एक्स्प्लोर

Nashik Gautami Patil : 'सबसे कातील गौतमी पाटील' आज नाशिक शहरात, रायगड ग्रुपचा लावणी महोत्सव

Nashik Gautami Patil : नृत्याची बिजली गौतमी पाटीलचा लावणी महोत्सवाचा कार्यक्रम नाशिकमध्ये आयोजित करण्यात आला आहे. 

Nashik Gautami Patil : गौतमी पाटील (Gautami Patil) माहित नाही असा माणूस महाराष्ट्रात (Maharashtra) शोधून सापडणार नाही. गेल्या काही दिवसांत गौतमी पाटील क्रेझ भलतीच वाढली आहे. गौतमी पाटीलचा कार्यक्रम कुठेही असो तुफान गर्दी असते. हीच गौतमी पाटील आज (4 मार्च) नाशिकमध्ये (Nashik) लावणी महोत्सवात थिरकणार आहे.

महाराष्ट्रासह देशभरात सध्या नृत्यांगणा गौतमी पाटीलचं (Gautami Patil) नाव चर्चेत आहे. तिच्या नृत्यावर आक्षेप घेतला जात असला तरी तिची आणि तिच्या नृत्याची चांगलीच क्रेझ पाहायला मिळत आहे. अनेकजन गौतमी पाटील चा लावणी महोत्सवाचा कार्यक्रम आयोजित करतात. तिच्या डान्सवर अनेकजण जीव ओवाळून टाकतात. अशातच गौतमी पाटीलचा लावणी महोत्सव नाशिक जिल्ह्यातील निफाड (Niphad) इथे आयोजित करण्यात आला आहे. 

निफाडच्या रायगड ग्रुपच्या माध्यमातून लावणी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा लावणी महोत्सव निफाड शहरातील बस स्टँडशेजारी मार्केट यार्ड परिसरात होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. गौतमी पाटील म्हटल्यावर तुफान गर्दी होणारच, म्हणून या महोत्सवासाठी तिकीट ठेवण्यात आले आहेत. यात 200 रुपये, 500 रुपये, एक हजार रुपये असा लावणी महोत्सवाचा तिकीट दर असणार आहे. तर सायंकाळी साडे चार वाजता कार्यक्रमाला सुरुवात होणार असल्याचे समजते. त्यामुळे लावणी महोत्सवाला चांगलीच गर्दी होणार असल्याचे दिसते. मात्र कार्यक्रमात गर्दी एवढी होते की, पोलिसांना आवरणे कठीण होऊन बसते. आता नाशिकमध्ये पहिल्यांदाच गौतमी पाटील येणार असल्याने तोबा गर्दी होण्याची शक्यता आहे. 

गौतमी पाटील वादाच्या भोवऱ्यात

नृत्यांगणा गौतमी पाटील (Gautami Patil) हे नाव गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. तिच्या प्रत्येक कार्यक्रमाची चर्चा होत आहे. आपल्या नृत्यात अश्लील हावभाव करत असल्याने गौतमीवर प्रचंड टीका झाली. पण त्यानंतर तिच्या लोकप्रियतेत आणखी वाढ झाली. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणांतून तिला नृत्याच्यासाठी बोलवलं जात आहे. दरम्यान दुसरीकडे गौतमीने लावणीला बदनाम केल्याचा आरोप ज्येष्ठ लावणी कलावंतांनी केला आहे. पण या सगळ्या गोष्टींमुळे दिवसेंदिवस गौतमीची लोकप्रियता वाढत आहे. लवकरच तिचा 'घुंगरु' हा मराठी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

गौतमी पाटील कोण आहे?

गौतमी पाटील ही सोशल मीडियावर ओळखीचा आणि प्रसिद्ध चेहरा आहे. आपला डान्स आणि एक्स्प्रेशन्सने गौतमीने तरुणाईला वेड लावलं आहे. 26 वर्षीय गौतमी ही डान्सर असून लावणी डान्सर म्हणून तिला ओळखलं जातं. यूट्यूब, इन्स्टाग्राम, फेसबुक यांसारख्या सोशल प्लॅटफॉर्मवर तिचे व्हिडिओ तुफान व्हायरल होत असतात. इतकंच काय तर अनेक कार्यक्रमांमध्ये गौतमीला डान्स करण्यासाठी बोलवलं जातं आणि त्यासाठी तिला मानधन दिलं जातं. दरम्यान काही दिवसांपूर्वी व्हिडीओमधील डान्स स्टेप्समुळे गौतमी वादाच्या भोवऱ्यात अडकली. सार्वजनिक कार्यक्रमात डान्स करताना गौतमीने आक्षेपार्ह डान्स स्टेप्स केल्या, ज्यामुळे गौतमीला माफी मागावी लागली होती.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Andheri West constituency: अपक्ष उमेदवाराने अर्ज मागे घेतला, अंधेरी पश्चिम मतदारसंघात काँग्रेसची ताकद वाढली, 10 हजारांच्या मताधिक्याने निवडून येण्याचा दावा
अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवाराची माघार, काँग्रेसची ताकद वाढली, 10 हजार मतांनी निवडून येण्याचा दावा
Horoscope Today 05 November 2024 : आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Sada Sarvankar : भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  7 AM : 5 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा:  7 AM :  5 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM : 5 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  6:30 AM : 5 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Andheri West constituency: अपक्ष उमेदवाराने अर्ज मागे घेतला, अंधेरी पश्चिम मतदारसंघात काँग्रेसची ताकद वाढली, 10 हजारांच्या मताधिक्याने निवडून येण्याचा दावा
अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवाराची माघार, काँग्रेसची ताकद वाढली, 10 हजार मतांनी निवडून येण्याचा दावा
Horoscope Today 05 November 2024 : आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Sada Sarvankar : भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Latur : निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना
राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना
Embed widget