एक्स्प्लोर

Amol Mitkari : औरंगजेबाच्या कबरीवरुन राजकारण करणाऱ्यांनी आधी सोलापूरकर आणि कोरटकरबद्दल बोलावे; अमोल मिटकरींचा महायुतीला घरचा आहेर

Amol Mitkari On Aurangzeb Kabar : औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मुद्यावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. यावरून अमोल मिटकरी यांनी महायुती सरकारलाच घरचा आहेर दिलाय.

Amol Mitkari On Aurangzeb Kabar : छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhajinagar) खुलताबाद येथे असलेल्या औरंगजेबाची कबर (Aurangzeb kabar) हटवण्याच्या मुद्यावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. महाराष्ट्रातून औरंगजेबाची कबर हटवा अन्यथा बाबरीची पुनरावृत्ती होईल, असा इशारा विश्व हिंदू परिषदेसह (vishwa hindu parishad) बजरंग दलाने (Bajrang Dal) दिला आहे. आता यावरून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी महायुती सरकारलाच घरचा आहेर दिला आहे. औरंगजेबाच्या कबरीवरुन राजकारण करणाऱ्यांनी आधी सोलापूरकर आणि कोरटकरबद्दल बोलावे, असे त्यांनी म्हटले आहे. 

नेमकं काय म्हणाले अमोल मिटकरी? 

अमोल मिटकरी म्हणाले की, औरंगजेबच्या कबरीचं राजकारण करणार्‍यांनी आधी सोलापूरकर व कोरटकर यांची कबर कधी खोदणार त्याचं उत्तर द्यावं, मी सत्तेतला आमदार आहे. कोटकरचं मुख्यमंत्र्यानी सांगितलं की, त्यांना मिळालेल्या जामीनाविरोधात कोर्टात युक्तीवाद करणार, पण सोलापूरकरचं काय? त्याला अजून का अटक नाही हा संशोधणाचा विषय आहे. जो पर्यंत तो विषय मार्गी लागत तोपर्यंत तो लावून धरणार, तर चुकीचा इतिहास सांगणारे नितेश राणे व अतुल भाटकर यांना त्यांना समजतील अशी पुस्तक भेट देतो. ते मला ब्रिगेडिअर विचाराचा समजतात, असे त्यांनी म्हटले आहे. 

सुप्रिया सुळेंच्या वक्तव्यावर अमोल मिटकरींची प्रतिक्रिया

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या आढावा बैठकीत सुप्रिया सुळे यांनी केलेले वक्तव्य सध्या चांगलेच चर्चेत आले आहे. सुप्रिया सुळे यांची या बैठकीतील ऑफ द रेकॉर्ड भाषणाची ऑडिओ क्लीप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय की, धनंजय मुंडे यांच्याविरोधात ते पक्षात असतानाही माझी लढाई सुरु होती. मला कधी कधी वाटतं, बरं झालं पक्ष फुटला. कारण या सगळ्या प्रकारानंतर एकतर ते तरी पक्षात राहिले असते किंवा मी तरी पक्षात राहिले असते. जिथे हा माणूस असेल त्या पक्षात मी काम करु शकत नाही. ते पक्षात असतानाही माझी त्यांच्याविरोधात लढाई सुरु होती, असे त्यांनी म्हटले. याबाबत विचारले असता अमोल मिटकरी म्हणाले की, सुप्रिया ताई त्यांच्या पक्षाच्या बैठकीत बोलल्या आहेत. त्यांच्या पक्ष वाढीसाठी बीडच्या घटनेनंतर त्या बोलल्या असल्याने ठीक आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. 

आणखी वाचा 

Sanjay Raut : औरंगजेबाच्या कबरीला केंद्र सरकारचं संरक्षण, कबर हटवण्याचा अध्यादेश काढण्याची हिंमत आहे का? संजय राऊतांचा थेट वार; म्हणाले,'विहिंप, बजरंग दल आरएसएसचे पिल्लं!

