एक्स्प्लोर

Ram Kadam :देवेंद्र फडणवीस हा देवमाणूस, हर्षवर्धन सपकाळांनी त्यांच्याबद्दल बोलताना स्वत:ची लायकी ओळखून बोलावं; राम कदमांचा हल्लाबोल

गांधी परिवाराला खुश करण्याच्या नादात स्वतःची लायकी ओळखून त्यांनी माध्यमांसमोर बोलावं. असे म्हणत हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला राम कदमांनी जोरदार हल्लाबोल करत उत्तर दिलं आहे. 

Ram Kadam on Harshvardhan Sapkal : औरंगजेब हा क्रूर शासक होता, देवेंद्र फडणवीस देखील तेवढेच क्रूर आहेत. अशा बोचऱ्या शब्दात  काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. दरम्यान याच मुद्द्यावर भाजप आमदार राम कदम (Ram Kadam) यांनी  जोरदार हल्लाबोल करत हर्षवर्धन सपकाळांवर तोफ डागली आहे.

काँग्रेसचे प्रांत अध्यक्ष यांना नशिबाने लॉटरी लागली आहे. गांधी परिवाराला खुश करण्याच्या नादात स्वतःची लायकी ओळखून त्यांनी माध्यमांसमोर बोलावं. देवेंद्र फडणवीस यांची देव माणूस म्हणून ओळख आहे. ज्यांची कारकीर्द निष्कलंक राहिली आहे. शिवाय त्यांच्यावर बोलण्याआधी प्रांताध्यक्ष यांनी आरशासमोर बसून आपली लायकी ओळखावी आणि मग बोलावं, असे म्हणत राम कदमांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांच्याकडे काही विषय असतील तर आम्ही चर्चा करायला तयार आहोत. पण माध्यमांना ब्रेकिंग देण्यासाठी, गांधी परिवाराला खुश करण्यासाठी लायकी ओळखून बोलावं. असा खोचक सल्लाही आमदार राम कदमांनी  काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांना दिला आहे. 

मुख्यमंत्र्यावर टीका करणे म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा बालिश प्रयत्न- चंद्रशेखर बावनकुळे 

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं वक्तव्य म्हणजे अत्यंत बालिश, बेजबाबदार आणि महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला काळीमा फासणारं आहे. औरंगजेब हा क्रूर, अत्याचारी, धर्मांध शासक होता, ज्यानं हिंदू धर्म आणि हिंदुस्थानच्या अस्मितेवर आघात केले. त्याची तुलना महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या लोकशाहीवादी, सक्षम आणि विकासाभिमुख नेत्याशी करणं म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा बालिश प्रयत्न असल्याची घणाघाती टीका करत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे(Chanrashekhar Bavankule) यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. 

मुख्यमंत्री पदाचा अवमान, हर्षवर्धन सपकाळांवर गुन्हा दाखल व्हावा  

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तुलना औरंगेजबशी करून मुख्यमंत्री पदाचा अवमान केला आहे. त्यामुळे हर्षवर्धन सपकाळ वर गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी आमदार परिणय यांनी केली आहे. आज विधिमंडळात पण हा मुद्दा उपस्थित केला जाणार असल्याचे आमदार परिणय फुके म्हणाले.  तर शिवसेनेने देखील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष  हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. औरंगजेबाची तुलना हि देवेंद्र फडणवीसांशी करणे योग्य नाही. हि बौद्धिक दिवाळखोरी आहे. याची योग्य दखल घेतली जाईल, असे मंत्री आशिष जैस्वाल यांनी सांगितले. तर आज विधिमंडळात पण हा मुद्दा उपस्थित केला जाणार असल्याचे आमदार परिणय फुके म्हणाले. 

हे ही वाचा 

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

पोलीस यंत्रणा ही सरकारच्या दबावाखाली, हुकूमशाहीचा अंत झाल्याशिवाय राहणार नाही, विकास लवांडे प्रकरणावरुन शशिकांत शिंदेंचा हल्लाबोल
पोलीस यंत्रणा ही सरकारच्या दबावाखाली, हुकूमशाहीचा अंत झाल्याशिवाय राहणार नाही, विकास लवांडे प्रकरणावरुन शशिकांत शिंदेंचा हल्लाबोल
Vidhan Parishad Election : परभणी हिंगोली विधान परिषद निवडणूक, उमेदवाराचा स्थानिक विरुद्ध बाहेरील मुद्दा चर्चेत 
परभणी हिंगोली विधान परिषद निवडणूक, उमेदवाराचा स्थानिक विरुद्ध बाहेरील मुद्दा चर्चेत 
Laxman Hake : कॉकरोच जनता पार्टीच्या माध्यमातून तरुणांची भडास व्यक्त, सत्ताधाऱ्यांच्या करेक्ट कार्यक्रम होईल; लक्ष्मण हाकेंचा इशारा
कॉकरोच जनता पार्टीच्या माध्यमातून तरुणांची भडास व्यक्त, सत्ताधाऱ्यांच्या करेक्ट कार्यक्रम होईल; लक्ष्मण हाकेंचा इशारा
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 मे 2026 | गुरुवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 मे 2026 | गुरुवार

