एक्स्प्लोर

Semiconductor : वेदांता-फॉक्सकॉनच्या प्रकल्पासाठी 'मविआ'चे मोठे प्रयत्न; 'या' सवलती देण्याचा घेतलेला निर्णय

Semiconductor : महाविकास आघाडी सरकारने वेदांता-फॉक्सकॉनच्या प्रकल्पासाठी मोठी सवलत देऊ केली होती.

Semiconductor : वेदांता समूहाने (Vedanta) तैवानमधील कंपनी फॉक्सकॉन (Foxconn) कंपनीसोबत 20 अब्ज डॉलरचा सेमीकंडक्टर प्रकल्प (Semiconductor) गुजरातमध्ये सुरू करणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर राज्यात यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपाच्या फैऱ्या झडू लागल्या आहेत. वेदांता-फॉक्सकॉनचा प्रकल्प राज्यात यावा यासाठी महाविकास आघाडीने जोरदार प्रयत्न केले होते. राज्यात ही मोठी गुंतवणूक यावी यासाठी राज्य सरकारने वेदातां-फॉक्सकॉन समूहाला मोठी सवलत दिली असल्याचे समोर आले. 

'मविआ'ने कोणती सवलत देऊ केली?

महाविकास आघाडी सरकारकडून 39 हजार कोटी रुपयांची सवलत देण्यात आली होती. सेमी कंडक्टरच्या प्रकल्पासाठी तळेगावमधली 400 एकर जागा मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याशिवाय, या प्रकल्पासाठी देण्यात येणारी 700 एकर जागा ही 75 टक्के दराने देण्याचा निर्णय घेण्यात आला. या प्रकल्पासाठी 1200 मेगावॅटचा अखंडित वीज पुरवठा 20 वर्षांसाठी तीन रुपये प्रति युनिट दराने देण्यात येणार होता. या सेमीकंडक्टरच्या प्रकल्पासाठी वीस वर्ष  दररोज 80 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येणार होता. पाणीपट्टीमध्ये 337 कोटी रुपयांची सूट देण्यात येणार होती. वीजेच्या दरात दहा वर्षांसाठी साडेसात टक्के सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. 

वेदांता-फॉक्सकॉनच्या सेमीकंडक्टर प्रकल्पासाठी तळेगाव येथील जागा विचारपूर्वक देण्यात आली होती. या भागाचे वातावरण, कुशल मनुष्यबळ, पुरवठा साखळी अशा अनेक जमेच्या बाबी आहेत. त्याशिवाय, मुंबई-पुणे ही शहरेदेखील या प्रकल्पाच्या जवळ आहेत. त्याचा फायदा वेदांता-फॉक्सकॉनला झाला असता. 

वेदांता ग्रुप महाराष्ट्रात आला असता तर काय फायदा?

