एक्स्प्लोर

Sambhaji Raje Chhatrapati: पोलिसांनी कार्यकर्त्यांना गाडीत डांबलं, संभाजीराजे गरजले, डीसीपी मुंडेंना म्हणाले, त्यांना कुठे न्यायचं नाही

Sambhaji Raje Chhatrapati: सरदार पटेल यांचा पुतळा उभा राहिला पण छत्रपतींचा अजून उभा राहीला नाही; संभाजीराजेंचा उद्विग्न सवाल. अरबी समुद्रातील शिवस्मारक शोधण्याची मोहीम

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरबी समुद्रात जलपूजन केलेल्या शिवस्मारकाचा शोध घेण्यासाठी संभाजीराजे छत्रपती हे रविवारी स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांसह मुंबईत धडकले. संभाजीराजे गेट वे ऑफ इंडियाच्या परिसरातून बोटीने मोदींनी (PM Modi) जलपूजन केलेल्या शिवस्मारकाच्या (Chhatrapati Shivaji Maharaj memorial) ठिकाणी जाणार होते. मात्र, पोलिसांनी याठिकाणी संभाजीराजे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना अडवून धरल्याने एकच गोंधळ पाहायला मिळाला. यावेळी महाराष्ट्र स्वराज्य संघटनेचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये काहीशी झटापट झाली. पोलीस महाराष्ट्र स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांना गाडीत डांबून ठाण्यात नेत होते. त्यावेळी संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक होत हस्तक्षेप केला.

माझे कार्यकर्ते हे काही आरोपी नाहीत. त्यांना कुठेही न्यायचे नाही. त्यांना आताच्या आता गाडीतून खाली उतरवा, असे संभाजीराजे यांनी पोलिसांच्या पथकाचे नेतृत्व करत असलेल्या डीसीपी मुंडे यांना सांगितले. त्यानंतर डीसीपी मुंडे आणि संभाजीराजे यांच्यात चर्चा झाली आणि स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी सोडून दिले. यानंतर संभाजीराजे यांनी एक छोटेखानी भाषण करत आपली भूमिका मांडली. यानंतर पोलिसांनी संभाजीराजे यांच्यासह 50 जणांना अरबी समुद्रातील शिवस्मारकाचे जलपूजन झालेल्या जागेपर्यंत जाण्यास परवानगी दिली. 

संभाजीराजेंचा पोलिसांवर दडपशाहीचा आरोप

सुरुवातीला पोलीस संभाजीराजे छत्रपती यांना अरबी समुद्रात बोटीने जायला परवानगी देत नव्हते. या परिसरात प्रचंड पोलीस बंदोबस्त होता. त्यावेळी संभाजीराजे आक्रमक झाले. त्यांनी पोलिसांना म्हटले की, तुम्ही दडपशाही करत आहात. आम्हाला कायदा हातात घ्यायचा नाही. आमचे आंदोलन हे केवळ प्रतिकात्मक आहे, असे संभाजीराजे यांनी म्हटले.

मी गेली अनेक वर्षे शिवरायांच्या गडकिल्ल्यांचं जतन करत आहे. माझ्या प्रयत्नांमुळे रायगड किल्ल्याच्या संवर्धनाला सुरुवात झाली. यावरुन तुम्हाला माझी प्रामाणिक भावना दिसून येईल. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. याठिकाणी शिवाजी महाराजांचं स्मारक व्हावं, अशी अनेक नेत्यांची इच्छा होती. सुशीलकुमार शिंदे आणि अशोक चव्हाण यांनी याबाबत घोषणा केली, यानंतर काँग्रेसच्या जाहीरनाम्यातही अरबी समुद्रातील स्मारकाचा समावेश होता. पण नंतर ते पाण्यात गेले. 2014 साली भाजपनेही आपल्या जाहीरनाम्यात शिवस्मारकाचा उल्लेख केला. 2016 साली पंतप्रधान मोदी यांनी घाईगडबडीत या स्मारकाचे जलपूजन उरकले. पंतप्रधान सर्व परवानग्या असल्याशिवाय जलपूजनाला येणार नाहीत. मात्र, त्यानंतर आठ वर्षे काहीच घडले नाही, असे संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटले. 

