एक्स्प्लोर

NIA Raids PFI : पॉप्युलर फ्रंटच्या चौघांना नाशिक जिल्हा न्यायालयात हजर करणार, बीड, पुणे, मालेगाव येथून अटक

NIA Raids PFI :  बीड, पुणे, मालेगाव (Malegaon) येथून ताब्यात घेण्यात आलेल्या चौघा संशयिताना नाशिकच्या (Nashik) एटीएस (Nashik ATS Office) कार्यालयात ठेवण्यात आले आहे.

NIA Raids PFI :  राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) पॉपुलर फंड ऑफ इंडियाच्या कार्यालयांवर (PFI) देशभरात छापेमारी सुरू केली आहे. महाराष्ट्रातही पुणे, नवी मुंबई, भिवंडी, औरंगाबादसह (Aurangabad) इतर ठिकाणी छापेमारी सुरू आहे. अशातच बीड, पुणे, मालेगाव (Malegaon) येथून चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या चार जणांना नाशिकच्या एटीएस (Nashik ATS Office) कार्यालयात ठेवण्यात आले आहे. त्यांना थोड्याच वेळात नाशिक (Nashik) जिल्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. 

राष्ट्रीय तपास संस्थेने देशभरात ठिकठिकाणी पॉपुलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यालयांवर छापेमारी सुरू केली आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने रात्री तीन वाजता नवी मुंबईतील (Mumbai) नेरूळमधील पीएफआय च्या कार्यालयावर छापा मारला. तर पुण्यातही कारवाई सुरू असून दोघांना ताब्यात घेतले आहे. त्याचबरोबर औरंगाबाद मधून देखील एटीएसने चौघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. तर संवेदनशील समजले जाणाऱ्या मालेगाव मधून देखील सैफुर रहमान यास एटीएसने ताब्यात घेतले आहे.

मालेगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या हुडको कॉलनी परिसरातील घरातून सैफुर रहमानला आज पहाटे चारच्या सुमारास एटीएसच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. त्याच्या घरातून काही महत्वाची कागदपत्रेही हस्तगत करण्यात आल्याची माहिती आहे. सैफुरला ताब्यात घेतल्यानंतर नाशिक जिल्हा रुग्णालयात त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात येऊन भद्रकाली परिसरातील एटीएस कार्यालयात त्याला आणण्यात आले आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पथकाकडून कार्यालयात त्याची कसून चौकशी केली जात आहे. सैफुरवर मालेगावला यापूर्वी काही आंदोलनाचे गुन्हे दाखल आहेत. PFI चा नाशिक जिल्हाध्यक्ष तसेच राज्यसंघटनेचेही त्याच्याकडे पद असल्याची चर्चा आहे.

दरम्यान या छापेमारी बाबत अत्यंत गोपनीयता बाळगण्यात आली असून त्यामुळे अद्याप अधिकृत माहिती पुढे आली नाही. दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी एनआयएकडून ही छापेमारी सुरू करण्यात आले आहे. पीएफ आईचे महाराष्ट्रातील मुख्य कार्यालय कोंढवा भागात आहे. या ठिकाणी काही प्रशिक्षण केंद्र चालवले जात असल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळते आहे.

