अमोल मिटकरींना शरद पवार गटाकडून ऑफर, पक्षाचं स्टार प्रचारक, आमदार ते राज्यमंत्रीपद, बड्या नेत्याचा फोन
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार आणि प्रवक्ते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून प्रवेशाची ऑफर आली आहे. याबाबत अमोल मिटकरी यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
Amol Mitkari : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार आणि प्रवक्ते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून प्रवेशाची ऑफर आली आहे. शरद पवार गटाच्या राज्यातील बड्या नेत्यांनं मिटकरींना पक्षप्रवेशाची ऑफ दिली आहे. या बड्या नेत्याचा फोन आल्याच्या बातमीला आमदार मिटकरींनी देखील दुजोरा दिला आहे. विधानसभा निवडणुकीत पक्षाचं स्टार प्रचारक पद, सत्ता आल्यानंतर राज्यमंत्रीपद आणि परत विधान परिषदेचे आमदारकी अशी ऑफर दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
आमदार अमोल मिटकरींनी शरद पवार गटाची ऑफर विनम्रपणे नाकारली आहे. आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत अजितदादांशी गद्दारी करणार नसल्याचं आमदार मिटकरींनी शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला सांगितले आहे. आपल्या सात पिढ्या अजित पवारांच्या ऋणातून उतराई होणार नसल्याचे अमोल मिटकरी म्हणाले. शरद पवार गटाकडून अजित पवार गटातल्या बड्या नेत्यांना पक्षप्रवेशाच्या ऑफर असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
नेमकं काय म्हणाले अमोल मिटकरी?
शरद पवार गटाकडून आलेल्या ऑफरबाबत प्रसारमाध्यमांनी अमोल मिटकरींना माहिती विचारली. यावेळी मिटकरी म्हणाले की, याबाबत तथ्य आहे. पण काही जणांशी सौजन्याचे नाते असल्यामुळं काही गोष्टी बोलता येत नाही. याबाबत मी सगळे आमच्या नेत्यांनी कळवल्याचे अमोल मिटकरी म्हणाले. अजित पवार यांनी माझ्यासारख्या छोट्या समुहातील, सामान्य कुटुंबातील व्यक्तिला मोठं पद दिलं आहे. त्यामुळं त्या नेत्याच्या विचाराशी मी कधीही प्रतारणा करणार नाही. अजितदादा यांच्यासमोर सर्व ऑफर शून्य आहेत. अजितदादांकडे बघूनच आम्ही पक्षात आलो आहोत. आमच्या पुढच्या सात पिढ्या देखील अजितदादांच्या उपकारातून मुक्त होऊ शकत नसल्याचे मिटकरी म्हणाले.
मरेपर्यंत अजित पवार यांना सोडणार नाही
शरद पवार गटातील संबंधित मोठ्या नेत्याला मी सांगितलं होतं की मला माझ्या पक्षापेक्षा दुसरा कोणताही पक्ष मोठा नाही. तसेच माझ्या नेत्यापेक्षा दुसरा कोणताच नेता मला मोठा नाही असे अमोल मिटकरी म्हणाले. त्या नेत्याचं नाव आहे अजितदादा. मरेपर्यंत अजित पवार यांना सोडणार नसल्याचे मिटकरी म्हणाले.
तुम्ही एका चळवळीतून आला आहात. आज तुम्ही शांत आहेत. कोणत्याही ठिकाणी भाषण करत नाहीत. त्यामुळं तुम्ही आमच्या पक्षात या. आमचे स्टेज तुमच्यासाठी खुलं आहे. आमच्या पक्षात तुम्हाला खुली बॅटिंग करण्याची संधी असल्याचे शरद पवार गटाच्या नेत्याने सांगितल्याचे मिटकरी म्हणाले. त्यांना मी सांगितले की, आमच्या पक्षात मला काही अडचण नाही. मी खुल्या मनाने पक्षात माझी भूमिका मांडल्याचे अमोल मिटकरी म्हणाले. मला मंत्रीपद, आमदारकी याचा मोह नसल्याचे मिटकरी म्हणाले. सत्तेचा ताम्रपट घेून कोणीही जन्माला आला नसल्याचे मिटकरी म्हणाले. एकवेळी जीव देऊ पण अजित पवार यांच्याशी गद्दारी करणार नसल्याचे मिटकरी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या: