मुंबईकरांसाठी मोठी बातमी, CNG 3 रुपयांनी तर PNG 2 रुपयांनी स्वस्त, आज मध्यरात्रीपासून नवे दर लागू
CNG-PNG Price in Mumbai: मुंबईतील महानगर गॅस लिमिटेडने CNG आणि PNG चे दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. हे दर 2 ऑक्टोबरपासून लागू होतील.
CNG Price: मुंबईकरांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. महानगर गॅस लिमिटेडने (Mahanagar Gas Limited) एक मोठा निर्णय घेत सीएनजी आणि पीएनजीच्या किमती (CNG PNG Price) कमी करण्याची घोषणा केली आहे. महानगर गॅस लिमिटेडने सीएनजीच्या दरात 3 रुपयांनी तर पीएनजीच्या दरात 2 रुपयांनी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. महानगर गॅस लिमिटेडने प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली. घरगुती वापरातील आणि वाहनांमध्ये नैसर्गिक वायूचे प्रमाण वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे. नवे दर 2 ऑक्टोबरपासून मध्यरात्रीपासून लागू होणार आहेत.
नव्या दरानुसार मुंबईतील महानगर गॅस लिमिटेडच्या ग्राहकांना 76 रुपये प्रति किलो दराने सीएनजी मिळेल. तर पीएनजी 47 रुपयांना मिळेल. मोठ्या संख्येने वाहनधारक सीएनजी वाहनांचा वापर करतात. तसेच मुंबईत अनेक ठिकाणी स्वयंपाकासाठी पीएनजीचा वापर केला जातो. त्यामुळे महानगर गॅस लिमिटेडने घेतलेला दरकपातीचा निर्णय मुंबईकरांसाठी फायदेशीर ठरणार आहे.
CNG PNG Price : पीएनजीचे दर घरगुती एलपीजीपेक्षा कमी
एमजीएलने सांगितले की, मुंबईतील सीएनजी वापरकर्ते पेट्रोलवर 50 टक्के आणि डिझेलवर 20 टक्के बचत करत आहेत. एमजीएलने प्रसिद्धीपत्रकात असेही म्हटले आहे की, पीएनजीचे दर घरगुती एलपीजीपेक्षा कमी आहेत. एलपीजीच्या तुलनेत पीएनजी सुरक्षित आणि पर्यावरणपूरक मानला जातो.
What Is CNG : सीएनजी म्हणजे काय?
सीएनजीचे पूर्ण नाव 'कंप्रेस्ड नॅचरल गॅस' आहे. हा देखील नैसर्गिक वायू आहे, परंतु तो उच्च दाबाने (200 बार पर्यंत) कंप्रेस्ड केला जातो. सीएनजीचा वापर वाहनांसाठी केला जातो. वाहनांमध्ये इंधनाऐवजी सीएनजी वापरला जातो. सिलेंडरमध्ये अधिकाधिक वायू साठवून त्याचा दीर्घ कालावधीसाठी वापर करणे हा गॅस कम्प्रेस करण्याचा मुख्य उद्देश आहे.
What Is PNG : पीएनजी म्हणजे काय?
PNG चा फूलफॉर्म 'पाईप्ड नॅचरल गॅस' आहे. हा नैसर्गिक वायू आहे जो ग्राहकांच्या वापरासाठी वापरला जातो. हा नैसर्गिक वायू पाईपद्वारे उद्योग किंवा घरांमध्ये पोहोचवला जातो. त्याचा दाब 4 बार ते 21 मिली बारपर्यंत असतो. पीएनजीचा दाब हा ग्राहक वापरत असलेल्या बर्नरच्या प्रकारावर अवलंबून असतो. जर हा वायू घरासाठी वापरला असेल, तर त्याचा दाब 21 mbar असतो आणि जर तो कोणत्याही उद्योगात वापरला जात असेल तर त्याचा दाब त्यापेक्षा जास्त असतो परंतु 4 बारपेक्षा कमी असतो.
PNG घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक वापरासाठी वापरला जातो. PNG नैसर्गिक वायू हे सुरक्षित इंधन आहे. PNG गॅस घरगुती गॅस (LPG) पेक्षा 30 टक्के स्वस्त आहे. PNG 515 टक्के हवेत पसरल्यावर आग लागते, तर LPG हवेत 2 टक्के किंवा त्याहून अधिक पसरले तरी आग लागते.
ही बातमी वाचा: