एक्स्प्लोर

बीएमसीची बाजू हायकोर्टात मांडणाऱ्या ज्येष्ठ वकिलासाठी लाखो रूपयांची फी मोजल्याला विरोध करत हायकोर्टात याचिका

कंगना रनौतच्या ऑफिसविरोधातील कारवाईचं प्रकरण, बीएमसीची बाजू हायकोर्टात मांडणाऱ्या ज्येष्ठ वकिलासाठी लाखो रूपयांची फी मोजल्याला विरोध करत हायकोर्टात याचिका. सीबीआय चौकशीची मागणी, पालिकेचा मात्र याचिकेस विरोध.हायकोर्टाच्या सुट्टीकालीन खंडपीठानं तातडीनं सुनावणीस नकार देत प्रकरणाची सुनावणी 11 जानेवारीला घेण्याचे दिले निर्देश.ज्येष्ठ वकील आस्पी चिनॉय यांना साडे 82 लाख रूपये फी म्हणून दिल्याची बाब माहितीच्या अधिकारातून समोर आली होती.

मुंबई : कंगनाच्या वांद्रे येथील कार्यालयावर हातोडा चालवल्या प्रकरणात पालिकेची बाजू हायकोर्टात मांडणाऱ्या वकिलांना लाखो रूपयांची 'फी' दिल्याविरोधात दाखल याचिकेवर तातडीनं सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयानं नकार दिला आहे. यावर तातडीच्या सुनावणीची गरज नसल्याचं स्पष्ट करत यावर नियमित कोर्टात 11 जानेवारी सुनावणी घेण्याचे निर्देश मंगळवारी न्यायमूर्ती एस.एस. शिंदे आणि न्यायमूर्ती अभय अहुजा यांच्या सुट्टीकालीन खंडपीठानं दिले आहेत. मुंबई महानगरपालिकेनं ही याचिका बिनबुडाची असल्याचा दावा करत ती फेटाळून लावण्याची मागणी हायकोर्टाकडे केली आहे. कोणत्याही प्रकरणात वकील निवडण्याचा आपल्याला पूर्ण अधिकार असल्याचा दावा पालिकेच्यावतीनं करण्यात आला आहे.

आरटीआय कार्यकर्ता शरद दत्ता यादव यांनी ही याचिका दाखल केली आहे. कंगनानं महापालिकेविरूद्ध दाखल केलेल्या याचिकेचा निकाल लागल्यानंतर यादव यांनी पालिकेतून माहितीच्या अधिकाराअंतर्गत या खटल्यातील वकिलांच्या फीबद्दल माहिती विचारली होती. त्यावर या खटल्यात पालिकेची बाजू मांडणाऱ्या ज्येष्ठ वकील आस्पी चिनॉय यांना मोबदला म्हणून 82 लाख 50 हजार रूपये दिल्याचं पालिकेनं कबूल केलं. एखाद्या खटल्यात प्रत्येकाला आपल्या आवडीचा वकील निवडण्याची मुभा असते. त्यासाठी त्यांनी लाखो रूपयेही मोजावेत, मात्र आपल्या हट्टासाठी जनतेचे लाखो रूपये खर्च करणं योग्य नसल्याचं या याचिकेत म्हटलं आहे. तसेच पालिकेनं यापूर्वीच स्पष्ट केलं आहे की, बेकायदेशीर बांधकामाबाबतचे खटले हे 'छोटी कामं' आहेत. मग अश्या छोट्या कामांसाठी लाखो रूपये खर्चून विशेष ज्येष्ठ वकील नेमण्याची गरजच काय?, असा सवाल उपस्थित करत याप्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी याचिकेतून केली आहे.

काय आहे प्रकरण? 9 सप्टेंबर रोजी मुंबई महापालिकेनं कंगनाच्या बंगल्यातील बांधकाम बेकायदेशीर ठरवत त्यावर हातोडा चालवला. मात्र कंगनानं पालिकेची ही कारवाईच बेकायदेशीर ठरवत त्याला हायकोर्टात आव्हानं दिलं. या खटल्याची सविस्तर सुनावणी झाल्यानंतर अखेरीस मुंबई उच्च न्यायालयानं कंगनाची याचिका स्वीकार करत पालिकेची कारवाई सूडबुद्धीनं आणि हेतूपरस्पर केल्याचा ठपका ठेवत ती बेकायदेशीर ठरवली. इतकच नव्हे तर कंगनानं झालेल्या नुकसानाची भरपाई म्हणून 2 कोटींचा जो दावा केला आहे त्यासही ती पात्र असल्याचा निर्वाळा दिला आहे.

संबंधित बातमी : कंगना विरुद्ध बीएमसी कायदेशीर लढाईचा दुसरा अध्याय, खारमधील राहत्या घरावरही हातोडा पडणार?

Kangana Ranaut | कंगना रनौतला दिंडोशी न्यायालयाचा दणका, बांधकाम अनधिकृत असल्याचा न्यायालयाचा निर्णय

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या! ओवैसी म्हणाले, एका रात्रीत 655 पाने कशी वाचायची?
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या!
Nashik : नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
IND vs ENG 4th T20I : भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
Success Story: नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 04 PM : 29 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Superfast News : सुपरफास्ट बातम्यांचा वेगवान आढावा : 29 Jan 2025 : ABP MajhaMaharashtra Superfast News : सुपरफास्ट बातम्यांचा वेगवान आढावा : 29 Jan 2025 : ABP MajhaABP Majha Headlines : 03 PM : 29 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या! ओवैसी म्हणाले, एका रात्रीत 655 पाने कशी वाचायची?
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या!
Nashik : नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
IND vs ENG 4th T20I : भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
Success Story: नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी
Cidco Lottery 2025 : सिडकोच्या 26000 घरांसाठी किती जणांनी बुकिंग शुल्क भरलं? सोडतीची तारीख ठरली...
सिडकोच्या 26000 घरांसाठी बुकिंग शुल्क किती अर्जदारांनी भरलं? सोडतीचं वेळापत्रक जाहीर 
Ibrahim Ali Khan Debut:
"याच्या तर रक्तातच अॅक्टिंग..."; करण जोहरकडून इब्राहिम अली खानला डेब्यू फिल्म ऑफर...
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांची 'दहशत' एक्स्प्रेस आता पाकिस्तानात पोहोचली, नाकांबदी केल्याने तगडा झटका बसणार
डोनाल्ड ट्रम्प यांची 'दहशत' एक्स्प्रेस आता पाकिस्तानात पोहोचली, नाकांबदी केल्याने तगडा झटका बसणार
Embed widget