व्हिडीओ

Cockroach Janta Party : भाजपवर रोष का? पुढची भूमिका काय? कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजीत दीपके Exclusive
Raj Thackeray Railway Bharti Andolan : रेल्वे भरती आंदोलन प्रकरणातून राज ठाकरेंची निर्दोष मुक्तता
NEET Paper Leak : नीट पेपरफुटीप्रकरणी लातूरच्या डॉ. मनोज शिरुरेला अटक
Amravati MLC Election : अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणूक, पोटे तिसऱ्यांदा मैदानात?
Maharashtra on Petrol Diesel : देशात पुरेसा इंधनसाठा, मग इंधनटंचाई का? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vidhan Parishad Election : परभणी हिंगोली विधान परिषद निवडणूक, उमेदवाराचा स्थानिक विरुद्ध बाहेरील मुद्दा चर्चेत 
परभणी हिंगोली विधान परिषद निवडणूक, उमेदवाराचा स्थानिक विरुद्ध बाहेरील मुद्दा चर्चेत 
'राजकारणात आहात तर मग...' भाजपवासी झालेल्या खासदार राघव चड्ढांना दिल्ली हायकोर्टाचा तगडा झटका! प्रकरण नेमकं आहे तरी काय?
'राजकारणात आहात तर मग...' भाजपवासी झालेल्या खासदार राघव चड्ढांना दिल्ली हायकोर्टाचा तगडा झटका! प्रकरण नेमकं आहे तरी काय?
Bank Layoff: कर्मचारी कपातीचं वारं बँकिंग क्षेत्रातही, 7000 नोकऱ्या संपवण्याचा 'या' बँकेचा निर्णय, एआय आणि रोबोटची मदत घेणार
कर्मचारी कपातीचं वारं बँकिंग क्षेत्रातही, 7000 नोकऱ्या संपवण्याचा 'या' बँकेचा निर्णय, एआय आणि रोबोटची मदत घेणार
Cockroach Janta Party : कॉकरोच जनता पार्टीचे नवे एक्स अकाऊंट सुरु, अभिजीत दीपकेची माहिती, योगेंद्र यादव यांचं CJP बद्दल मोठं वक्तव्य
2 लाख फॉलोअर्स असलेलं एक्स अकाऊंट बंद, अभिजीत दीपकेकडून CJP चं नवं खातं सुरु
Cockroach Janta Party: धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, कॉकरोच जनता पार्टीची पहिली राजकीय मागणी, नव्या एक्स खात्यावर चार शब्दांची पोस्ट
 धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, कॉकरोच जनता पार्टीची मागणी, नव्या एक्स खात्यावर चार शब्दांची पोस्ट
जागतिक पातळीवर पंतप्रधान 'रिजेक्ट माल' ठरतायेत, त्यांच्यामुळं भारताची मान शर्मेनं खाली, नाना पटोलेंचा हल्लाबोल 
जागतिक पातळीवर पंतप्रधान 'रिजेक्ट माल' ठरतायेत, त्यांच्यामुळं भारताची मान शर्मेनं खाली, नाना पटोलेंचा हल्लाबोल 
Share Market : सेन्सेक्स आणि निफ्टीत अखेरच्या टप्प्यात घसरण मात्र गुंतवणूकदारांनी दीड लाख कोटी कमावले, बाजारात काय घडलं?
सेन्सेक्स आणि निफ्टीत अखेरच्या टप्प्यात घसरण मात्र गुंतवणूकदारांनी दीड लाख कोटी कमावले, बाजारात काय घडलं?
इराणचा तोंड दाबून बुक्क्यांचा मारा देताच नेत्यानाहू अन् ट्रम्पच्या जिगरी दोस्तीत कुस्ती लागली! एक तासाच्या फोनाफोनीत शाब्दिक चकमकीत काय घडलं? गेल्या 24 तासांतील 5 प्रमुख घडामोडी
इराणचा तोंड दाबून बुक्क्यांचा मारा देताच नेत्यानाहू अन् ट्रम्पच्या जिगरी दोस्तीत कुस्ती लागली! एक तासाच्या फोनाफोनीत शाब्दिक चकमकीत काय घडलं? गेल्या 24 तासांतील 5 प्रमुख घडामोडी
Embed widget