Mumbai University : मुंबई उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दणका, मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक उद्याच घेण्याचे निर्देश
Bombay High Court : उच्च न्यायालयाने मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक उद्याच घ्या, असे निर्देश दिले आहेत.
Bombay High Court , मुंबई : महाराष्ट्र शासनाकडून प्राप्त झालेल्या आदेशानुसार 22 सप्टेंबरला होणारी मुंबई विद्यापीठाची निवडणूक शासनाकडून पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत स्थगित करण्यात आली होती. दरम्यान, मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीच्या स्थगितीच्या विरोधात युवा सेनेने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात या प्रकरणावरुन सुनावणी पार पडली. मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दणका देत उद्याच ही निवडणूक घ्या, असे निर्देश दिले आहेत.
ब्रेकिंग - मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक 24 सप्टेंबर रोजी पार पडणार
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीबाबत मोठी अपडेट हाती आली आहे. मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक उद्याच घ्या, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते. त्यानंतर सुरक्षा व इतर प्रशासकीय यंत्रणांसाठी मुंबई विद्यापीठाने मागितला होता. आता सिनेटची निवडणूक 24 सप्टेंबरला होणार असून 27 सप्टेंबर रोजी निकाल लागणार आहे.
युवासेनेला हायकोर्टाचा मोठा दिलासा
मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक उद्याच घ्या, असे निर्देश दिले आहेत. त्यामुळे ठाकरेंच्या युवासेनेला मोठा दिलासा मिळालाय. मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक उद्याच घ्यावी लागणार असल्याचे बोलले जात आहे.
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीबाबत याचिकाकर्ते आणि विद्यापीठ यांच्यात न्यायालयात युक्तीवाद झाला. न्यायमूर्ती अतुल चांदूरकर आणि न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्या सुट्टीकालीन खंडपीठापुढे तातडीची सुनावणी पार पडली. राज्य सरकारतर्फे महाधिवक्ता डॉ. बीरेंद्र सराफ यांनी बाजू मांडली.
उच्च न्यायालयाच्या आम्ही आभार मानू इच्छितो : वरुण सरदेसाई
ठाकरे गटाचे नेते वरुण सरदेसाई याबाबत बोलताना म्हणाले,मुंबई विद्यापीठाचे सिनेट निवडणूक काल स्थगित करण्यात आली होती त्या संदर्भात युवासेनेकडून याचिका दाखल करण्यात आली. उच्च न्यायालयाच्या आम्ही आभार मानू इच्छितो. कारण वेळीच त्यांनी सुनावणी घेऊन उद्याच्या उद्या निवडणूक घेण्याविषयी निर्देश दिले. हा विजय केवळ युवा सेनेचा नसून 13 हजार 500 पदवीधरांचा विजय आहे. या सरकारने जे पदवीधरांच्या बाबतीत षडयंत्ररचल होतं ते न्यायालयाने हाणून पाडला आहे. उच्च न्यायालयाचे आम्ही आभार मानतो त्यासोबतच आम्ही युवासेना निवडणुकीसाठी सज्ज आहोत तसेच दहापैकी दहा जागा जिंकू.
युवा सेना मुंबई सिनेट निवडणुकीचे उमेदवार आणि याचिकाकर्ते प्रदीप सावंत काय काय म्हणाले?
हा लोकशाहीचा विजय आहे, आम्ही पूर्णपणे निवडणुकीला उद्या सामोरे जाण्यासाठी तयार आहोत. अवघे काही तास शिल्लक राहिलेले असताना सुद्धा आमची शिवसेनेची फौज तयार आहे. आम्ही मागील वेळेस सारखे दहाच्या दहा जागांवर विजयी होऊ. रडीचा डाव विद्यापीठ आणि राज्य सरकारने खेळला पण त्याचा काही उपयोग झाला नाही कोर्टाने निर्देश दिले आहेत. आम्हाला आता काही तासात तयारी करायची आहे पण आम्हाला चिंता नाही आम्ही पूर्णपणे तयार आहोत.
इतर महत्वाच्या बातम्या
Maratha vs OBC : वडीगोद्रीमध्ये मराठा-ओबीसी आमने-सामने, मनोज जरांगे म्हणाले, दादागिरी करायची नाही