सेमीकंडक्टर निर्मिती देशात सुरू करण्यासाठी केंद्र सरकारने धोरण आखले आहे. आगामी काळात सेमीकंडक्टरची वाढती मागणी लक्षात घेता केंद्र सरकारने याबाबत विशेष धोरण आखले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात वेदांता सोबत झालेल्या चर्चेनुसार,  सेमीकंडक्टरचा प्रकल्प हा पुणे जिल्ह्यातील तळेगाव येथे सुरू होणार होता. या प्रकल्पामुळे 80 हजार ते एक लाख रोजगार निर्माण झाला असता. यातील 30 टक्के रोजगार हा थेट रोजगार असणार होता. तर, जवळपास 50 टक्के रोजगार हा अप्रत्यक्ष रोजगारनिर्मिती झाली असती.  वेदांताने तैवानच्या फॉक्सकॉन कंपनी समवेत भागीदारी केली आहे. या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये तीन टप्प्यांमध्ये प्रकल्प उभारण्याचे प्रस्तावित होते. यात एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक असलेले डिस्प्ले फॅब्रिकेशन आणि 63 हजार कोटी रुपये गुंतवणुकीचे सेमीकंडक्टर्स तसेच 3800  कोटी रुपयाचे सेमीकंडक्टर असेंबली आणि टेस्टिंग फॅसिलिटी होणार होती. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : 'त्याला शेवटचं खेळताना पाहिलं..', रोहित शर्माच्या कसोटी कारकिर्दीचा शेवट? गावस्कर-शास्त्रींच्या बोलण्याने भूवया उंचावल्या!
'त्याला शेवटचं खेळताना पाहिलं..', रोहित शर्माच्या कसोटी कारकिर्दीचा शेवट? गावस्कर-शास्त्रींच्या बोलण्याने भूवया उंचावल्या!
Beed Crime: मी बीड पोलीस ठाण्यात गेलो पण वाल्मिक कराडला भेटलो नाही; संतोष देशमुखांच्या भावाने गंभीर आरोप केलेल्या बालाजी तांदळेंचं स्पष्टीकरण
मी बीड पोलीस ठाण्यात गेलो पण वाल्मिक कराडला भेटलो नाही; बालाजी तांदळेंचं स्पष्टीकरण
Video : ...तर त्याला जागेवच तोडू; मराठी युवकाच्या पाठीशी मनसे, अविनाश जाधव संतापले, मुंब्य्रात थेट इशारा
Video :...तर त्याला जागेवच तोडू; मराठी युवकाच्या पाठीशी मनसे, अविनाश जाधव संतापले, मुंब्य्रात थेट इशारा
Chhagan bhujbal & Devendra Fadnavis : मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराजी; फडणवीस अन् भुजबळांकडून एकमेकांचं तोंडभरून कौतुक; चर्चांना उधाण
मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराजी; फडणवीस अन् भुजबळांकडून एकमेकांचं तोंडभरून कौतुक; चर्चांना उधाण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis Speech Satara | शेरो शायरी, छगन भुजबळ यांचं कौतुक;देवेंद्र फडणवीसांचं संपूर्ण भाषणKamlesh Kamtekar Rickshaw Driver:जॉब गेलेला ग्राफिक डिझायनर ते रिक्षाचालक,कमलेशचा प्रेरणादायी प्रवासAvinash Jadhav On Mumbra Marathi : या मराठी मुलाला हात लावून दाखवा, घरात घुसून..... मनसे आक्रमकMumbra Marathi vs Hindiमराठी बोलायला सांगणाऱ्या तरुणाला माफी  मागण्याची वेळ Avinash Jadhav संतापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : 'त्याला शेवटचं खेळताना पाहिलं..', रोहित शर्माच्या कसोटी कारकिर्दीचा शेवट? गावस्कर-शास्त्रींच्या बोलण्याने भूवया उंचावल्या!
'त्याला शेवटचं खेळताना पाहिलं..', रोहित शर्माच्या कसोटी कारकिर्दीचा शेवट? गावस्कर-शास्त्रींच्या बोलण्याने भूवया उंचावल्या!
Beed Crime: मी बीड पोलीस ठाण्यात गेलो पण वाल्मिक कराडला भेटलो नाही; संतोष देशमुखांच्या भावाने गंभीर आरोप केलेल्या बालाजी तांदळेंचं स्पष्टीकरण
मी बीड पोलीस ठाण्यात गेलो पण वाल्मिक कराडला भेटलो नाही; बालाजी तांदळेंचं स्पष्टीकरण
Video : ...तर त्याला जागेवच तोडू; मराठी युवकाच्या पाठीशी मनसे, अविनाश जाधव संतापले, मुंब्य्रात थेट इशारा
Video :...तर त्याला जागेवच तोडू; मराठी युवकाच्या पाठीशी मनसे, अविनाश जाधव संतापले, मुंब्य्रात थेट इशारा
Chhagan bhujbal & Devendra Fadnavis : मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराजी; फडणवीस अन् भुजबळांकडून एकमेकांचं तोंडभरून कौतुक; चर्चांना उधाण
मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराजी; फडणवीस अन् भुजबळांकडून एकमेकांचं तोंडभरून कौतुक; चर्चांना उधाण
Shubman Gill : तू खेळ, तुला कोण काय बोलणार नाही! कॅप्टनला बाहेर बसवून संघात घेतलेल्या गिलला शाब्दिक डावपेचात चारी बाजूने घेरत क्षणात गेम केला
Video : तू खेळ, तुला कोण काय बोलणार नाही! कॅप्टनला बाहेर बसवून संघात घेतलेल्या गिलला शाब्दिक डावपेचात चारी बाजूने घेरत क्षणात गेम केला
खर्च कोणी केला, कोणत्या सीटवर बसला, किती बॅगा घेऊन जाणार? परदेशात जाताना 19 प्रकारची माहिती द्यावी लागणार!
खर्च कोणी केला, कोणत्या सीटवर बसला, किती बॅगा घेऊन जाणार? परदेशात जाताना 19 प्रकारची माहिती द्यावी लागणार!
''शरद पवार अन् सुप्रिया सुळेंनी घरी बसावं, शेतीबाडी पाहावी, त्यांच्या वांग्याला बरेच पैसे मिळालेत''
''शरद पवार अन् सुप्रिया सुळेंनी घरी बसावं, शेतीबाडी पाहावी, त्यांच्या वांग्याला बरेच पैसे मिळालेत''
Devendra Fadnavis : सामनातून मुख्यमंत्र्यांचं भरभरून कौतुक, देवेंद्र फडणवीसांची दोन शब्दात प्रतिक्रिया!
सामनातून मुख्यमंत्र्यांचं भरभरून कौतुक, देवेंद्र फडणवीसांची दोन शब्दात प्रतिक्रिया!
Embed widget