ABP Majha Headlines : 03 PM : 29 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी राजीनामा मागितला तर लगेच देणार, धनंजय मुंडेचा दिल्लीत पुनरुच्चार, ५० दिवसांपासून मीडिया ट्रायल सुरु असल्याची खंत, देशमुखांच्या मारेकऱ्यांना फासावर लटकवण्याचीही मागणी
पन्नास दिवसांपासून पक्ष बदनाम होत असेल तर लगेच राजीनामा दिला असता, धनंजय मुंडेच्या राजीनाम्याबाबत सुप्रिया सुळे आक्रमक, तर सुप्रिया सुळेंना बावनकुळेचं प्रत्युत्तर
मस्साजोग सरपंच देशमुखांच्या हत्येला पन्नास दिवस पूर्ण, कृष्णा आंधळेही पन्नास दिवसांपासून फरारच.. धनंजय देशमुख आज सीआयडी अधिकाऱ्यांची भेट घेणार
नाईकांच्या ठाण्यातील जनता दरबारावरुन पालकमंत्री शिंदेंच्या नाराजीची चर्चा, मंत्रिमंडळ बैठकीतही ऑनलाईन उपस्थिती, शंभूराज देसाई आणि चंद्रशेखर बावनकुळेंकडून नाराजीचा मात्र इन्कार
कोणीही मंत्री कोणत्याही जिल्ह्यात दरबार भरवू शकतो, नाईकांच्या ठाण्यातील जनता दरबाराचं बावनकुळेंकडून समर्थन, तर शिंदेंच्या शिवसेनेचा पालघरमध्ये दरबार भरवण्याचा इशारा
प्रयागराज महाकुंभमेळ्यात संगमावर मध्यरात्री चेंगराचेंगरी.. मृतांचा अधिकृत आकडा अद्याप जाहीर न केल्यानं चर्चांना उधाण
महाकुंभमेळ्याचं प्रशासन लष्कराकडे सोपवा, चेंगराचेंगरीनंतर निरंजनी आखाड्याच्या महंताची मागणी, गर्दी वाढणार हे माहिती होतं तर आधीच लष्काराला का बोलावलं नाही, महंताचा सवाल
कुंभमेळ्याच्या आखाड्यातील महंत, महामंडलेश्वर शाहीस्नानासाठी रवाना, प्रशासनाच्या आवाहनाने गर्दी ओसरली.. पोलिसांची अतिरिक्त खबरदारी
सैफ अली खान हल्ला प्रकरणातील आरोपी मोहम्मद शहजादला न्यायालयीन कोठडी, ओळख पटवण्यासाठी सॅम्पल फॉरेन्सिक लॅबला पाठवणार
जीबीएस संदर्भात पाहणीसाठी सात तज्ञांचं केंद्रीय पथक पुण्यात दाखल, पथक पाहणी न करताच परतत असल्याने गावकऱ्यांचा आक्रमक विरोध, ग्रामस्थांच्या रोषानंतर पथक विहिरीकडे..