Beed Crime: बीडमध्ये गुन्ह्यांवर गुन्हे, पेट्रोल दिलं नाही म्हणून शिवीगाळ करत लोखंडी रॉड डोक्यात टाकला, माजलगावचं धक्कादायक CCTV फुटेज व्हायरल
या घटनेनंतर तीघांवर माजलगाव पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

Beed Crime: गेल्या तीन महिन्यांपासून बीड गुन्हेगारी घटनांचे केंद्रबिंदू झालेले असताना धाकदपट, बंदूकीची दहशत, खून प्रकरणे, खंडणीखोरांची धूडगुस अशा कितीतरी घटनांनी संपूर्ण राज्य हादरले आहे. बीडच्या वाढत्या गुन्हेगारीवर कसा अंकुश ठेवायचा? असा प्रश्न प्रशासनाला पडलेला असताना मारहाणीच्या घटनाही शहरात वाढल्या आहेत. नुकतेच ट्रकमालकाने चालकाला डांबून ठेवत बेदम मारहाण केली, यात तरुणाचा जीव गेल्याची घटना ताजी आहे. याच दरम्यान, धुलिवंदनाच्या दिवशी पेट्रोल देण्यास नकार देताच एका तरुणास तिघांनी शिवीगाळ करत लोखंडी रॉडने फोडून काढल्याची घटना बीडच्या माजलगाव शहरात घडली आहे. या घटनेचा थरारक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय. (Crime News)
एखाद्या साऊथच्या फिल्ममधला सीन असल्यासारखा वाटणारा हा व्हिडिओ बीडमधून व्हायरल झालाय. यात दोन तीन जण हातात लोखंडी रॉड घेऊन तरुणाचा पाठलाग करताना दिसत आहेत. एका फटक्यात एका तरुणाने दुसऱ्या तरुणाच्या डोक्यात राॅड घातल्याचे यात दिसते. जोरदार लोखंडी रॉडचा फटका डोक्यात बसल्याने तरुण जागीच खाली कोसळल्याचे या चित्रफीतीत दिसत आहे. माजलगाव शहरात घडलेल्या या घटनेनंतर कृष्णा कांबळे, अरबाज पठाण आणि अर्जुन गरड या तिघांच्या विरोधात माजलगाव शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. माजलगाव शहरातील एका पेट्रोलपंपावर धुलिवंदनाच्या दिवशी ही घटना घडली होती. (Beed)
बीडमध्ये पुन्हा एक मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल
पेट्रोल देण्यास नकार देणाऱ्या वर लोखंडी रॉडने हल्ला केल्याची घटना घडल्याने माजलगाव परिसरात मोठी खळबळ उडली आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले आहे. यात तीन चार तरुण एका तरुणाचा पाठलाग करताना या व्हिडिओत दिसतात. एकाच्या हातात लोखंडी रॉड आहे. एका रस्त्यावरून जीवाच्या भीतीने पळून जाणाऱ्या एका तरुणाला त्याच्या मागे जात एकजण लोखंडी रॉडचा एक जोरात फटका मारतो. तसा तरुण जागेवरच कोसळतो. यानंतर त्यांच्यापैकीत दोन जण त्या तरुणाला उठवून बसवतात, असे चित्र या फुटेजमध्ये कैद झाले आहे. धुलिवंदनाच्या दिवशी पेट्रोल देण्यास नकार दिल्याने शिवीगाळ करत तिघांनी लोखंडी रॉडने हल्ला केल्याची घटना घडल्याचे सांगण्यात येतंय. या घटनेनंतर माजलगाव पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

