मुंबईकरांचा विकेण्ड घरातच, पावसाचा जोर वाढला; रस्ते पाण्यात, समुद्रकिनारी धोका, पोलिसांचं महत्त्वाचं आवाहन
मुंबईत मुसळधार पाऊस सुरू असून पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे, हवामान खात्याचा अंदाज आणि पर्जन्यस्थिती पाहता मुंबई पोलिसांनीही ट्विटरवरुन महत्त्वाचं आवाहन केलं आहे
मुंबई : राजधानी मुंबईकरांचा (Mumbai) आजचा विकेण्ड पावसामुळे घरातच जाणार असल्याचं चित्र असून गेल्या 2 दिवसांपासून मुंबईसह उपनगरातील अनेक भागात पावसाचे पाणी साचले आहे. मुंबईतील वाहतूक सेवेवरही याचा किंचितसा परिणाम जाणवत असून मुंबई लोकल काही मिनिटं उशिराने धावत असल्याचे समजते. मुंबईत सकाळपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे (Rain) दादर, परळ या भागांमध्ये पाणी साचले आहे, याचा फटका वाहतुकीवर झाला आहे. महत्त्वाचे म्हणजे परळ भागात असलेल्या वाडिया आणि के.ई.एम.रुग्णालयाच्या परिसरात एक ते दीड फुटापर्यंत पाणी साचल्याने या रस्त्यावरून होणाऱ्या वाहतुकीला फटका बसला आहे. राजधानी मुंबईत काहीशी पाणीबाणी झाल्याचं चित्र आहे. तर, समुद्रकिनाऱ्यापासून दूर राहण्याचे आवाहन मुंबई पोलिसांनी (Police) नागरिकानी केलं आहे.
मुंबईत मुसळधार पाऊस सुरू असून पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे, हवामान खात्याचा अंदाज आणि पर्जन्यस्थिती पाहता मुंबई पोलिसांनीही ट्विटरवरुन महत्त्वाचं आवाहन केलं आहे. मुंबईत होत असलेल्या पावसाचा जोर लक्षात घेता नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, समुद्रकिनारी जाऊ नये, गरज असेल तरच घराबाहेर पडा. कृपया काळजी घ्या आणि गरज पडल्यास 100 नंबरवर संपर्क करा, असे आवाहन मुंबई पोलिसांनी केलं आहे. दरम्यान, मुंबईत गेल्या 3 दिवसांत 326 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर, 20 जुलै रोजी कोलाबा येथे 111 मिमी तर सांताक्रुझ येथे 93 मिमी पावसाची नोंद झाली आहे. घाटकोपर च्या भटवाडी कातोडी पाडा येथे दरड कोसळली, सुदैवाने कोणी जखमी नाही, काही घरांना मोठा धोका असल्याचं सांगण्यात येत आहे.
In view of the continuous and heavy rains in Mumbai, citizens are requested to avoid going to the coastal areas and move out of their house only if necessary.
— मुंबई पोलीस - Mumbai Police (@MumbaiPolice) July 21, 2024
Take precautions and #Dial100 in case of emergency.
उपनगरातही पावसाचा जोर
मुंबईतील वाडिया आणि के.ई.एम. रुग्णालयात जे रुग्ण या हॉस्पिटलमध्ये येत आहेत, त्यांना आणि त्यांच्या नातेवाईकांना देखील याचा फटका बसत आहे. मुंबईच्या पश्चिम उपनगरातही सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. पश्चिम उपनगरात विलेपार्ले, पश्चिम परिसरात दादाभाई रोड आणि S.V रोड पाण्याखाली गेला आहे. विलेपार्ले पूर्व आणि पश्चिमला जोडणारा कॅप्टन गोरे उड्डाणपूल खालील पश्चिम परिसरात दादाभाई रोड रस्ता देखील पाण्याखाली गेला आहे. पश्चिम उपनगरात जोरदार पाऊस सुरू असून पाणी पातळीत अजून वाढ झाली तर हा रस्ता वाहतुकीसाठी बंद केला जाण्याची शक्यता आहे.
अतिवृष्टीमुळे आणिक आगार कार्यक्षेत्रात बसमार्ग वळवले
1) बसमार्ग क्र. 363 व 430 RCF रेल्वे ब्रिज येथे पाणी भरल्यामुळे दुपारी 13.30 पासून बसमार्ग 361 च्या मार्गाने जातील.
2) बसमार्ग क्र.360 सेल कॉलनी येथे पाणी भरल्यामुळे दुपारी 13.30 पासुन बसमार्ग क्रमांक 361 च्या मार्गाने चेंबूर नाका येथून डावे वळण घेऊन बसमार्ग क्र.375 च्या मार्गाने चेंबूर स्थानक पुढे पूर्ववत.
To.24 आणिक आगार
हे बसमार्ग खंडीत
1)बसमार्ग क्र.110 व 117 संगम नगर येथे पाणी भरल्यामुळे हनुमान येथे खंडित केलेला आहे.
To.24 आणिक आगार
हेही वाचा
कोकणात आभाळ फाटलं, तुफान पाऊस; जगबुडी, कुंडलिका, वशिष्टी नदीला पूर, धोक्याची पातळी ओलांडली