एक्स्प्लोर
Nagpur Violence : दंगेखोरांना अद्दल! नागपूर हिंसाचाराचा मास्टरमाईंड फहीम खानच्या घरावर बुलडोझर
Nagpur Violence : नागपूर हिंसाचारात प्रमुख आरोपी आणि घटनेचा मास्टर माईंड असलेल्या फहीम खान (Faheem Khan) याचा घरावरील कारवाईबाबत मोठी बातमी समोर आली आहे.
Nagpur Violence
1/10

नागपूर हिंसाचारात प्रमुख आरोपी आणि घटनेचा मास्टर माईंड असलेल्या फहीम खान (Faheem Khan) याचा घरावरील कारवाईबाबत मोठी बातमी समोर आली आहे.
2/10

नागपूर दंगलीचा कथित मास्टर माईंड फईम खान यांच्या घरावर मनपाकडून आज बुलडोझर कारवाई करण्यात येत आहे.
3/10

फहीम खान याच्या नागपूरच्या (Nagpur Violence) टेकानाका परिसरातील घर बांधतांना 86.48 चौरस मीटरवर बेकायदेशीररीत्या बांधलेल्या बांधकामप्रकरणी महापालिकेने 21 मार्च रोजी नोटीस बजावली होती, नागपूर महानगर पालिकेने या संदर्भात नोटीस बजावल्यानंतर आता प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात झाली आहे.
4/10

मनपाच्या या कारवाईच्या पार्श्वभूमीवर यशोधरा नगर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यात स्थानिक पोलीस, एसआरपीएफच्या दोन तुकड्या परिसरात तैनात करण्यात आल्या आहे.
5/10

दरम्यान या आधीच फहीम खानच्या परिवाराने रात्री घर रिकामे केलं असल्याचे दिसून आले आहे. तर हे घर फहिम खानच्या आईच्या नावाने असल्याची माहिती पुढे आली आहे.
6/10

महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी 20 मार्च रोजी या घराची पाहणी करून महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम 1966 चे उल्लंघन केल्याचे नमूद केले होते. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, या घराचा कोणताही बिल्डिंग प्लॅन मंजूर झालेला नाही, त्यामुळे ते बेकायदा बांधकामाच्या श्रेणीत येते.
7/10

त्यामुळे नागपूर महानगर पालिकेचे पथक फहीम खानच्या घरी पोहचले असून तोडकाम करण्याच्या कारवाईला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे.
8/10

दरम्यान आता या कारवाईला वेग आले आहे. तर दुसरीकडे या कारवाईतून दंगेखोरांना सरकारने मेसेज दिला असल्याचेही बोलले जात आहे.
9/10

EWS अंतर्गत NITने 30 वर्षाच्या लीजवर खानच्या परिवाराला जागा दिल्याची माहितीही तपासात पुढे आली आहे.
10/10

नागपूर पोलिसांनी फहीम खानच्या मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टी (एमडीपी) शी संबंधित हिंसाचाराच्या आरोपींनी वापरलेली दोन दुकानेही सील केली होती. अशातच दोन जेसीबीच्या मदतीने नागपूरमध्ये फहीम खानच घर तोडण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.
Published at : 24 Mar 2025 11:17 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