पुणे, बीड मधील संशयित नाशिकमध्ये
दरम्यान बीड, पुणे जिल्ह्यातून ताब्यात घेण्यात आलेल्या संशयिताना नाशिकच्या एटीएस कार्यालयात ठेवण्यात आले आहे. यामध्ये पुण्यातील दोघे, बीडमधील एक व मालेगाव येथून ताब्यात घेण्यात आलेला एक जण अशा चौघांना थोड्याच वेळात नाशिक जिल्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.दरम्यान मालेगावमध्ये ईडी आणि छापे टाकले असून यात एकाला अटक करण्यात आले आहे. पहाटे एनआयए च्या टीमने राज्यभरात अनेक ठिकाणी मुस्लिम संघटना असलेल्या पॉप्युलर फंड ऑफ इंडियावर रात्री तीन वाजता छापेमारी सुरू केली. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईत ठाकरेंची मोठी खेळी, मनसेचा बडा मोहरा फोडला, अखिल चित्रे ठाकरे गटात प्रवेश करणार
मुंबईत ठाकरेंची मोठी खेळी, मनसेचा बडा मोहरा फोडला, अखिल चित्रे ठाकरे गटात प्रवेश करणार
Dilip Walse Patil : तर काही ना काही करून गणित घालावं लागेल! शरद पवारांच्या मानसपुत्राकडून समीकरण बदलाचे संकेत?
तर काही ना काही करून गणित घालावं लागेल! शरद पवारांच्या मानसपुत्राकडून समीकरण बदलाचे संकेत?
Mumbai Suburban District Vidhan Sabha Election: मुंबई उपनगरात कोणता पक्ष सरस ठरणार? 26 मतदारसंघ ठरवणार मुंबईच्या राजकारणाची दिशा
मुंबई उपनगरात कोणता पक्ष सरस ठरणार? 26 मतदारसंघ ठरवणार मुंबईच्या राजकारणाची दिशा
Wardha Assembly Election : वर्धा जिल्ह्यातील लढती, कोण-कोण भिडणार? 4 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Wardha Assembly Election : वर्धा जिल्ह्यातील लढती, कोण-कोण भिडणार? 4 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sunil Tatkare :लोकसभेला मला फसवलं,यावेळी तसं करु नका;मुस्लिम कार्यकर्त्यांना तटकरेंचे चिमटेMrunali Raje Bhosale Satara:बाबांसाठी छत्रपतींची लेक मैदानात ;Shivendrarajeसाठी मृणालीराजेंचा प्रचारAjit Pawar Full PC : शरद पवारांवर टीका, अजितदादांचा संताप, Sadabhau khot यांना म्हणाले...ABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 07 November 2024 दुपारी २ च्या हेडलाईन्स-

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबईत ठाकरेंची मोठी खेळी, मनसेचा बडा मोहरा फोडला, अखिल चित्रे ठाकरे गटात प्रवेश करणार
मुंबईत ठाकरेंची मोठी खेळी, मनसेचा बडा मोहरा फोडला, अखिल चित्रे ठाकरे गटात प्रवेश करणार
Dilip Walse Patil : तर काही ना काही करून गणित घालावं लागेल! शरद पवारांच्या मानसपुत्राकडून समीकरण बदलाचे संकेत?
तर काही ना काही करून गणित घालावं लागेल! शरद पवारांच्या मानसपुत्राकडून समीकरण बदलाचे संकेत?
Mumbai Suburban District Vidhan Sabha Election: मुंबई उपनगरात कोणता पक्ष सरस ठरणार? 26 मतदारसंघ ठरवणार मुंबईच्या राजकारणाची दिशा
मुंबई उपनगरात कोणता पक्ष सरस ठरणार? 26 मतदारसंघ ठरवणार मुंबईच्या राजकारणाची दिशा
Wardha Assembly Election : वर्धा जिल्ह्यातील लढती, कोण-कोण भिडणार? 4 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Wardha Assembly Election : वर्धा जिल्ह्यातील लढती, कोण-कोण भिडणार? 4 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
माजी आमदार संगीता ठोंबरेंचा राष्ट्रवादीत प्रवेश; आधी अर्ज माघारी, आता हाती तुतारी; नमिता मुंदडांना दे धक्का
माजी आमदार संगीता ठोंबरेंचा राष्ट्रवादीत प्रवेश; आधी अर्ज माघारी, आता हाती तुतारी; नमिता मुंदडांना दे धक्का
शरद पवारांचा उमेदवार म्हणाला, पोरांची लग्न लाऊन देतो; धनंजय मुंडे म्हणाले, तुमच्या माजी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांचं तरी लग्न झालंय का?
शरद पवारांचा उमेदवार म्हणाला, पोरांची लग्न लाऊन देतो; धनंजय मुंडे म्हणाले, तुमच्या माजी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांचं तरी लग्न झालंय का?
Jayant Patil : भाजपने डॉग स्क्वाड बाळगलेय, सदाभाऊंना प्रायश्चित्त करावं लागेल; जयंत पाटलांचा हल्लाबोल
भाजपने डॉग स्क्वाड बाळगलेय, सदाभाऊंना प्रायश्चित्त करावं लागेल; जयंत पाटलांचा हल्लाबोल
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'ते' वक्तव्य सकाळी केलं की संध्याकाळी केलं पाहावं लागेल! शिंदे गटाचा राज ठाकरेंना 'बोचरा' बाण!
'ते' वक्तव्य सकाळी केलं की संध्याकाळी केलं पाहावं लागेल! शिंदे गटाचा राज ठाकरेंना 'बोचरा' बाण!
Embed widget