एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

NIA Raids PFI Maharashtra : दहशतवाद्यांना आर्थिक मदत: NIA-ATS कडून राज्यात ठिकठिकाणी छापेमारी, 16 जण ताब्यात

NIA Raids PFI Maharashtra : दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी एनआयए, ईडी आणि दहशतवाद विरोधी पथकाने राज्यातील विविध ठिकाणी छापेमारी केली आहे. तपास यंत्रणांनी 15 हून अधिकजणांना ताब्यात घेतले आहे.

NIA Raids PFI : राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या  (PFI) कार्यालयांवर देशभरात छापेमारी (NIA Raids on PFI office) सुरू केली आहे. महाराष्ट्रातही पुणे, नवी मुंबई, भिवंडी, मालेगावसह इतर ठिकाणी छापेमारी सुरू केल्याचे वृत्त आहे. एनआयएने मध्यरात्री तीन वाजताच नवी मुंबईतील नेरूळमधील सेक्टर 23 मधील PFI च्या कार्यालयावर छापा मारला. तर, पुण्यातही कारवाई सुरू असून दोघांना ताब्यात घेतले आहे. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे कार्यकर्ते अब्दुल कय्याम शेख आणि रझा खान या दोघांना तपास यंत्रणांनी ताब्यात घेतले आहे. मालेगावमधूनही एटीएसने एकाला ताब्यात घेतले आहे. औरंगाबादमधून एटीएसने चौघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. 

कोंडवा भागातील PFI कार्यलयावर छापेमारी केली आहे. पुण्यात PFI आपल्या हालचालींचे केंद्र तयार करत असल्याचे गुप्तचर संस्थांना संशय आहे.  एनआयए, महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने ही कारवाई केली आहे. या छाप्यात पीएफआयच्या कार्यालयातील काही साहित्य जप्त करण्यात आले आहे.  त्याचबरोबर नाशिकमधे दाखल असलेल्या गुन्ह्याबद्दल काही जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.  पीएफआयचे महाराष्ट्रातील मुख्य कार्यालय पुण्यातील कोंढवा भागात आहे.

दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी एनआयएकडून छापेमारी सुरू आहे. महाराष्ट्रातील गुप्तचर संस्थांनी तपास यंत्रणांना दिलेल्या माहितीनुसार, पीएफआयने पुणे जिल्ह्याला आपले मुख्य केंद्र तयार केले आहे. पुण्यातील काही ठिकाणी प्रशिक्षण केंद्र चालवले जात आहेत. त्याशिवाय SDPI संघटनेकडून जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यात सभासद नोंदणी सुरू केली असल्याचे गुप्तचर यंत्रणांनी म्हटले. 

मुंबई, नाशिक औरंगाबाद आणि नांदेड येथे आयपीसीच्या विविध कलमांतर्गत (153 अ, 121 अ, 109, 120 ब) आणि यूएपीए कलम 13(1) (ब) मध्ये अंतर्गत गु्न्हे दाखल करण्यात आले आहेत. समाजात वैर वाढवणाऱ्या बेकायदेशीर कृत्यांमध्ये सहभागी होण्यासाठी आणि कट रचल्याबद्दल चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.  

राज्यात कोणत्या जिल्ह्यात कारवाई सुरू

 मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, नांदेड, परभणी या जिल्ह्यांमध्ये एनआयए, महाराष्ट्र एटीएसने कारवाई केली आहे. आणखी काही जिल्ह्यांमध्ये कारवाई होण्याची शक्यता आहे. 

देशभरातही छापेमारी

एनआयए, ईडीसह स्थानिक तपास यंत्रणांकडून देशभरात पीएफआयच्या कार्यालयांवर छापेमारी करण्यात आली आहे. केरळमध्येच 50 ठिकाणी छापेमारी सुरू आहे. त्याशिवाय कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थान, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पश्चिम बंगालमध्ये छापेमारी सुरू आहे. काही राज्यांमध्ये पीएफआयचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. काहींना अटकही करण्यात आली आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
Rishabh Pant : लखनौनं रिषभ पंतसाठी 27 कोटी रुपये मोजले, सरकारला करापोटी कोट्यवधी रुपये द्यावे लागणार,रिषभच्या खात्यात किती कोटी राहणार?
लखनौनं रिषभ पंतसाठी 27 कोटी रुपये मोजले, कोट्यवधी रुपये करापोटी द्यावे लागणार, हातात किती येणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 7PM TOP Headlines 7 PM 26 November 2024Pan 2.0 : केंद्र सरकारकडून पॅन 2.0 या योजनेला मंजुरी, पॅन कार्डमध्ये बदल होणारEknath shinde On CM : शिंदे फडणीसांपासून लांब,  मुख्यमंत्रिपदावरुन एकनाथ शिंदे नाराज?ABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6 PM 26 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
Rishabh Pant : लखनौनं रिषभ पंतसाठी 27 कोटी रुपये मोजले, सरकारला करापोटी कोट्यवधी रुपये द्यावे लागणार,रिषभच्या खात्यात किती कोटी राहणार?
लखनौनं रिषभ पंतसाठी 27 कोटी रुपये मोजले, कोट्यवधी रुपये करापोटी द्यावे लागणार, हातात किती येणार?
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
Manda Mhatre : गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
Cidco Lottery 2024 : सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर”महागृहनिर्माण योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 11 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर” योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 92 हजार अर्ज दाखल
अशा निवडणुका पाकिस्तानातही होत नाहीत, निवडणूक आयोग जिवंत आहे का; संजय राऊतांकडून व्हिडिओ शेअर
अशा निवडणुका पाकिस्तानातही होत नाहीत, निवडणूक आयोग जिवंत आहे का; संजय राऊतांकडून व्हिडिओ शेअर
Embed widget