्धा एक माणूसच असून न्यायदेवता एक स्त्री आहे, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे, असे संजय राऊत यांनी म्हटले होते.

Uday Samant On Sanjay Raut : बदलापूर घटनेच्या (Badlapur School Accident) निषेधार्थ महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) महाराष्ट्र बंदची (Maharashtra Bandh) हाक पुकारली. मात्र वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadarvte) यांनी मुंबई हायकोर्टात (Mumbai Highcourt) याबाबत याचिका दाखल केली होती. या याचिकेवर हायकोर्टात झालेल्या सुनावणीत कोणत्याही राजकीय पक्षाला बंद करण्याची परवानगी नाही. जर तसा कुणी प्रयत्न केला तर कायदेशीर कारवाई करा, असे निर्देश मुंबई हायकोर्टाने सरकारला दिले. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी कोर्टालासुद्धा लेकी-बाळी, सासू, सुना आहेत. कोर्टसुद्धा एक माणूसच असून न्यायदेवता एक स्त्री आहे, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे, अशी प्रतिक्रिया दिली. आता यावरून उदय सामंत यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे मोठी मागणी केली आहे. 

न्यायालयाने सुमोटो दाखल करावा : उदय सामंत

संजय राऊत यांच्या वक्तव्यावर उदय सामंत म्हणाले की, सुप्रीम कोर्टापेक्षा मोठा व्यक्ती राजकारणामध्ये सक्रिय आहे. सुप्रीम कोर्टाचा अवमान केला जात आहे. संजय राऊत यांच्यावर न्यायालयाने सुमोटो दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच विरोधकांच्या पोटात पोटशूळ उठले आहे.  विरोधक बदलापूर घटनेचे राजकारण करत आहे. मात्र, न्यायालयाने विरोधकांचे मनसुबे  धुळीला मिळवले आहेत. न्यायालयाने विरोधकांना चपराक दिली आहे, अशी टीका त्यांनी बदलापूर घटनेवरून विरोधकांवर केली आहे.  तर मविआचे नेते शरद पवार साहेब हे परिपक्व आहेत. त्यांनी ट्विट केलं होतं, असेही त्यांनी म्हटले आहे. 

नेमकं काय म्हणाले संजय राऊत? 

राज्यात सध्या सुरू असलेला निषेध हा लोकभावनेचा उद्रेक आहे. हा साधा विषय नाही. खऱ्या अर्थाने न्यायालयाने जनभावनेचा आदर करायला हवा होता. ज्या प्रकारच्या घटना महाराष्ट्रात घडत आहे ते बघता इथे कोणीही सुरक्षित नाही. कोर्टालासुद्धा लेकी-बाळी सासू, सुना आहेत, हे लक्षात घेतलं पाहिजे. कोर्टसुद्धा एक माणूसच असून न्यायदेवता एक स्त्री आहे, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. सध्या घडीला न्यायदेवतेवर देखील अत्याचार होत आहेत. त्यासाठीच आमची लढाई होती. मात्र कोर्टाने अशा प्रकारच्या निर्णय का दिला हे कळाले नाही. शिवसेनेच्या निकालाबद्दल ज्याप्रमाणे तारखांवर तारखा वाढत आहेत, हाही एक प्रकारे राज्यघटनेवरचा बलात्कारच आहे, असे त्यांनी म्हटले. 

ओबीसी बांधवांवर कुठेही अन्याय होणार नाही : उदय सामंत

दरम्यान, काल नाशिकमध्ये मराठा आंदोलकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाबाबत पुन्हा एकदा सर्वपक्षीय भेट घेण्याचे आश्वासन मराठा आंदोलकांना दिले. याबाबत उदय सामंत म्हणाले की, नाशिकमध्ये मराठा आंदोलकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. काँग्रेसचे विरोधी पक्षनेते यांनी जे वक्तव्य केले ते धादांत खोटे आहे.  काल देखील मराठा बांधवांना कळले काही लोकांचा पर्दाफाश झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. त्या बैठकीला विरोधकांनी बहिष्कार टाकला. सभागृहात एक बोलायचं आणि बाहेर एक बोलायचं, असं सुरू आहे. राज्य सरकारची भूमिका स्पष्ट आहे. 10 टक्के आरक्षण दिले आहे. ओबीसी बांधवांवर कुठेही अन्याय होणार नाही. विरोधी पक्षाने सांगावं की, आरक्षण द्यावे की नाही, असे त्यांनी यावेळी म्हटले. 

आणखी वाचा 

भर पावसात शरद पवारांचे आंदोलन, सुप्रिया सुळेही डोक्यावर पदर घेऊन बसल्या, कोसळधारात 'निषेध आंदोलना'ची धग!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Rahul Gandhi | प्रचाराचा शेवटचा दिवस, एक है तो मोदी-अदानी सेफ है, राहुल गांधींची टीकाAnil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेरBIg Fight West Maharashtra : पश्चिम महाराष्ट्रातील प्रचारानंतरचा विचार, प्रचारानंतर कोणता मु्द्दा गजला?ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 18 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Jayant Patil : हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
Embed widget