About the author सुरज सावंत

सुरज सावंत हे जवळपास 10 वर्षांपासून माध्यमात कार्यरत आहेत. राजकारण, क्राईम यावर त्यांचा विशेष पकड आहे.
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मोदींच्या आवाहनाला हरताळ, अमित साटम 25 गाड्यांचा ताफा घेऊन नालेसफाई पाहणीला, रोहित पवार अन् आदित्य ठाकरेंची टीका
मोदींच्या आवाहनाला हरताळ, अमित साटम 25 गाड्यांचा ताफा घेऊन नालेसफाई पाहणीला, रोहित पवार अन् आदित्य ठाकरेंची टीका
Rupali Chakankar ED Inquiry : दोन दिवसांआधी SIT चौकशी; आज रुपाली चाकणकरांना ईडीचं समन्स, भोंदू अशोक खरात प्रकरणी मोठी घडामोड
दोन दिवसांआधी SIT चौकशी; आज रुपाली चाकणकरांना ईडीचं समन्स, भोंदू अशोक खरात प्रकरणी मोठी घडामोड
Tamilnadu CM Vijay Thalapathy : भ्रष्ट राजकारण्यांना हरवणारा 'नायक' आता सत्तेच्या खुर्चीवर; विजय यांच्या मुख्यमंत्रीपदाची सातासमुद्रापार चर्चा, 'या' देशाच्या पंतप्रधान म्हणाले, 'एका बोटाची क्रांती'...
भ्रष्ट राजकारण्यांना हरवणारा 'नायक' आता सत्तेच्या खुर्चीवर; विजय यांच्या मुख्यमंत्रीपदाची सातासमुद्रापार चर्चा, 'या' देशाच्या पंतप्रधान म्हणाले, 'एका बोटाची क्रांती'...
Raj Thackeray On Narendra Modi: नरेंद्र मोदी म्हणाले, सोनं खरेदी करु नका, पेट्रोल-डिझेल जपून वापरा; राज ठाकरेंनी बेधडक 10 मुद्दे मांडले!
नरेंद्र मोदी म्हणाले, सोनं खरेदी करु नका, पेट्रोल-डिझेल जपून वापरा; राज ठाकरेंनी बेधडक 10 मुद्दे मांडले!

व्हिडीओ

Chandrashekhar Bawankule on Narendra Modi : नरेंद्र मोदींच्या हातात देश सुरक्षित आहे!
Kolhapur Gold Silver : सोनं खरेदी थांबवा मोदींकडून आवाहन, कोल्हापुरातील सराफा व्यापारी काय म्हणाले?
Ambadas Danve on Modi : मोदींना आवाहन करावं लागतं म्हणजे त्यांनी अपयशाची कबुली दिली
Tamil Nadu News : तामिळनाडूत अण्णाद्रमुकमध्ये उभी फूट? प्रकरण काय?
Raj Thackeray On Modi : देशाच्या, राज्याच्या अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडून ठेवलंय- राज ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जळगावात लघु पाटबंधारेच्या भूसंपादनात कोट्यवधींचा घोटाळा; 2 वकिलांसह 7 शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हा, उडाली खळबळ
जळगावात लघु पाटबंधारेच्या भूसंपादनात कोट्यवधींचा घोटाळा; 2 वकिलांसह 7 शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हा, उडाली खळबळ
NEET Exam Cancelled : नीट परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप, मानसिक आणि आर्थिक ताण वाढला
NEET परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप, मानसिक आणि आर्थिक ताण वाढला
Mahadev Jankar: महादेव जानकरांचा मेंढपाळाच्या वाड्यावर मुक्काम; गोधढी पांघरुन शेतात पालावर निवांत झोपले
महादेव जानकरांचा मेंढपाळाच्या वाड्यावर मुक्काम; गोधढी पांघरुन शेतात पालावर निवांत झोपले
मोदींच्या आवाहनाला हरताळ, अमित साटम 25 गाड्यांचा ताफा घेऊन नालेसफाई पाहणीला, रोहित पवार अन् आदित्य ठाकरेंची टीका
मोदींच्या आवाहनाला हरताळ, अमित साटम 25 गाड्यांचा ताफा घेऊन नालेसफाई पाहणीला, रोहित पवार अन् आदित्य ठाकरेंची टीका
नाशिक ते हरियाणा.... NEET पेपरफुटीचं कनेक्शन समोर, पहिली प्रश्नपत्रिका नाशिकमधून, कोण आहे मास्टरमाईंड?
नाशिक ते हरियाणा.... NEET पेपरफुटीचं कनेक्शन समोर, पहिली प्रश्नपत्रिका नाशिकमधून, कोण आहे मास्टरमाईंड?
Thane Politics: अंबरनाथ नगरपरिषदेतील सत्तासंघर्षाला नवं वळण, शिवसेना-भाजप युतीच्या चर्चेत ट्विस्ट, 3 विरुद्ध 2 वर्षांचा फॉर्म्युला?
अंबरनाथ नगरपरिषदेतील सत्तासंघर्षाला नवं वळण, शिवसेना-भाजप युतीच्या चर्चेत ट्विस्ट, 3 विरुद्ध 2 वर्षांचा फॉर्म्युला?
Singer Accused on Trisha Krishnan: थलपती विजय यांच्या शपथविधीसोहळ्यात मिरवणाऱ्या तृषा कृष्णनवर भडकली प्रसिद्ध गायिका; म्हणाली, 'त्याची पत्नी अन् मुलांचा...'
थलपती विजय यांच्या शपथविधीसोहळ्यात मिरवणाऱ्या तृषा कृष्णनवर भडकली प्रसिद्ध गायिका; म्हणाली, 'त्याची पत्नी अन् मुलांचा...'
Devendra Fadnavis मोठी बातमी: मुख्यमंत्री फडणवीसांच्या मंजूरी शिवाय मंत्र्यांना विमान वापरता येणार नाही; नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर अंमलबजावणी सुरु
मुख्यमंत्री फडणवीसांच्या मंजूरी शिवाय मंत्र्यांना विमान वापरता येणार नाही; नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर अंमलबजावणी सुरु
Embed widget