Nashik News : त्रासाला कंटाळून शेतमजुराने उचललं टोकाचं पाऊल, नातेवाईकांकडून सहा तास रास्ता रोको, शेतमालकाच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल
Nashik News : दिक्षी येथे शेतमजुराने शेतात विषारी औषध प्रश्न करून आत्महत्या केली. संतप्त नातेवाईकांनी रास्ता रोको केला. शेतमालकाच्या मुलाविरोधात ओझर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
![Nashik News : त्रासाला कंटाळून शेतमजुराने उचललं टोकाचं पाऊल, नातेवाईकांकडून सहा तास रास्ता रोको, शेतमालकाच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल extreme step taken by farm laborer relatives rasta roko for six hours case registered against the farmers son at dikshi nashik maharashtra marathi news Nashik News : त्रासाला कंटाळून शेतमजुराने उचललं टोकाचं पाऊल, नातेवाईकांकडून सहा तास रास्ता रोको, शेतमालकाच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/13/55ea87c6f636ec268e359aa170d85dfd1705127834412923_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Nashik News नाशिक : दिक्षी येथे शेतमजुराने शेतात विषारी औषध प्रश्न करून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी घडली होती. राहूल अलबाड (१९) असे तरुणाचे नाव आहे. दिक्षी (Dikshi) गांवातील रमेश टर्ले यांच्या शेतात त्याने आत्महत्या केली. मयताच्या नातेवाईकांनी शेतमालकावर आत्महत्येचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली होती. मयताचे वडिल निवृत्ती अलबाड यांनी याबाबत फिर्याद दाखल केली होती.
तसेच मयताचा मृतदेह रस्त्यावर आणून तब्बल सहा तास दिक्षी सुकेणे येथे संतप्त नातेवाईकांनी रास्ता रोको (Rasta Roko) देखील करण्यात आला. या प्रकरणी ओझर पोलीस ठाण्यात (Ozar Police Station) शेतमालकाच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
चाळीस हजारांची घेतली उचल
मयताचे वडिल निवृत्ती अलबड यांनी दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, राहुल निवृत्ती अलबाड (Rahul Nivrutti Albad) (मुळ गाव सुरगाणा) हा सध्या दिक्षी येथे वास्तव्यास होता. मोलमजूरी करून तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असे. त्याने गावातील शुभम रमेश टर्ले (Shubham Ramesh Tarle) याच्याकडून बहिणीच्या लग्नासाठी चाळीस हजार रुपये उचल घेतली होती.
पैसे फिटेपर्यंत कामावर यावेच लागेल
घटनेच्या दिवशी सकाळी शेतकरी टर्ले यांच्या मुलाने राहुलला सकाळी त्याच्या घरी जाऊन कामावर येण्याचा हट्ट धरला. त्यावेळी राहुलने मी आजारी आहे, कामावर येऊ शकणार नाही, असे सांगितले होते. टर्ले याने त्यास पैसे फिटेपर्यंत तुला कामावर यावेच लागेल, असे म्हटले. टर्ले याने राहुलला जबरदस्तीने मोटरसायकलवर बसवून द्राक्षबागेच्या शेतात नेले. तसेच त्यास शिविगाळ करुन मारहाण केली.
त्रासाला कंटाळून विषारी औषधाचे सेवन
या मानसिक त्रासाला कंटाळून राहुलने टर्ले याच्या शेतात काहीतरी विषारी औषध सेवन केले. यामुळे त्याला उलट्यांचा त्रास होऊ लागला. राहुलला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यास मयत घोषित केले.
रास्ता रोकोनंतर गुन्हा दाखल
यानंतर राहुलच्या नातेवाईकांनी दिक्षी सुकेणे येथे तब्बल सहा तास रास्ता रोको केला. त्यानंतर ओझर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)