एक्स्प्लोर

Nashik Crime News : संत निवृत्तीनाथ महाराजांची समाधी अन् औरंगजेबाच्या कबरीशी तुलना; अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल

Nashik News : राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या त्र्यंबकेश्वर शहराध्यक्षाची ऑडियो क्लिप व्हायरल झाली आहे. यात त्याने संत निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधीची औरंगजेबाच्या कबरीशी तुलना केल्याचा उल्लेख आहे.

Nashik Crime News नाशिक : राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या त्र्यंबकेश्वर शहराध्यक्षाची ऑडियो क्लिप (Audio clip) काही दिवसांपूर्वी व्हायरल झाली होती. संत निवृत्तीनाथ महाराजांच्या (Saint Nivrittinath Maharaj) समाधीची औरंगजेबाच्या (Aurangzeb) कबरीशी तुलना केल्याचा उल्लेख या क्लिपमध्ये आढळल्याने राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या (NCP Ajit Pawar Group) पदाधिकाऱ्याला हे चांगलेच अंगलट आले आहे.

किरण चौधरी (Kiran Chaudhari) असे त्याचे नाव आहे. चौधरी हा राष्ट्रवादी अजित पवार गटाचा त्र्यंबकेश्वर शहराध्यक्ष आहे. मनसेचे तालुकाध्यक्ष नवनाथ कोठुळे (Navnath Kothule) यांच्या तक्रारीनुसार त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात (Trimbakeshwar Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

नेमका प्रकार काय?

काही दिवसांपूर्वी किरण चौधरी छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) जिल्ह्यात औरंगजेबाची समाधी पाहण्यासाठी गेला. त्यानंतर तो त्र्यंबकेश्वरला (Trimbakeshwar) आला असता त्याने एका मित्राला कॉल केला. त्यात त्याने खुलताबादला (Khultabad) भेट दिल्याचे सांगितले. औरंगजेबाची कबर पाहून खूश झाल्याचे तो यावेळी म्हणाला. संत निवृत्तीनाथांच्या समाधी आणि औरंगजेबाच्या कबरीची रचना सारखीच असल्याचे त्याने यावेळी म्हटले. विशेष म्हणजे याच मित्राने ती ऑडीओ क्लिप व्हायरल केली होती.

चौधरीला पोलिसांनी घेतले ताब्यात

हा मुद्दा राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना समजताच त्यांनी हा मुद्दा उचलून धरला. चौधरी विरोधात कारवाई करण्याची कार्यकर्त्यांनी मागणी केली होती.  त्र्यंबकेश्वर पोलिसांनी (Police) मनसेचे तालुकाध्यक्ष नवनाथ कोठुळे यांच्या तक्रारीनुसार चौधरीविरोधात धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. तसेच त्याला ताब्यात देखील घेतले आहे. आज त्याला न्यायालयात (Court) हजर केले जाणार आहे.

गृहविभागाने सखोल चौकशी करावी

छत्रपती संभाजीनगरमध्ये जाऊन औरंगजेबाची तुलना किरण चौधरी याने आमच्या देवदेवतांशी केली. हिंदू धर्मियांच्या भावना यामुळे दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे आम्ही संपूर्ण हिंदू धर्मियांच्या वतीने किरण चौधरी विरोधात त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात (Trimbakeshwar Police Station) गुन्हा दाखल केला आहे. या लोकांची गृहविभागाने सखोल चौकशी करावी अशी मागणी मनसेचे तालुकाध्यक्ष नवनाथ कोठुळे (Navnath Kothule) यांनी केली आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या

PM Modi National Youth Festival Speech : "कोणतीही नशा करू नका, ड्रग्जपासून लांब राहा, माता बहिणींना..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा युवकांना मोलाचा सल्ला

Anil Parab : मोठी बातमी! ज्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी ठाकरेंचा दावा नाकारला, त्याविरोधातील पुरावेच परबांनी 'माझा कट्टा'वर सादर केले

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
Embed widget