Nashik Malegaon News : ग्रामपंचायत निधीचा अपहार करणं अंगलट; दोन सरपंचांच्या मालमत्तेवर टाच
Nashik Malegoan News : ग्रामपंचायत निधीचा अपहार केल्याप्रकरणी सरपंचांच्या मालमत्तेवर टाच आणण्यात आली आहे. मालेगाव पंचायत समितीने ही कारवाई केली आहे. ग्रामसेवकाच्या वेतनातूनही वसुली करण्यात येत आहे.
Nashik Malegoan News मालेगाव : ग्रामपंचायत निधीचा (Grampanchayat Fund) अपहार केल्याप्रकरणी सरपंचाच्या (Sarpanch) मालमत्तेवर टाच आणण्यात आली आहे. मालेगाव पंचायत समितीने (Malegoan Panchayat Samiti) ही कारवाई केली आहे. ग्रामसेवकाच्या (Gramsevak) वेतनातूनही वसुली करण्यात येत आहे. माहिती अधिकारी कार्यकर्त्याने तीन वर्षांचा पाठपुरावा केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ग्रामपंचायतीमध्ये काम न करता शासन निधीचा अपहार केल्याप्रकरणी नाशिकच्या (Nashik News) मालेगाव तालुक्यातील खडकी येथील तत्कालीन दोघा सरपंचांच्या मालमत्तेवर (Property) बोजा चढविण्यात आला तर ग्रामसेवकांची वेतनातून अपहरणाची रक्कम वसूल करण्याची कारवाई पंचायत समितीने केली आहे. या कारवाईचा गाव कारभारी असलेल्या सरपंच व ग्रामसेवकांनी चांगलाच धसका घेतला आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप मोरे (Pradeep More) यांनी तीन वर्ष केलेल्या पाठपुराव्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
नेमका प्रकार काय?
मालेगाव तालुक्यातील खडकी (Khadki Malegaon Taluka) या गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायतीला विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून सुमारे ८० लाख रुपये निधी प्राप्त झाला होता. वेगवेगळ्या चार खात्यांवर ही रक्कम वर्ग करण्यात आली होती. मात्र हा निधी (Fund) खर्च न करता परस्पर काढून घेण्यात आल्याने माहिती अधिकारी कार्यकर्ते प्रदीप मोरे (Pradeep More) यांनी त्याविरुद्ध लढा उभारला.
निधी खर्चाची कागदपत्रे मिळाली नाही
८० लाख रुपयांच्या निधी खर्चाची योग्य ती कागदपत्रे (Documents) मिळून न आल्यामुळे लेखापरीक्षकांच्या अहवालानंतर तत्कालीन सरपंच अर्चना देवरे (Archana Deore) व प्रतिभा सूर्यवंशी (Pratibha Suryavanshi) यांच्या मालमत्तेवर अपहारित रक्कमेपैकी ३९ लाख ४२ हजार ४८० रुपयांचा बोजा चढविण्यात आला.
ग्रामसेवकाच्या मासिक वेतनातून रक्कम वसुली
तर ग्रामसेवक सुनील खैरनार (Sunil Khairnar) यांच्या मासिक वेतनातून (Monthly Salary) अपहारित रक्कम वसुली सुरू करण्यात आली आहे. मालेगाव पंचायत समितीने (Malegaon panchayat Samiti) ही कारवाई सुरू केली, अशी माहिती प्रदीप मोरे यांनी दिली आहे. सुमारे तीन वर्ष या कारवाईसाठी पाठपूरावा करावा लागल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या