आणखी वाचा

सरदार पटेल यांचा पुतळा उभा राहिला पण छत्रपतींचा अजून उभा राहीला नाही; संभाजीराजेंचा उद्विग्न सवाल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 जानेवारी 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 जानेवारी 2024 | सोमवार
Suresh Dhas Full PC : जोपर्यंत तपास संपत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंनी पदावर राहू नये
Suresh Dhas Full PC : जोपर्यंत तपास संपत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंनी पदावर राहू नये
अल्पवयीन नणंद थेट वहिनीच्या प्रेमात पडली, दोघींचा लग्न करण्याचा निर्णय; घरच्यांकडून बेदम मारहाण!
अल्पवयीन नणंद थेट वहिनीच्या प्रेमात पडली, दोघींचा लग्न करण्याचा निर्णय; घरच्यांकडून बेदम मारहाण!
Video: मनोज जरांगेंचा पुन्हा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल; गुंडांना बोलायचे नाही का, आमचे मुडदे पडू द्यायचे का?
Video: मनोज जरांगेंचा पुन्हा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल; गुंडांना बोलायचे नाही का, आमचे मुडदे पडू द्यायचे का?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nitin Bikkad on Suresh Dhas:मी वाल्मिक कराडांना कधीच भेटलो नाही,बिक्कडांना फेटाळे सुरेश धसांचे आरोपAPMC Kesari Mango : 5 डझानाच्या पेटीला 15 हजारांचा भाव, APMCत आंब्याची पहिली पेटी दाखल!Suresh Dhas Full PC : जोपर्यंत तपास संपत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंनी पदावर राहू नयेABP Majha Marathi News Headlines 5PM TOP Headlines 5PM 06 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 जानेवारी 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 जानेवारी 2024 | सोमवार
Suresh Dhas Full PC : जोपर्यंत तपास संपत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंनी पदावर राहू नये
Suresh Dhas Full PC : जोपर्यंत तपास संपत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंनी पदावर राहू नये
अल्पवयीन नणंद थेट वहिनीच्या प्रेमात पडली, दोघींचा लग्न करण्याचा निर्णय; घरच्यांकडून बेदम मारहाण!
अल्पवयीन नणंद थेट वहिनीच्या प्रेमात पडली, दोघींचा लग्न करण्याचा निर्णय; घरच्यांकडून बेदम मारहाण!
Video: मनोज जरांगेंचा पुन्हा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल; गुंडांना बोलायचे नाही का, आमचे मुडदे पडू द्यायचे का?
Video: मनोज जरांगेंचा पुन्हा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल; गुंडांना बोलायचे नाही का, आमचे मुडदे पडू द्यायचे का?
Mukesh Chandrakar Murder Case : पोस्टमॉर्टम अहवालात डोक्यात 15 खुणा, लिव्हरचे 4 तुकडे, मान, बरगड्या अन् हृदय सुद्धा तुटलेल्या स्थितीत
छत्तीसगड पत्रकार हत्या : पोस्टमॉर्टम अहवालात डोक्यात 15 खुणा, लिव्हरचे 4 तुकडे, मान, बरगड्या अन् हृदय सुद्धा तुटलेल्या स्थितीत
धक्कादायक! वाघाचे दोन तुकडे करुन जंगलात फेकले; वन विभागाचे अधिकारी तत्काळ धावले
धक्कादायक! वाघाचे दोन तुकडे करुन जंगलात फेकले; वन विभागाचे अधिकारी तत्काळ धावले
पुण्यातील माजी भाजप आमदाराचा डोळे दीपावणारा शुभ्र पांढऱ्या रंगातील आलिशान राजमहल! नजर हटता हटेना
पुण्यातील माजी भाजप आमदाराचा डोळे दीपावणारा शुभ्र पांढऱ्या रंगातील आलिशान राजमहल! नजर हटता हटेना
Neelam Gorhe: ... तर हे प्रकरणच घडलं नसतं; बीड प्रकरणावरील पत्रावरुन निलम गोऱ्हेंचा शरद पवारांना टोला
... तर हे प्रकरणच घडलं नसतं; बीड प्रकरणावरील पत्रावरुन निलम गोऱ्हेंचा शरद पवारांना टोला
Embed widget